जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 2022 बाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असून या बदल्या 3 Phase मध्ये होणार आहेत.
1) Phase 1 : शिक्षक माहिती अपडेट करणे
2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली करणे
3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली करणे
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सध्या तरी कोणतेच पत्रक निर्गमित करण्यात आळेले नाही मात्र बदल्याबाबत Phase 1 लवकरच सुरू करण्यात येणार आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2 व 3 सुरू होईल.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 2022 शासन निर्णय-
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
क्रमांक संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.११७ /आस्था-१४ दिनांक : ०१ जून २०२२
मे. विन्सोस सॉफ्टवेअर कंपनी लि. पुणे.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 2022
विषय: सन २०२२ मध्ये या वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत मार्गदर्शन.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यास अनुसरून सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याकरिता मे. विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीचा नेमणूक करण्यात आलेली आहे. २. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील मुद्दा २.८ मध्ये "सदरच्या बदल्या ह्यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे." अशी तरतुद आहे.
ज्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असेल त्या जिल्हा परिषदेला बदली प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही, अशी कुठलीही तरतुद दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली नाही. सदरची बदली प्रक्रिया ही बिंदुला बिंदु अशापध्दतीने होणे अपेक्षीत आहे जर काही जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असल्यास त्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची नियुक्तो झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होईल. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदाची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असली तरी, अशा सर्व जिल्हा परिषदांना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे.
सबब, असे नमूद करण्यात येते की, मे. विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीने सन २०२२ मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबतच्या ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात यावा.
थोडक्यात-
या शासन निर्णयात असे सांगितले आहे की ज्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असेल त्या जिल्हा परिषदेला बदली प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही, अशी कुठलीही तरतुद दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली नाही. सदरची बदली प्रक्रिया ही बिंदुला बिंदु अशापध्दतीने होणे अपेक्षीत आहे जर काही जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असल्यास त्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची नियुक्तो झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होईल. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदाची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असली तरी, अशा सर्व जिल्हा परिषदांना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 2022 बाबत मा. आयुष प्रसाद साहेब यांनी केलेले मार्गदर्शन खालील व्हिडिओमध्ये पहा-
आपणास हे ही आवडेल.
1) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १
2) अवघड क्षेत्राचे निकष
3) बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक
4) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १
5) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. नवीन बदल
0 टिप्पण्या