Ott Mahardd Online Teacher Transfer Portal 2022 शिक्षक बदली पोर्टल २०२२ शिक्षक प्रोफाईल माहिती कशी भरावी?
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal- Teacher Profile -
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात पोर्टल वर शिक्षक माहिती भरावयाची आहे ही माहिती दोन प्रकारात भरावयाची आहे. नोकरीचा तपशील कसा भरावा व कोणती माहिती भरावी याविषयीची माहिती आपणास देत आहे.
शिक्षकाचे प्रोफाइल 2 पृष्ठांमध्ये विभागलेले आहे (फॉर्म):
1. कर्मचार्यांचे तपशील - शिक्षकाची वैयक्तिक माहिती (ही माहिती बदलता येणार नाही)
2. नोकरी तपशील - शिक्षकांचे नोकरी-संबंधित तपशील (शिक्षक या फील्डमध्ये बदल करू शकतात)
शिक्षक प्रोफाईल माहिती कशी भरावी?
व्हिडिओ पहा-
ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-
Last Transfer Category :
1) Cadre 1- संवर्ग 1
2) Cadre 2- संवर्ग 2
3) Entitled - संवर्ग -3
4) Eligible- संवर्ग -4
5) NA- लागू नाही
Last Transfer Type :
1) Inter District- आंतर जिल्हा बदली
(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )
2) Intra District- जिल्हा अंतर्गत बदली
( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)
3) NA- लागू नाही
ऑनलाईन बदली माहिती भरण्यासंदर्भात सुचना अपडेट :-
1) ज्या शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली झाली असेल...किंवा
2) ऑफलाईन प्रशासकीय पद्धतीतून - पदोन्नती, अतिरिक्त समायोजन, शाळा एकात्रीकरण, पदपरावर्तन, अंशत बदल, इत्यादी कारणाने शाळा बदल झाला असेल किंवा...
3) या जिल्ह्यातील प्रथम नियुक्ती दिनांकापासून आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची बदली झाली नसेल तर..
अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या लॉगीन वरील Employment Details- या पेज मधील *"Last Transfer Category" व "Last Transfer Type" मध्ये NA (Not applicable) हा रिमार्क निवडवा.
Note :- वरील दोन्हीही टॅब या ऑनलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकरीताच लागू आहेत.
ऑफलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी "NA" हे Option निवडावे.
ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वाचे आजचे अपडेट
1) बदली पोर्टलवर कोणत्याही शिक्षकाने आज सायंकाळपर्यंत आपली बदली माहिती फायनल सबमिट करु नये .
२) प्रत्येकाने पोर्टलवर लॉगिन करुन पान क्रमांक ०१ वरील माहिती बरोबर आहे का पाहुन घ्यावी व काही तफावत असेल तर तालुका बदली कक्षाला आपली योग्य माहिती द्यावी .
Last Transfer Category :
1) Cadre 1- संवर्ग 1 मधुन
2) Cadre 2- संवर्ग 2 मधुन
3) Entitled - संवर्ग -3 अवघड मधुन
4) Eligible- संवर्ग -4 बदलीपात्र ,रॅंडम विस्थापित मधुन
5) Other - समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरउळे बदली , येणकेण प्रकारे बदली (हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला येणार आहे)
6) NA- प्रथम नेमणुक दिनांकापासुन पासुन याच शाळेत आहेत . लागू नाही
Last Transfer Type :
1) Inter District- आंतर जिल्हा बदली (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )
2) Intra District- जिल्हा अंतर्गत बदली ( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)
3) Other - वरील १ व २ प्रकार सोडुन
समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरमुळे बदली , येणकेण प्रकारे बदली हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला येणार आहे
4) NA - प्रथम नेमणुक दिनांकापासुन याच शाळेत आहेत लागू नाही
यावर्षी बदली पात्र किंवा अपात्र हे सर्व आपण Phase 1 मध्ये भरत असलेल्या माहितीच्या आधारे याद्या येणार आहेत
आपणास हे ही आवडेल-
1) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १
2) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १
3) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. नवीन बदल
4) अवघड क्षेत्राचे निकष
५) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना
0 टिप्पण्या