Student Aadhar mahiti kashi Bharavi विद्यार्थ्यांची आधार माहिती Student पोर्टलला कशी भरावी

 विद्यार्थ्यांची आधार माहिती Student पोर्टलला भरणे. Student Portal वर Aadhar माहिती भरणे

शासनाच्या वेळोवेळी सूचना येतात कि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आधार माहिती Student Portal वर भरावयाची आहे. आपली संचमान्याता देखील अधार माहिती भरलेल्या वर केली जाणार आहे. तसे विविध पत्रकाद्वारे आपणास सांगण्यात आलेले आहे. Student Portal वर Aadhar माहिती कशी भरावी याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपणास मिळणार आहे. Student Portal वर Aadhar माहिती भरताना खालिल stepsचा अवलंब करावा. जेणे करून आपणास Student Portal वर आधार माहिती भरताना कोणतीही अडचण येणार नाही.


१) सर्वप्रथम मुख्याध्यापकाने आपले Login करावे आणि Excel या बटनावर क्लिक करावे. यात असलेल्या Download UID या बटनावर क्लिक करावे.

२) Download UID या बटनावर क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

३) यानंतर standard च्या समोर असलेल्या Dropdown लिस्ट मधून आपणास ज्या वर्गाच्या मुलांच्या नावांची Download करावयाची आहे त्या वर्गाला select करून घ्यावे.
४) इयत्ता १ ते १० वी पर्यंत Standard या बटनानंतर असलेल्या stream Tab मध्ये काहीही माहिती भरण्याची गरज नाही. तसेच ११ वी आणि १२ वी या वर्गासाठी समोर असलेल्या Stream या बटनामधील Dropdown लिस्ट मधून आपणास हवी असलेली Stream म्हणजेच शाखा निवडून घ्यावी.

५) Download या बटनावर क्लिक करावे. Download या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक Excel File आपल्या कॉम्पुटर मध्ये Download झालेली दिसेल. Download झालेल्या माहितीची File ही Excel Format मध्ये आपणास खालील प्रमाणे दिसून येईल.

६) या Excel file मध्ये प्रामुख्याने दोन भाग केलेले असल्याचे आपल्या लक्षात येईल.

अ)भाग १ (गुलाबी रंगात असलेली माहिती तथा A पासून ते I या कॉलम पर्यंतची माहिती) : अद्याप पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती आपल्या शाळेच्या Student पोर्टल च्या Login ला भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या नावासह त्या वर्गाची यादी दिसून येईल. सदर यादीमध्ये मागील वर्षी आधार नंबर भरलेली आणि UID Department कडून Valid म्हणून घोषित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश या Excel File मध्ये असणार नाही त्यामुळे या यादीत आपल्या शाळेच्या मागील वर्षीच्या पटापेक्षा या यादीतील विद्यार्थी संख्या ही कमी देखील असू शकतात याची नोंद घ्यावी. तसेच या भागात आपणास कोणताही बदल करता येणार नाही


ब) भाग २ : (आकाशी रंगात असलेली माहिती तथा J पासून ते o या कॉलम पर्यंतची माहिती)

वरील प्रमाणे असलेल्या यादीमध्ये आकाशी रंगाच्या म्हणजेच J पासून ते o या कॉलम पर्यंतच्या भागामध्ये आपणास आधार माहिती भरावयाची आहे.
१) यानंतर J या संपूर्ण कॉलम ला Select करून Right क्लिक करा व आलेल्या Option मधून Format cell या Option वर क्लिक करा.
२) Format Cells या Option वर क्लिक केल्यावर या मधील Number या Tab ला क्लिक करून त्यामधील Text या option ला क्लिक करा आणि खाली असलेल्या ok वा घटनाला क्लिक करा, म्हणजे आपल्या excel file मधील J या कॉलम मध्ये आता योग्य तो बदल झालेला असेल. 
३) हे पहा वरील स्क्रीन मध्ये असलेल्या कॉलम मध्ये काय माहिती भरावे
J कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचा आधार नंबर भरावा. विद्यार्थ्याचा आधार नंबर उपलब्ध नसेल तर त्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी क्रमांक वा इतर माहिती भरू नये.
K कॉलम : या कॉलम मध्ये विध्यार्थ्याचे पहिले नाव लिहावे. हे लिहित असताना आपणासमोर विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. कारण आधार कार्ड वर जसे नाव असेल अगदी तसेच नाव (जरी ते चुकीचे असेल तरीही) लिहावे. नाव चुकीचे असेल तर ते दुरुस्थ करण्याचा प्रयत्न करू नये.अन्यथा UID department कडून सदर विद्यार्थ्यांची माहिती invalid म्हणून परत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. ते नाव दुमृस्थ करण्याची वा ही स्वतंत्रपणे वेगळी आहे त्याचा सध्या आपण विचार करू नये ही संपूर्ण सुचना L,M,N आणि ) या कॉलम साठी देखील लागू असेल याची नोंद घ्यावी. याचाच अर्थ असा की आधार बाबत माहिती भरताना आधार कार्ड वरील माहिती आपणास जशीच्या तशी भरावयाची आहे. त्यात बदल करू नये. तसेच विद्यार्थी लिंग (Gender) मध्ये देखील चूक झालेली असेल म्हणजेच विद्यार्थी हा male असेल आणि आधार कार्ड वर female झाले असेल तर आपण ते आपल्या आधार माहिती भरत असताना excel file मध्ये female असेच लिहावे. कोणताही बदल करू नये.
I कॉलम: या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे मधले नाव लिहावे,
M कॉलम: या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे शेवटचे नाव लिहावे.
N कॉलम: या कॉलम मध्ये विद्यार्थ्याची जन्म तारीख लिहावी. जर आधार कार्ड वर जन्मतारीख संपूर्ण उपलब्ध नसेल म्हणजेच महिना आणि वर्ष (उदा. जून २००९) असे असेल तर आपण माहिती भरताना जन्म तारीख भ नये तसेच जन्म तारीख आपल्या रेकॉर्ड प्रमाणे आधार कार्ड वर वेगळी असेल म्हणजेच चुकीची असेल तरीही आधार कार्ड वरीलच चुकीची असली तरीही ती चुकीचीच जन्म तारीख लिहावी. त्यात बदल करू नये,
O कलिम: या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचे लिंग म्हणजेच Gender लिहावे. आधार कार्ड वर जे लिंग नमूद केले असेल अगदी तेच या ठिकाणी नमूद करावे.
महत्वाच्या सूचना -
अ) एखाद्या मुलाची आधार माहिती आपणाकडे उपलब्ध नसेल तर आपण त्या विद्यार्थ्याची कोणतीही माहिती भरू नये. त्या मध्ये NIL असे शब्द किंवा (-) असे कोणतेही चिन्ह भरू नये, अन्यथा आपली माहिती System कडून स्वीकारली जाणार नाही.
ब) एकदा माहिती Upload केली आणि त्या माहितीमध्ये काहे एमुलांचे आधार नंबर माहिती उपलब्ध नसल्याने भरली गेली नाही परंतु त्यानंतर जर विद्यार्थ्याची आधार नंबर वा इतर उपलब्ध माहिती झाली तर पुन्हा नव्याने राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रोसेस करावी आणि त्या राहिलेल्या मुलांचे आधार नंबर System ला Update करावेत.
क) आधार माहिती भरत असताना आपण मुलांकडून आधार कार्ड ची Copy मागवून घ्यावी जेणेकरून माहिती भरताना चुका होणार नाही.
ड) आपल्या शाळेतील सर्व मुलांची आधार माहिती भरावयाची आहे. ज्या मुलांचे आधार नंबर अद्याप काढलेले नाही अशा सर्व मुलांच्या पालकांना प्रबोधन करून याबाबत महत्व पटवून द्यावे व लवकरात लवकर आधार माहिती भरून पूर्ण करावी.
अशा प्रकारे माहिती भरून झाल्यावर ही माहिती खाली स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे Office Button या कोपऱ्यात असलेल्या बटनावर क्लिक करावे आणि Save as हा Option निवडून त्यापुढे आलेला Other Formats या बटनाला क्लिक करावे.
९) Other Formats वर क्लीक केल्यावर File save as होण्यासाठी आपणास File चे नाव आणि Save as type विचारला जाईल. यामध्ये File च्या नावात कोणताही बदल करू नये. तसेच save as type मध्ये मात्र Excel Workbook (*.xlsx) हा type आपणास दिसेल त्यावर क्लिक करून आपण csv (comma delimited) (*.csv) हा type select करावे.
१०) आता पुन्हा मुख्याध्यापकाने आपले Student पोर्टल Login करावे आणि Excel या बटनावर क्लिक करावे. यात असलेल्या Upload UID या बटनावर क्लिक करावे.
११) Upload UID या बटनावर क्लिक केल्यावर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.यामध्ये Browse या बटनावर करावे.
१२) यानंतर आताच save as केलेल्या csv file ला जी आपल्या शाळेच्या udise ने save असेल त्या file निवडा आणि open वर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार माहिती सोप्या पध्दतीने भरू शकता. Student Aadhar mahiti kashi Bharavi विद्यार्थ्यांची आधार माहिती Student पोर्टलला कशी भरावी  यासाठी आपण खालिल व्हिडिओ पाहून ही माहिती समजून घेऊ शकता. आपणास Student Aadhar mahiti kashi Bharavi याविषयी कांही समस्या असेल तर मला कमेंट करून कळवू शकता.
मार्गदर्शक व्हिडिओ- 

Post a Comment

0 Comments