अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, अध्ययन निष्पत्ती प्रश्नपत्रिका, अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका learning outcomes ncert learning outcomes example, types of learning outcomes,learning outcomes pdf, what are learning outcomes in teaching, learning outcomes definition, importance of learning outcomes, learning outcomes and learning objectives.
अध्ययन निष्पत्ति विषय मराठी learning
outcomes
इयत्ता तिसरी
अध्ययनार्थी-
1) सांगितली जाणारी गोष्ट, कथा,
कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.
2) गोष्टी कविता इत्यादी योग्य आरोह-अवरोहांसह ,
योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात.
3) ऐकलेल्या गोष्टी, कविता,
विषय, पाञ, शीर्षक
इत्यादीबाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपली प्रतिक्रिया देतात, आपले मत मांडतात, स्वतःच्या पध्दतीने (गोष्टी, कविता इ.) स्वतःच्या
भाषेत व्यक्त करतात.
3) आपल्या परिसरात घडणारे प्रसंग/घटना आणि भिन्न
परिस्थितींत आलेले स्वतःचे अनुभव व्यक्त करतात, त्याविषयी
चर्चा करतात आणि प्रश्न करतात.
4) गोष्टी, कविता किंवा इतर
साहित्यप्रकार समजून घेऊन त्यात स्वतःच्या माहितीची भर घालतात.
5) विविध साहित्यप्रकार / लेखनप्रकार (उदा
वर्तमानपञ बालसाहित्य ) समजपूर्वक वाचून त्यांवर आधारित प्रश्न विचारतात, स्वतःचे मत व्यक्त करतात, शिक्षक, मिञ याच्याबरोबर चर्चा करतात, विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे तोंडी व लेखी स्वरूपात देतात.
6) विविध प्रकारच्या रचना/मजकूर (उदा. वर्तमानपञ,
बालसाहित्य, जाहिराती) समजपूर्वक वाचल्यानंतर
त्यावर आधारित प्रश्न विचारतात, आपले मत देतात, शिक्षक , मिञ, यांच्याबरोबर
चर्चा करतात व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी व सांकेतीक भाषेत देतात.
7) विविध साहित्यप्रकारांत आलेल्या नवीन शब्दांचा
अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात.
8) विविध प्रकारच्या कथा, कविता, इतर साहित्य यांतील भाषेचे बारकावे ओशखून त्यांचा योग्य वापर करतात.(उदा. शब्दांची पुनरावृत्ती, नाम, सर्वनाम, विरामचिन्हे)
9) विविध प्रकारचा मजकूर (उदा. वर्तमानपञ, बालसाहित्य, सूचनाफलक) समजपूर्वक वाचून त्यावर
आधारित प्रश्न विचारतात, मत व्यक्त करतात, शिक्षक, मिञ यांच्यबरोबर चर्चा करतात.
10) स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरविलेल्या
कृती अंतर्गत जागरूकतेने व स्व-नियंञित पध्दतीने लेखन करतात.
11) विविध उद्दिष्टांसाठी लेखन करताना शब्दांची
निवड, वाक्यरचना लेखनाचे स्वरुप (उदा मिञास पञ, भित्तिपञिकेचे संपादन) यांना अनुसरून निर्णय घेत लेखन करतात.
12) विविध उद्दिष्टांसाठी लेखन करताना विरामचिन्हे,
पूर्णविराम, स्वल्पविराम इ.) समजपूर्वक वाचन
करून , त्यावर आपले मत लिहतात व विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे लिहितात.
अध्ययन निष्पत्ति विषय गणित learning
outcomes
विषय गणित इयत्ता तिसरी
अध्यनार्थीः-
1) तीन अंकी संख्यावर क्रिया करतात.
2) 999 पर्यंतच्या संख्या स्थनिक किमतीचा उपयोग
करून वाचतात व लिहतात.
3) 999 पर्यंतच्या संख्यांच्या स्थानिक किमतीचा
उपयोग करून तुलना करतात.
4) 999 पेक्षा जास्त बेरीज होणार नाही अशा 3
अंकी संख्यांची बिन हातच्याची व हातच्याची बेरीज व वजाबाकी करतात.
5) परिस्थिती / संदर्भ यांचे विश्लेषण करून
संख्यांवरील योग्य क्रियांचा वापर करातात.
6) समान गट किंवा वाटणीच्या मदतीने भागाकार
क्रियेचा अर्थ स्पष्ट करतात आणि पुन्हा पुन्हा वजाबाकीच्या क्रियेद्वारे
भागाकाराचा अर्थ शोधून काढतात.
7) उदा. 12 ÷ 3 म्हणजे
प्रत्येकी 3 चा गट याप्रमाणे 12 वस्तू
होण्यासाठी किती गट लागतील किंवा 12 मधून 3 ही संख्या पुन्हापुन्हा किती वेळा वजा करता येईल?
8) कमी रकमेची बेरीज व वजाबाकी हातचा घेऊन अथवा न
घेता करतात. दरांचे तक्ते आणि साधी बिले वनवितात. विद्यार्थी द्विमितीय आकार
समजावून घेतात.
९) डॉट ग्रीड कागद वापरून, घड्या घालून तसेच कागद काञण करून, सरळ रेषेच्या
साह्याने द्विमितीय आकार तयार करतात.
१०) कडा कोपरे आणि कर्णाच्या संख्येवरून द्विमितीय
आकाराचे वर्णन करतात. उदा. पुस्तकाच्या चार कडा, चार कोपरे
आणि दोन कर्ण असतात.
११) दिलेल्या जागेवर कुठेही जागा न सोडता दिलेल्या
आकाराच्या फरशीच्या साह्याने जागा भरून काढतात.
१२) सेंटिमीटर मीटर या प्रमाणित एककांच्या साहाय्याने
लांबी व अंतर मोजतात किंवा अंदाज करतात आणि एकमेकातील संबंध ओळखतात.
१३) वस्तूचे तराजूच्या साहाय्याने ग्रॅम व किलोग्रॅम
ही प्रमाणित एकके वापरून वजन करतात.
१४) काठी, पेन्सिल इत्यादी
एकाच मापाची अप्रमाणित एकके वापरून लांबी / अंतर मोजतात, तसेच
अंतराचा अंदाज करतात. कप, चमचा, बादली
या एकाच मापाची अप्रमाणित एकके वापरून भांडे, पिंप
इत्यादींची धारकता मोजतात व त्यांच्या धारकतांचा अंदाज करतात.
१५) अप्रमाणित एककाच्या मदतीने विविध भांड्यांच्या
धारकता / क्षमतांची तुलना करतात.
१६) दैनंदिन जीवनातील प्रसंग / घटनांमध्ये ग्रॅम
किलोग्रॅम, यांचा समावेश असणारी बेरीज वजाबाकी करतात.
१७) दिनदर्शिकेतील विशिष्ट दिवस आणि तारीख ओळखतात.
१८) तास, दिवस या
कालावधीनुसार घटना / प्रसंगातील क्रम लावतात. उदा. मूल अधिक काळ शाळेत असते का घरी?
1९) भिंतीवरील / हातातील
घड्याळावरून पूर्ण तासात अचूक वेळ सांगतात.
२०) साधे साकार आणि संख्यामालिका या प्रकारच्या
आकृतीबंधांचा विस्तार करतात.
२१) सममितीवर आधारित भौमितिक आकृतीबंधांचे निरीक्षण
करतात,
जाणून घेतात व विस्तार करतात.
२२) तळ्याच्या खुणांच्या साह्याने माहितीची नोंद
करतात. चिञाच्या साहाय्याने नोंद करातात. चिञाच्या साहाय्याने माहिती दर्शवितात
आणि निष्कर्ष काढतात.
अध्ययन निष्पत्ति विषय English learning
outcomes
विषय English इयत्ता तिसरी
Subject English Std 3 Std
The Learner –
१) Listen attentively for various purposes.
२) Note the characteristic of spoken English.
३) Guess the meaning of words and phrases form
context.
४) Recites their own favorite poems and songs
individually, in groups and in pairs with actions.
५) Takes part and enjoys in role play, short skit
and dramatization in English with appropriate expressions.
६) Reads aloud groups of words, short sentences
with proper pauses, stress, intonation, place and expressions.
७) Read small texts in English silently with
comprehension and understand the details of English texts.
८) Responds appropriately to a chain of
instructions, requests etc.
९) Participates in conversation and speaks
briefly about topic.
१०) Writes dictation of words, phrases
and sentences.
११) Uses meaningful short sentences in
English orally and in writing. Uses a variety of nouns, pronouns, adjectives
and prepositions.
१२) Identifies opposites like
‘day/night’, ‘close/open’, and such others.
१३) Reads aloud meaningfully with the
help of punctuation makes and uses other punctuation makes appropriately/
correctly.
१४) Reads and understands charts,
tables, time tables, maps and posters on the classroom walls.
१५) Makes simple enquiries and polite
request and communicates their personal needs and feelings.
१६) Describes things, pictures, events
and festivals etc using simple and short sentences.
१७) Reads and understands English form
the surroundings.
१८) Writes all letters correctly and
proportionately.
१९) Write letters and words with
proper space.
२०) Participates in skills, playlets
with interest.
२१) Quickly thinks of words related to
a given word or picture.
२२) Uses punctuation such as question
mark, full stop, and capital letters appropriately.
अध्ययन निष्पत्ति विषय परिसर अभ्यास
learning outcomes
विषय परिसर अभ्यास इयत्ता तिसरी
अध्ययानार्थीः-
१) आसपासच्या परिसरातील वनस्पती पाने, खोड, साल इत्यादींची सर्वसाधारण निरीक्षणक्षम
वैशिष्ट्ये (जसे आकार, रंग, पोत,
गंध, ओळखतात आणि प्राणी / पक्षी यांच्या
सर्वसाधारण वैशिष्ट्यांना उदा हालचाल, कोठे सापडतात/ ठेवले
जातात, खाण्याच्या सवयी, आवाज इत्यादी)
ओळखतात.
२) कुटुंबातील व्यक्तीसोबत आणि व्यक्तीमधील नातेसंबंध
ओळखतात.
परिसरातील वस्तू, चिन्हे (भांडी,
चुली, वाहतूक साधने, सप्रेषणाची
साधने, चिन्हफलक इत्यादी) स्थाने (घरांचे/ निवा-याचे प्रकार,
बसस्थानके, पेट्रोल पंप इत्यादी) घरांमध्ये/
शाळेमध्ये/ आशपास घडणारे उपक्रम (लोक करत असलेली कामे, स्वंयपाकाच्या
प्रक्रिया इत्यादी) ओळखतात.
३) कुटुंबातील व्यक्तींच्या भूमिका, कुटुंबाचा प्रभाव (गुणवैशिष्ट्ये / वैशिष्ट्ये/ सवयी/ पध्दती) सोबत
राहण्याची गरज, विभिन्न प्रकारांनी स्पष्ट करतात.
४) विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या , पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजा,
अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परीसरातील वा घरातील पाण्याच्या
उपयोगाचे वर्णन करू शकतात.
५) वस्तू, पक्षी, प्राणी वैशिष्ट्ये उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील
साम्य भेदाचा वापर करून गट तयार करतात.
६) वर्तमानकालीन व भूतकाळातील (वडिलधा-यांच्या
काळातील) वस्तू/कृती यांच्यातील भेद स्पष्च करतात. (उदा. कपडे/भांडी/खेळले जाणारे
खेळ/लाकांची कार्ये इत्यादी)
७) चिन्हे/प्रतिके वापरून/तोंडी पध्दतीने साध्या नकाशाद्वारे
(घर/शाळा/वर्ग) या ठिकाणांचे स्थान / दिशा ओळखतात.
८) रोजच्या जीवनातील सामग्री/उपक्रमांची संख्या, गुणधर्माचा अंदाज लावतात, त्यांना प्रमाणित व
अप्रमाणित मापांनी तपासतात.(जसे हातभर, चमचाभर, भांडेभर इत्यादी)
९) विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली निरिक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात आणि आकृतिबंधाबद्दल भाकित
करतात.(चंद्रकला,ऋतू)
१०) विभिन्न चिञे, डिझाईन, रुपचिन्हे काढतात, प्रतिकृती विभिन्न वस्तूच्या
वरच्या, समोरच्या किंवा बाजूचे दृश्य काढू शकतात, सामान्य नकाशे (वर्गाचे, शाळा, घरातील विभाग इत्यादी काढतात)
११) विभिन्न खेळांतील (स्थानिय, मैदानी, वर्गातील इत्यादी) आणि इतर सामूहिक उपक्रमात
नियम पाळतात.
१२) चांगल्या – वाईट स्पर्शाबद्दल आपले मत प्रकट
करतात.
१३) परिसरातील झाडे, प्राणी,
वडीलधारी, दिव्यांग आणि विविध कुटुंबाच्या
रचनेच्या संबंधी संवेदन दाखवतात.
१४) शहर व गाव यातील फरक सांगतात.
१५) आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील वाहतुकीच्या
सोई व प्रसिध्द ठिकाणे नकाशात दाखवतात.
१६) नकाशाच्या आधारे जिल्हा , राज्य, देश यांची माहिती दिशांनुसार सांगतात.
१७) दिवस साञ यांच्याशी, सजीवांच्या क्रियांशी असलेला संबंध सांगतात.
१८) मानवाच्या गरजेतून व्यवसाय व उद्योगांची निर्मिती
होते हे सांगतात.
१९) परिसरातील प्राणी / पक्षी यांच्या राहण्याची
ठिकाणे ९रहिवास) यांची वैशिष्ट्ये, साम्यभेद या
अनुषंगाने वर्गीकरण करतात.
अ.क्र | इयत्ता | नोंदी |
---|---|---|
१) | पहिली | पहा |
२) | दुसरी | पहा |
३) | तिसरी | पहा |
४) | चौथी | पहा |
५) | पाचवी | पहा |
६) | सहावी | पहा |
७) | सातवी | पहा |
८) | आठवी | पहा |
९) | अध्ययन निष्पती | पहा |
0 टिप्पण्या