Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख परीक्षा अभ्यासक्रम केंद्रप्रमुख भरती २०२३ अभ्यासक्रम

केंद्रप्रमुख परीक्षा अभ्यासक्रम केंद्रप्रमुख भरती २०२३ 

 केंद्रप्रमुख भरती सन २०२३-२४ बाबत सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे.  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

केंद्रप्रमुख भरती २०२३ अभ्यासक्रम


केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत.

केंद्र प्रमुख भरती पात्रता :

जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील. 

केंद्रप्रमुख भरती २०२३ अभ्यासक्रम 

घटक उपघटक प्रश्न संख्या गुण
बुध्दिमत्ता व अभियोग्यता अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. १०० १००
शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय १० १०
शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य १० १०
माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक) १५ १५
अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती १५ १५
माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन २० २०
विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान १५ १५
row8 col 1 संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) १५ १५
एकुण २०० २००
@@@@

उपघटक 2 शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य

 
अ.क्र शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य
UNICEF
NCERT
NUEPA
NCTE
CCRT
TISS
TIFR
Homi Bhabha Center of Science: Education
RTE
१० EFLU
११ MPSP
१२ SCERT
१३ MIEPA
१४ SISI
१५ DIET
राज्य आंग्लभाषा


@@@@

उपघटक ३ माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

 
अ.क्र माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषण
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
@@@@

उपघटक 4 अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती 

अ.क्र अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती
A) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
B) अध्ययन निष्पतीतील उणीवा
C) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
D) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य:ASER, NAS, PISA
E) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
F) निकालासंबंधीची कामे
@@@@
उपघटक 5 माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
 
अ.क्र माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
प्राप्त माहितीचे विश्लेषण
शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
संप्रेषण कौशल्य समाज संपकांची विविध साधने उपघटक
@@@@

विषयनिहाय आशवज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान-

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

ब) चालू घडामोडी] विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी

या वरील अभ्यासक्रमावर परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.  प्रश्नपत्रिका एक एकूण गुण २००. लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल, परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. यावर प्रश्न विचारले जातील.

आपणास हे ही आवडेल.

आपणास हे ही आवडेल

१) केंद्रप्रमुख भरती पत्रक click here

२) केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावा. click here

३) रिक्त पदे  click here

४) केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम click here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या