Student Portal var Vidyarthi nond kashi karavi New Entry शाळाबाह्य व वयानुरूप दाखल मुलांची नोंद कशी करावी

 Student Portal var Vidyarthi nond kashi karavi New Entry 
शाळाबाह्य व वयानुरूप दाखल मुलांची नोंद कशी करावी

    आपण दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत असतो. असे सर्वेक्षण केल्यानंतर जी मुले शाळेत दाखल करतो अशा मुलांची नोंद Student Portal वर केलेली नसते. अथवा काहीं मुलांना आपण वयानुरूप प्रवेश देत असतो अशा मुलांची नोंद देखील Student Portal वर केलेली नसते. मग अशा मुलांची नोंद Student Portal करण्याची सुविधा Student Portal वर दिलेली नसते. अशा मुलांची नोंद करणयासाठी आपणास गट शिक्षणाधिकारी यांना विनंती अर्ज करून New Entry Tab घ्यावा लागतो मग आपण अशा मुलांची नोंद Student Portal  करू शकतो.


शाळा बाह्य अथवा वयानुरूप प्रवेश द्यावयाच्या मुलांची नोंद - 
                    आपणास ज्या मुलांची नोंद Student Portal करावयाची आहे. त्या मुलांची नोंद आगोदर जनरल रजिस्टर वर करणे गरजेचे आसते. आगोदर आपण आशी नोंद आपल्या जनरल रजिस्टर ला करून त्या मुलांना प्रवेश द्यावा. प्रवेश दिल्यानंतर आपण मा. गटशिक्षणाधिकारी यांना विनंती अर्ज करावा. त्यामध्ये आपण New Entry Tab का घेत आहात कोणत्या मुलांची नोंद करावयाची आहे. त्याचे कारण काय ही माहिती द्यावी सोबतच आपल्या शाळेचा Udise Code देखिल द्यावा. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी आपणास New Entry Tabउपल्बध करून देतील. त्यानंतरच आपण अशा मुलांची नोंद Student Portal वर करू शकता. 

विनंती अर्जाचा नमूना- 
        आपण खालीलप्रमाणे नमूना अर्ज मा. गटशिक्षणाधिकारी यांना करू शकता व New Entry Tab घेऊ शकता.

New Entry Tab मिळाल्यानंतर Student Portal ला विद्यार्थ्यांची नोंद कशी करावी-
    आपण New Entry Tab साठी अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जातील कारण पाहून गटशिक्षणाधिकारी आपणास New Entry Tab देतील. त्यानंतर आपण खालीलप्रमाणे विद्यार्थी नोंद करावी. New Entry Tab दिल्यानंतर लवकरात लवकर आपण आपल्या मुलांची नोंद करावयाची आहे. कारण या Tab ला मुदत दिलेली असते त्यानंतर ती New Entry Tab आपोआप निघून जाते. विद्यार्थी नोंद करताना खालीलप्रमाणे कृती करावी. 

१) सर्वात आगोदर कोणताही ब्राऊझर ओपन करून त्यामध्ये Student Portal ची वेबसाईट टाकून ती ओपन करावी. Student Portal Website - https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login

2) Student Portal ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा युझर आयडी व पासवर्ड टाकून खाली असलेला कॅप्च्या टाकून Login करावे. 

३) त्यानंतर आपल्या Student Portal शाळा Login ला आपणास New Entry Tab दिलेली असेल ती Tab Student Entry मध्ये New Student Details या Tab वर क्लिक करावे. खालीलप्रमाणे ही Tab असेल.


४) Tab Student Entry मधील New Student Details या Tab वर क्लिक केल्यानंतर आपणास विद्यार्थी माहिती भरण्यासाठी एक फॉर्म ओपन होईल यामध्ये आपणास सर्व माहिती भरावयाची आहे. खालील प्रमाणे माहिती भरावी.

अ) विद्यार्थीचे इयत्ता 
ब) शाखा 
क) शाखा (कला वाणिज्य विज्ञान फक्त ११ वी १२ वी)
क) तुकडी
ड) माध्यम
इ) विद्यार्थीचे नाव
ई) आईचे नाव 
उ) लिंग 
ऊ) जन्मतारीख

त्यानंतर इतर आवश्यक असलेली माहिती भरावी. शक्य असल्यास सर्व माहिती भरावी. ज्या माहितीला लाल स्टार आहे ती माहिती आपणास भरावीच लागणार आहे.

१) प्रवर्ग जात धर्म BPL
२) सेमी इंग्रजी 
३) दाखल तारीख दाखल इयत्ता 
४) शाळा प्रवेशाचा प्रकार - वयानुरूप की रेग्गूलर
५) जनरल रजिस्टर क्रमांक 
६) आधार माहिती (असेल तर) 

सर्व माहिती भरून परत एकदा तपालून पहा व सर्वात शेवटी Save वरती क्लिक करा. आपला विद्यार्थी यशस्वी नोंद झाल्याचा Messageआपणास स्कीन वर दिसेल. खालील माहिती भरावी लागेल.


अशाप्रकारे आपण Student Portal वर शाळाबाह्य अथवा वयानुरूप दाखल झालेल्या मुलांची नोंद Student Portal वर New Entry Tab च्या मदतीने करू शकता. नोंद झाल्यानंतर कृपया Report Tab मधून CatLog पहायला विसरू नका. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

मार्गदर्शक व्हिडिओ-


 


Post a Comment

0 Comments