Ticker

6/recent/ticker-posts

ott mahardd Onlie Teacher Transfer Portal जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना

 ott mahardd Onlie Teacher Transfer Portal प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना सन २०२२ 

ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे. 

ott-mahardd-Online-Teacher-Transfer-Portal

विषय : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत.....

संदर्भ: शासन निर्णय क्र. जिप ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था. १४. दि.०७.०४.२०२१ आणि

शासन निर्णय क्र. आंजिव ४८२०/प्र.क्र. २९१/आस्था १४, दि.०७.०४.२०२९.

 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्त्रये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी. संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) आपणास शासन स्तरावरुन वेळोवेळे निर्देश देण्यात आलेले आहेत,

२. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सदर प्रणालीचे अनावरण गुरुवार, दि.०९.जून २०२२ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास) महोदयांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून त्यासाठी खालीप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना

१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली www.ott.mahardd.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळाबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्व शिक्षकांना अवगत करावे व सदर संकेतस्थळास दररोज भेट देऊन संकेतस्थाळावर कार्यवाहीची मर्यादादेखील कटाक्षाने पाळण्याच्या सूचना द्याव्यात. 

२) राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या संच मान्यता अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत सन २०२१-२२ च्या संचमान्यता या सन २०२०-२१ च्या संचमान्यतेप्रमाणे कायम ठेवाव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील दि.०९/०६/२०२२ च्या पत्रान्वये दिले आहेत. त्यामुळे सन २०२२ या वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सन २०२०-२१ च्या संचमान्यता विचारात घेऊन कराव्यात. 

३) कोविड- १९ आजाराच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषदेच्या रोस्टरची (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नाही. त्यामुळे संदर्भीय शासन निर्णयातील तरतूदीनुसार यावर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पध्दतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी रोस्टरची (बिंदु नामावली) तपासणी करून घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा.

४) काही शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात मा.न्यायालयाचे आदेश असल्यास सदर आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. एखाद्या शिक्षकाची एका विशिष्ट शाळेतून दुसऱ्या विशिष्ट शाळेत बदली करण्याचे मा. न्यायालयाचे विवक्षित आदेश असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वप्रथम अशा शिक्षकांची ऑफलाईन पध्दतीने बदली करावी.

तसेच, काही शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणी फक्त अर्जदार यांच्या बदलीसंदर्भातील विनंतीचा विचार करण्याचे मा.न्यायालयाचे निर्देश असल्यास, असे शिक्षक बदली पात्र नसतील तरीही, अशा शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रीयेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळविण्यात यावे व त्याची पोहोच ठेवावी.

५) आंतरजिल्हा बदली प्रकरणात, बदलीपात्र शिक्षकाकडे ज्या जिल्हा परिषदेमध्ये जायचे आहे. त्या जिल्हा परिषदेकडील बिंदु नामावलीनुसार पद रिक्त असल्याचे / भविष्यात रिक्त होणार असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे, अशाच शिक्षकांचा ना-हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षकांत समावेश करावा.

तसेच सदर संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास, बदलीसाठी

सेवाजेष्ठता हाच निकष असल्याने, त्यांच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे जेष्ठता विचारात घेण्यात यावी,

सेवाजेष्ठता एक असल्यास वयाने जेष्ठ असलेल्या कर्मचान्याचा प्राथम्याने विचार करण्यात यावा. जन्मदिनांक एक असल्यास इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम असणाऱ्या कर्मचान्याचा प्राथम्याने विचार करण्यात यावा.

६) संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन / पदस्थापना सदर ऑनलाईन बदली प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावे.

प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीस्तव 

(का. गो. वळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

१) मा. मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई,

२) मा. राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई.

३) अ.मु. स. (ग्रामविकास) यांचे स्वीय सहायक, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, फोर्ट,

४) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व) मुंबई, 

५) श्री. आयुष प्रसाद (भाप्रसे), मु. का. अ., जि. प., पुणे तथा अध्यक्ष, जि. प. शिक्षक बदली अभ्यासगट

६) Vinsys IT Services (I) Pvt. Ltd. Shivaji Niketan, Tejas Society Kotharud, Pune,


आपणास हे ही आवडेल-

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या