How to send Student Request In Student Portal

 Student Portal वरती विद्यार्थी रिक्वेट पाठवणे.

दरवर्षी आपण Student Portal वरती अनेक कामे करत असतो. जसे Student Promotion, Student Add करणे, Student request पाठवणे, Aadhar माहिती भरणे, Student attach करणे. Student report पाहणे. यामधील सर्वात महत्वाचे असते ते Student request पाठवणे. आपल्या शाळेत जर दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आले असतील तर त्या मुलांना आपल्या शाळेत घेण्यासाठी आपणास Student request पाठवावी लागते. Student request पाठवून आपण त्यांना त्यांच्या जून्या शाळेतून आपल्या शाळेत घेत असतो. मग अशी Student request कशी पाठवायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
 

अ) Student request कोणत्या विद्यार्थींसाठी पाठवली जाते- 

        आपल्या शाळेत दरवर्षी दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी येत असतात. असे विद्यार्थी जर आपल्या शाळेच्या Student Portal ला घ्यावयाचे असतील तर त्यांना Student Request पाठवून घेता येते. थोडक्यात दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या मुलांना घेण्यासाठी Student request  पाठवली जाते.

आ) Student Request पाठवण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते- 

दुसऱ्या शाळेतून आलेल्या मुलांना आपल्या शाळेत घेण्यासाठी Student request पाठवावी लागते. यासाठी आपणास खालील माहिती आवश्यक असते.
१) विद्यार्थ्यांचे नाव
२) इयत्ता 
३) समोरील शाळेचा Udise code
4) आपल्या शाळेतील जनरल रजि. नंबर
५) दाखल तारीख  ही सर्व माहिती आपल्याकडे असेल तर आफण Student request पाठवू शकतो.

इ) Student request कशी पाठवावी.

 १) सर्वप्रथम https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login हा Address टाकून Student Portal open करा. 

२) आपल्या शाळेचा Userid व पासवर्ड टाकून Login करा. त्यानंतर आपणासमोर Student Portal चे आपल्या शाळेचे Home Page दिसेल.

३) Student Request पाठवण्यासाठी वर असलेल्या Transfer मधील  Transfer Request या Tab वर क्लिक करा. खालील फोटो पहा.


 
४) त्यानंतर आफल्या समोर नवीन पेज येईळ यामध्ये विद्यार्थी ज्या शाळेमधून आला आहे त्या शाळेचा Udise Code टाका कोणत्या वर्षामधून आला ते वर्ष निवडा त्यानंतर इयत्ता निवडा आणि Find या पर्यायावर क्लिक करा खालील स्क्रीन पहा.


५) त्यानंतर आपल्या समोर आपण Udise कोड टाकलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपणास दाखवले जातील. आपल्या शाळेत आलेल्या मुलाला प्रथम सलेक्ट करा. नंतर त्याची माहिती भरा. जसे इयत्ता, स्ट्रीम, तुकडी, जनरल रजिस्टर नंबर दाखल तारीख इत्यादी. खालील स्क्रीन पहा.


६) Send Request या खाली असलेल्या पर्यायावर क्लिक करा. आपली request यशस्वी रित्या पाठवल्याची सूचना स्क्रीन वर येईळ तिला Ok करा. 
अशा पध्दतीने आफल्या शाळेत जेवढे विद्यार्थी आले असतील तेवढ्या मुलांना आपल्या शाळेत घेण्यासाठी आपण Student Request पाठवू शकता. 

हे माहिती असू द्या-  आपण केवळ शेवटची इयत्ता सोडून व इयत्ता पहिली सोडू इतर वर्गातील विद्यार्थी Student request पाठवून घेऊ शकतो. समोरील शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी घ्यावयाचे असतील तर आपणास Attach Student ही tab वापरावी लागते.

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा.

student request कशी पाठवावी 


Post a Comment

0 Comments