Ticker

6/recent/ticker-posts

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण सन २०२३-२४ बाबत महत्वाचे

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण सन २०२३-२४ बाबत महत्वाचे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे शासनाने नियोजन व संनियंत्रण SCERT कडे दिलेले आहे. त्यानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नियोजन करण्यात येत आहे. .या आगोदर म्हणजे मागील शैक्षणिक सतेरात देखील असे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. त्याद्वारे शिक्षकांना Nivad shreni training online प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशि७णाचा यशस्वी टप्पा पुर्ण करण्यात आला आहे. 

वरिष्ठ-वेतन-श्रेणी-प्रशिक्षण सन २०२३-२४


Nivad shreni training- 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण SCERT कडे दिलेले आहे. त्यानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023 नियोजन करण्यात येणार आहे त्या बाबतचे मा. संचालक यांंच्या मार्फत एक पत्रक देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० जा.क्र. राझे संप्रपम /आय.टी/२०२३-२४/02130 दिनांक : ११.०५.२०२३ ते पत्रक खालिल प्रमाणे. 

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पत्रक- 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

जा.क्र. राझे संप्रपम /आय.टी/२०२३-२४/02130 दिनांक : ११.०५.२०२३

प्रति,

मा. आमदार सुधाकर अडवाले

सदस्य विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ

विषयः वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण विनाशुल्क तत्काळ आयोजित करणेबाबत.

संदर्भ: १. आपलेकडील पत्र क्र ३४/२०२२-२३. दि.२३.०३.२०२३ ( या कार्यासनास प्राप्त दि.११.०५.२०२३)

२. शासन पत्र क्र. शिप्रधो-२०११/प्र.क्र.६७/प्रशिक्षण, दि.०८.०५.२०२३. ३. शासन पत्र क्र. शिप्रधो २०२१/प्र.क्र.६७/प्रशिक्षण, दि.०६.१०.२०२१.

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्र.१ अन्वये आपले पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. संदर्भ क्र.२ अन्वये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणेस शासनाकडून परवानगी मिळाली आहे. तथापि आपलेकडील पत्रातील मुद्दा क्र २ नुसार प्रशिक्षण निशुल्क आयोजित करणेचे अधिकार या कार्यालयाच्या अखत्यारीत नाहीत. संदर्भ क्र २ नुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबतच्या सविस्तर लेखी सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून अंदाजे पुढील आठवडयात ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. माहितीस्तव सविनय सादर.

आपली विश्वासू,

उपसंचालक आय. टी. व प्रसार माध्यम विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

प्रतः माहितीस्तव सविनय सादर. 

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२.

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे ०१.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण सन २०२३-२४ बाबत महत्वाचे


वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण- 

हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे 

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
  • एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे. 

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  1. १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
  2. या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
  3. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
  • मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
  • शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  1. २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
  2. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    क)
    1. प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
    2. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
    3. माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण मागील प्रशिक्षण अहवाल - 

प्रशिक्षणार्थी -  94546

प्रशिक्षण सुरू - 8585

प्रशिक्षण पूर्ण - 85961

प्रमाणपत्र वितरित - 85181

राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये आले होते. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होतेयामध्ये राज्यातील प्राथमिकमाध्यमिकउच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्यायचाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्याच प्रमाणे कार्यवाही होऊ शकते.

मागील वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण कशी झाली हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या