Ticker

6/recent/ticker-posts

Kendrapramukh केंद्रप्रमुख सभाव्य रिक्त पदे केंद्रप्रमुख भरती २०२३

 केंद्रप्रमुख सभाव्य रिक्त पदे केंद्रप्रमुख भरती २०२३

केंद्रप्रमुख भरती सन २०२३-२४ बाबत सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे.  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

Kendrapramukh केंद्रप्रमुख सभाव्य रिक्त पदे केंद्रप्रमुख भरती २०२३


केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत.

केंद्र प्रमुख भरती पात्रता :

जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील.

केंद्रप्रमुख सभाव्य रिक्त पदे 

शासन निर्णय दि. ०१/ १२ / २०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दु शाळांची संख्या विचारात घेवून उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करतील. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३' चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे. २.१ वेतन श्रेणी :- एस १५ : ४१८०० - १३२३००.

केंद्रप्रमुख भरती २०२३ साठी रिक्त पदे

अ.क्र

जिल्हा

सभाव्य रिक्त पदे

०१

नाशिक

१२२

०२

नंदुरबार

३३

०३

धुळे

४०

०४

जळगांव

८०

०५

अमरावती

६९

०६

बुलढाणा

६५

०७

अकोला

४२

०८

वाशिम

३५

०९

यवतमाळ

९०

१०

नागपूर

६८

११

वर्धा

४३

१२

भंडारा

३०

१३

गोंदिया

४२

१४

गडचिरोली

५०

१५

चंद्रपूर

६६

१६

औरंगाबाद

६४

१७

हिंगोली

३४

१८

परभणी

४३

१९

जालना

५३

२०

बीड

७८

२१

लातूर

५०

२२

उस्मानाबाद

४०

२३

नांदेड

८७

२४

रायगड

११४

२५

पालघर

७५

२६

पुणे

१५३

२७

अहमदनगर

१२३

२८

सोलापूर

९९

२९

कोल्हापुर

८५

३०

सांगली

६७

३१

सातारा

१११

३२

रत्नागिरी

१२५

३३

सिंधुदूर्ग

६१

३४

ठाणे

४७

@@@@

वर नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  शासन निर्णय दि. ०१/१२/२३२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दु शाळांची संख्या विचारात घेवून उर्दु माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करतील.

आपणास हे ही आवडेल

१) केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम click here

२) केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावा. click here

३) रिक्त पदे  click here



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या