Setu
Abhyas 2023 Bridge Course
2023 सेतू अभ्यास २०२३-२४
Setu
Abhyas 2023 Bridge Course 2023 सेतू अभ्यास
२०२३-२४ राज्य सरकारमार्फत हा अभ्यासक्रम उपल्बध करून
दिलेला आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना नुकत्याच देण्यात आलेल्या आहेत. सेतू
अभ्यासक्रम २०२३ राबवण्यापूर्वी आपणास सेतू चाचणी पेपर घ्येवयाचे
आहेत. त्यानंतर आपण आपला Setu Abhyas विद्यार्थ्यांकडून
सोडवून घेऊ शकता. साधारणपणे Bridge Course 2023 चे
स्वरूप कसे असेल अंमलबजावणी कशी असेल याबाबत नुकतेच मार्गदर्शन पर परिपत्रक सादर
करण्यात आले होते. त्यानुसार सेतू चाचणी , सेतू
चाचणी गुण नोंद, सेतू चाचणी अंमलबजावणी याविषयी थोडक्यात
माहिती पाहू.
सेतू अभ्यास २०२३-२४ इयत्ता ९ वी
अ.क्र
दिवस
डाऊनलोड
०१
दिवस १
डाऊनलोड
०२
दिवस २
डाऊनलोड
०३
दिवस ३
डाऊनलोड
०३
दिवस ४
डाऊनलोड
०४
दिवस ५
डाऊनलोड
०५
दिवस ६
डाऊनलोड
०६
दिवस ७
डाऊनलोड
०७
दिवस ८
डाऊनलोड
०८
दिवस ९
डाऊनलोड
०९
दिवस १०
डाऊनलोड
१०
दिवस ११
डाऊनलोड
११
दिवस १२
डाऊनलोड
१२
दिवस १३
डाऊनलोड
१३
दिवस १४
डाऊनलोड
१४
दिवस १५
डाऊनलोड
१५
दिवस १६
डाऊनलोड
१६
दिवस १७
डाऊनलोड
१७
दिवस १८
डाऊनलोड
१८
दिवस १९
डाऊनलोड
१९
दिवस २०
डाऊनलोड
२०
सेतू अभ्यास
डाऊनलोड
सेतू अभ्यास का राबवला जात आहे -
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू
अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि
शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा
व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/ संस्था करू शकतात.
सेतू अभ्यास स्वरूप-
१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस)
असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. सदर सेतू अभ्यास मराठी
आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.
३. सदर
सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या
महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.
४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
५. सदर
सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन
निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही
विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.
६. सदर
सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे
नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.
Bridge
Course अंमलबजावणी कालावधी-
पूर्व
चाचणी - दि. ३० जून ते ३ जुलै २०२३
२० दिवसांचा
सेतू अभ्यास- दि. ४ जुलै ते २६ जुलै २०२३.
उत्तर चाचणी - दि. २७ ते ३१ जुलै २०२३
सेतू अभ्यास राबविण्यासाठी शिक्षक आणि सुलभक यांचेसाठी सूचना
कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे २०१९-२०२०
मध्ये शाळा औपचारिकपणे पूर्णतः आणि २०२० २०२१ माये अंशतः बंद होत्या; ज्यामुळे वर्गात अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षरित्या राबविणे शक्य
होऊ शकले नाही. तथापि, राज्य सरकारकडून महामारी दरम्यान
आणि महामारी नंतरच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही
माध्यमांतून शिक्षण देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. त्याचाच एक भाग
म्हणून विद्यार्थ्यांना पीडीएफ (सॉफ्ट कॉपी) स्वरूपामध्ये सेतू अभ्यास उपलब्ध करून
देण्यात आलेला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर मागील दोन शैक्षणिक वर्षांपासून शाळा नियमितपणे सुरू झालेल्या असल्या तरी देखील अनेक शिक्षक आणि पालकांनी हा सेतू अभ्यास छापील साहित्याच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्तींवर आधारित अभ्यासाची उजळणी आणि पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी या दुहेरी उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्याथ्यांसाठी सुधारित सेतू अभ्यास मुद्रित स्वरूपात तयार केलेला असून विद्याथ्र्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेतू अभ्यास अंमलबजावणीसंबंधी मार्गदर्शक सूचना :
(१) सदर सेतू अभ्यास हा मागील वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित असून सध्याच्या इयत्तेचा अभ्यासक्रम व मागील इयत्तेचा अभ्यासक्रम यांच्यातील दुवा आहे.
२) सेतू अभ्यास हा इयत्तानिहाय आणि विषयानुसार तयार
करण्यात आलेला असून तो मागील वर्गाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नमूद केलेल्या अध्ययन
निष्पत्तींवर आधारित आहे.
(३) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयातील संशोधन विभागाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधीलऑनलाईन स्वरूपातील सेतू अभ्यासाच्या संदमनि केलेल्या संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष लक्षात घेऊन सेतू अभ्यास कृतींची रचना करण्यात आलेली आहे.
४) प्रत्येक विद्यार्थ्याकडून दिलेल्या विहित
कालावधीमध्ये सदर सेतू अभ्यास पूर्ण करून घ्यावा.
(५) सेतू अभ्यासात दिलेली प्रत्येक कृती विद्यार्थी स्वतः सोडवतील याकडे लक्ष दयावे, आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे.
६) सदर सेतू अभ्यास एकूण २० दिवसांचा आहे. ज्यामध्ये शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी आणि सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रत्येकी ३० गुणांची अनुक्रमे एक पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी घेण्यात यावी.
(७) विद्यार्थ्यांनी दोन्ही चाचण्यांमध्ये प्राप्त केलेल्या गुणांचा अध्ययन निष्पत्तिनिहाय तुलनात्मक तक्ता शिक्षकांनी तयार करावा.
(८) सेतू अभ्यासातील दिलेल्या कृती या नमुनादाखल असून शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती संपादणुकीचा स्तर लक्षात घेऊन गरजेनुसार अन्य कृतींचे आयोजन करावे.
0 Comments