Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण भाग 3

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 

परिशिष्ट १ अवघड क्षेत्राचे निकष

 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.

जिल्हा-परिषद-शिक्षकांच्या-जिल्हांतर्गत-बदल्यांसाठी-सुधारित-धोरण.

 

शासन निर्णय क्रमांक: जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४

२५. मर्झबान पथबांधकाम भवनफोर्टमुंबई - ४००००१, दिनांक : ७ एप्रिल२०२१

अधिक माहिती साठी आपण खालील संदर्भ परिपत्रक व शासन निर्णय अभ्यासू शकता वाचा :

१) शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक १५ मे२०१४

२) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था- १४ दिनांक २ जुलै२०१४

३) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१६/प्र.क्र.१३६ / आस्था १४दि. २ जानेवारी२०१७

४) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४दिनांक २७ फेब्रुवारी२०१७

५) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४दिनांक १५ एप्रिल २०१७

६) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र. ७/आस्था-१४दिनांक १७ मे२०१७

(७) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२६६/आस्था- १४ दिनांक ३१ मे२०१७

८) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब ४८१७/प्र.क्र.७/आस्था १४दिनांक ३१ मे२०१७

९) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२६६ / आस्था १४ दिनांक १२ सप्टेंबर२०१७

१०) शासन परिपत्रक क्र. जिपब४८१७/प्र.क्र.१४३/२०१८/आस्था १४दि.२८ जून२०१८ ११) शासन परिपत्रक क्र. जिपब४८१७/प्र.क्र.१४४/२०१८/ आस्था १४दि. २८ जून २०१८

१२) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४दिनांक ०८ मार्च२०१९

१३) शासन पुरक पत्र क्र. जिपब ४८१९/प्र.क्र.३७३/आस्था-१४दिनांक २८ मे२०१९

शासनाने यापूर्वी संदर्भ क्र. १ येथील दिनांक १५ मे२०१४ च्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भ क्र. २ व ३ वरील दिनांक २.७.२०१४ व दिनांक २.१.२०१७ च्या शुध्दीपत्रकान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केलेले होते. सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या. परंतू शिक्षक संवर्गाची मोठी संख्यात्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊनजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळ्याने विचार करुन शासनाने संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबतही जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन बदली प्रणालीद्वारे दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताजिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या,अध्यापनातील स्थैर्यशिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडी अडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

वरील बाबींचा विचार करुन शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापुर्वीच वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत संदर्भ क्र.४ ते १३ च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले होते. सदरचे संदर्भ क्र.४ ते १३ चे शासन निर्णय अधिक्रमीत करुन आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

व्याख्या :
१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.
१.२ सर्वसाधारण क्षेत्र : वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.
१.३ बदली वर्ष:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.
१.५ शिक्षक : या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक
१.६ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी है सक्षम प्राधिकारी असतील.
१.७ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेलअसे शिक्षक
१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.
१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक)मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. १.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार ( उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.

१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

१.९.२ पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.४ पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत संस्थेचा कर्मचारी असेल तरउदा. महानगरपालिका/नगरपालिका

१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

१.१० बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल.

परिशिष्ट १ अवघड क्षेत्राचे निकष

१) नक्षलग्रस्त / पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव

२) वार्षिक सरासरी पर्जन्यमान २००० मिलीमिटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव. (महसूल विभागाकडील माहितीनुसार) 

३) हिस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश. (संबंधित उप वनसंरक्षक यांच्या (अहवालानुसार)

४) वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा. (बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक) 

५) संवाद छायेचा प्रदेश (Communication Sthadow Area) (संबंधित महाप्रबंधक, BSNL यांच्या अहवालानुसार) 

६) डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार)

७) राष्ट्रीय राज्य महामार्गापासून १० कि.मी. पेक्षा जास्त दूर.

वरील प्रमाणे जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर ३ वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन करण्यात यावे.

अवघड-क्षेत्राचे-निकष

अशाप्रकारे वरीलपैकी तीन निकष पूर्ण करणारी शाळा अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून घोषित करण्यात येईल त्यासाठी सबळ पूरावे सादर करणे आवश्यक राहिल त्यानुसार समिती योग्य तो निर्णय घेईल. नुकतेच एक पत्रक आले होते ज्यामध्ये यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 


 

आपणास हे ही आवडेल.
1) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १

2) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १

3) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. नवीन बदल
 4) अवघड क्षेत्राचे निकष






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या