OTT MHRDD Teacher Online Transfer Portal आंतर जिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती / कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या / बदली करून घेतलेल्या शिक्षकांवरील कारवाईबाबत सूचना
शासनामार्फत शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यासाठी TEACHER TRANSFER MANAGEMENT SYSTEM तयार केली असून अशा Ott Mhrdd पोर्टल मार्फत बदली प्रक्रिया रावली जात आहे. बदली प्रक्रिया राबवत असताना शिक्षकांना ढनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. असे अर्ज भरत असताना जाणीवपूर्व चूकीची माहिती सादर केल्यास कोणती कार्यवाही करावी याबाबत नुकत्याच काही सूचना देण्यात आल्या.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. E-mail ID:- est१४-rdd@mah.gov.in दूरध्वनी क्र.:-
०२२-२२०१७१०३
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) आजिब- ४८२०/प्र.क्र.
१९१/आस्था-१४ दिनांक :- ११ ऑगस्ट, २०२२.
संदर्भ : १) शासन परिपत्रक क्र. जिपब-४८१७/(प्र.क्र.१४३/२०१८) आस्था- १४, दि.२८/०६/२०१८ २) शासन निर्णय क्र. आजिब] ४८२०/प्र.क्र.२९१/आस्था.१४, दि.०७.०४.२०२१
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन २०२२ मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर घोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ठरविण्यात आलेले धोरण व त्यानुषंगाने वेळेवेळी देण्यात आलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून सदर धोरणातील तरतूदीप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळेवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग १ शिक्षक यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेल्या अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णत: खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरुन अर्ज करणे अपेक्षित आहे. शिक्षकी पेशा हा उदात्त पेशा असल्यामुळे व भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तींकडून अर्ज भरतांना जाणीपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रे / कागदपत्रे / माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही.
तथापि, काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतांनाही जाणिवपूर्वक खोटया व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत, अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे जर अर्ज भरल्यास व त्याआधारे काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा स्वरुपाच्या तक्रारींची विहित वेळेत चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. सबब, वरील बाबी विचारात घेऊन आता खालीलप्रमाणे. कार्यवाही करण्याच्या सूचना देत आहेत.
ऑनलाईन बदल्या करण्यासाठी सूचना-
अ) जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना-हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग-१ शिक्षक या संवर्गात अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी.. अशी पडताळणी करतांना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम टप्प्या टप्याने दि. १२, १३ व १४ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
(ब) पडताळणीअंती, ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोटया व चुकीच्या
प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित
संवर्गातून बाद करण्यात यावा व संदर्भाधीन क्र. १) येथील जि. २८/०६/२०१६ च्या शासन
परिपत्रकातील तरतूदीनुसार विहित कार्यपध्दती अनुसरुन संबंधित शिक्षकांची एक
वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. मात्र, बदल्यासंदर्भात
ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे, अशा शिक्षकास
नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.
1 टिप्पण्या
I am waiting for intra district transfer procedure
उत्तर द्याहटवा