Setu Abhyas 2023 Bridge Course सेतू अभ्यास इयत्ता 3 री

Setu Abhyas 2023 Bridge Course 2023 सेतू अभ्यास २०२३-२४

Setu Abhyas 2023 Bridge Course 2023 सेतू अभ्यास २०२३-२४ राज्य सरकारमार्फत हा अभ्यासक्रम उपल्बध करून दिलेला आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना नुकत्याच देण्यात आलेल्या आहेतसेतू अभ्यासक्रम २०२३ राबवण्यापूर्वी आपणास सेतू चाचणी पेपर घ्येवयाचे आहेत. त्यानंतर आपण आपला  Setu Abhyas विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊ शकता. साधारणपणे Bridge Course 2023 चे स्वरूप कसे असेल अंमलबजावणी कशी असेल याबाबत नुकतेच मार्गदर्शन पर परिपत्रक सादर करण्यात आले होते. त्यानुसार सेतू चाचणी सेतू चाचणी गुण नोंदसेतू चाचणी अंमलबजावणी याविषयी थोडक्यात माहिती पाहू.


Setu Abhyas 2023 Bridge Course 2023 सेतू अभ्यास २०२३-२४






सेतू अभ्यास २०२३-२४ इयत्ता ३ री  

अ.क्रदिवसडाऊनलोड
०१दिवस १डाऊनलोड
०२दिवस २डाऊनलोड
०३दिवस ३डाऊनलोड
०३दिवस ४डाऊनलोड
०४दिवस ५डाऊनलोड
०५दिवस ६डाऊनलोड
०६दिवस ७डाऊनलोड
०७दिवस ८डाऊनलोड
०८दिवस ९डाऊनलोड
०९दिवस १०डाऊनलोड
१०दिवस ११डाऊनलोड
११दिवस १२डाऊनलोड
१२दिवस १३डाऊनलोड
१३दिवस १४डाऊनलोड
१४दिवस १५डाऊनलोड
१५दिवस १६डाऊनलोड
१६दिवस १७डाऊनलोड
१७दिवस १८डाऊनलोड
१८दिवस १९डाऊनलोड
१९दिवस २०डाऊनलोड
२०सेतू अभ्यासडाऊनलोड

सेतू अभ्यास का राबवला जात आहे - 

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषागणितविज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. 


सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. 


शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/ संस्था करू शकतात.


सेतू अभ्यास स्वरूप- 

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.


३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.


४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.


५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.


६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.


Bridge Course अंमलबजावणी कालावधी- 

पूर्व चाचणी - दि. ३० जून ते ३ जुलै २०२३

२० दिवसांचा सेतू अभ्यास- दि. ४ जुलै ते २६ जुलै २०२३.

उत्तर चाचणी - दि. २७ ते ३१ जुलै २०२३


Setu Abhyas 2023 अंमलबजावणी :-

१. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.


२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.


३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची. 


४. सदर कृतिपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात. 


५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात. 


६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी.. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.


७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या