Ticker

6/recent/ticker-posts

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सन 2022

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सन 2022

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये प्रशिक्षण कसे करावे, चाचणी कशी सोडवावी, प्रमाणपत्र कसे मिळेल याविषयी माहिती दिली जाणार आहे. सदर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सत्र आपण या ठिकाणी पाहू शकणार आहात. 

वरिष्ठ-वेतन-श्रेणी-व-निवड-श्रेणी-प्रशिक्षण-सन-2022
 

राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि. १ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

वरिष्ठ /निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी

महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१२ वर्षाची अर्हताकारी सेवा

या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

२४ वर्षाची अर्हताकारी सेवा

अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

क) प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.

प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.

माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शन सत्र Link 


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण संपर्कासाठी -

📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर :https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक :https://www.facebook.com/MahaSCERT

📌 युट्यूब:https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw

 आपणास हे ही आवडेल -

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ महत्वाच्या सूचना 


प्रशिक्षण लिंक - https://infyspringboard.onwingspan.com/web/en/app/profile/dashboard 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या