2021-22 Vidyrthi pramosan kase karave विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2021-22?

  Vidyrthi pramosan kase karave विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2021-22?

आपणास दरवर्षी जून महिन्यामध्ये StudentPortal ला विद्यार्थी प्रमोशन करावे लागते. सन 2021-22 मध्ये देखील आपणास Student Promosan करावयाचे आहे. असे विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2021-22? 2021-22 Vidyrthi pramosan kase karave या विषयी आपण माहिती घेणार आहोत. सन 2021-22 Vidyrthi pramosan सध्या सुरू करण्यात आलेले आहे. आपण Student portal वरून pramosan करू शकता.

विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2021-22? 2021-22 Vidyrthi pramosan kase karave यापुर्वी आपणास खालिल बाबी काळजीपूर्वक पहाव्या लागतील.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे.

प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.

student portal student promotion 2021-22

विद्यार्थी प्रमोशन Vidyrthi pramosan 21 करताना खालील पाऱ्याचा अवलंब करावा. कृपया आपण खालील पायऱ्याने विद्यार्थी प्रमोशन Vidyrthi pramosan करावे जेणे करून आपणास कोणतीही अडचण अथवा समस्या येणार नाही.

१) सर्वात प्रथम आपल्या संगणकातील अथवा मोबाईल मधील कोणताही एक ब्राऊझर ओपन करावा. मोबाईल असेल तर कृपया गुगल क्रोम वापरावा.

२) वर असणाऱ्या सर्च बॉक्स मध्ये https://student.maharashtra.gov.in/ असा पत्ता टाकून Enter प्रेस करावा.

३) आपल्या समोर आपल्या Student Portal ची Website Open होईल यामध्ये युझर नेम म्हणून आपल्या शाळेचा Udise Code टाकावा व आपला Student Portal चा जो पासवर्ड असेल तो टाकून खालिल कॅपचा टाकावा व Login वरती क्लिक करावे.

४) त्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेतील मुख्याध्यापक माहिती असलेले पेज येईल. त्याठिकाणची सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. कांही बदल असतील तर ते बदल करून खाली असलेलल्या सेव्ह या बटणवर क्लिक करावे.

५) त्यानंतर आपणास कोणती Student Request आली असेल तर ती Approve करून घ्यावी तसेच Attach मधील Request देखील पहावी.

६) सर्व  Student Request पाहिल्यानंतर वर असणाऱ्या Student Promotion Tab वर माऊस घेऊन गेल्यानंतर खाली येणाऱ्या Student Promotion 1 to 8 standard या Tab वर क्लिक करावे.

७) आपल्या समोर सन २०२०-२१ मध्ये आपल्या शाळेत असणाऱ्या विद्यार्थीची माहिती दिसेल. इयत्ता व समोर त्या इयत्तेतील विद्यार्थी संख्या दिसेल त्या संख्यावर क्लिक करावे.

७) लगेच आपल्या समोर आपल्या शाळेत सन २०२०-२१ मध्ये त्या इयत्तेत असणारी विद्यार्थी खालच्या बाजूला दिसून येतील.

८) Check, GR No., Student ID, Student Name, Gender, Date of Birth, Requested for Transfer, Pragat/Apragat असे विविध रकाने दिसून येतील यामधील सर्व विद्यार्थ्यांना चेक करून खाली असलेल्या Promote बटणवक क्लिक करावे.

९) आपणास Are you sure to promote this students? असा मेसेज येईल त्याला आपण Ok करावे.

१०) आपणासमोर आलेल्या Promotion Completed Successfully या मेसजला ok करावे लगेच आपले विद्यार्थी सन २०२१-२२ मध्ये प्रमोट झालेले दिसतील.

११) अशाच प्रकारे आपले सर्व विद्यार्थी आपण एक एक वर्ग घेऊन प्रमोट करावेत.

    अशा प्रकारे आज आपण 2021-22 Vidyrthi pramosan kase karave विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2021-22? याविषयी माहिती पाहिली अधिक माहितीसाठी आपण खालिल व्हिडिओ पाहू शकता.

मार्गदर्शक व्हिडिओ- 


अधिक माहितीसाठी भेट द्या- Teacher4u

Post a Comment

0 Comments