Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण भाग 4

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. भाग 4

1) बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक
2) जिल्हांतर्गत बदल्यांसाठी माहिती प्रसिध्द करणे
3) शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे
4) शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे
5) शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.

जिल्हा-परिषद-शिक्षकांच्या-जिल्हांतर्गत-बदल्यांसाठी-सुधारित-धोरण.

शासन निर्णय क्रमांक: जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४

२५. मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई - ४००००१, दिनांक : ७ एप्रिल, २०२१

अधिक माहिती साठी आपण खालील संदर्भ परिपत्रक व शासन निर्णय अभ्यासू शकता वाचा :

१) शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक १५ मे, २०१४

२) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था- १४ दिनांक २ जुलै, २०१४

३) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१६/प्र.क्र.१३६ / आस्था १४, दि. २ जानेवारी, २०१७

४) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१७

५) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४, दिनांक १५ एप्रिल २०१७

६) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र. ७/आस्था-१४, दिनांक १७ मे, २०१७

(७) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२६६/आस्था- १४ दिनांक ३१ मे, २०१७

८) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब ४८१७/प्र.क्र.७/आस्था १४, दिनांक ३१ मे, २०१७

९) शासन निर्णय क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२६६ / आस्था १४ दिनांक १२ सप्टेंबर, २०१७

१०) शासन परिपत्रक क्र. जिपब४८१७/प्र.क्र.१४३/२०१८/आस्था १४, दि.२८ जून, २०१८ ११) शासन परिपत्रक क्र. जिपब४८१७/प्र.क्र.१४४/२०१८/ आस्था १४, दि. २८ जून २०१८

१२) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४, दिनांक ०८ मार्च, २०१९

१३) शासन पुरक पत्र क्र. जिपब ४८१९/प्र.क्र.३७३/आस्था-१४, दिनांक २८ मे, २०१९

शासनाने यापूर्वी संदर्भ क्र. १ येथील दिनांक १५ मे, २०१४ च्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भ क्र. २ व ३ वरील दिनांक २.७.२०१४ व दिनांक २.१.२०१७ च्या शुध्दीपत्रकान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केलेले होते. सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या. परंतू शिक्षक संवर्गाची मोठी संख्या, त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळ्याने विचार करुन शासनाने संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबतही जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन बदली प्रणालीद्वारे दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या,अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडी अडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

वरील बाबींचा विचार करुन शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापुर्वीच वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत संदर्भ क्र.४ ते १३ च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले होते. सदरचे संदर्भ क्र.४ ते १३ चे शासन निर्णय अधिक्रमीत करुन आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

व्याख्या :

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र : वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्ष:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक : या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक

१.६ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी है सक्षम प्राधिकारी असतील.

१.७ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक असतील.

1) बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक-

 म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल.

2) 2. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे-

२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे:- परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील.

२.२ प्रशिक्षण :- जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.

३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :-

         मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. ३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्हयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच  सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील.

त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी आहे, त्या जागा दाखविण्यात येतील.

समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.

अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.

शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.

शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे :

१ शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र शिक्षकांच्या (सर्वसाधारण तसेच अवघड क्षेत्र) याद्या प्रसिध्द करतील.

२ तसेच विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करतील.

३ उपरोक्त नमूद याद्यांबाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिध्द झाल्यापासून पाच दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील.  शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून पाच दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल. सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल.

शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे :

१ बदलीस पात्र शिक्षक यांचेकडून जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी मागविण्यात यावा. (सोबतच्या विवरणपत्रानुसार).

२ बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी देणे आवश्यक राहील. (सोबतच्या विवरणपत्रानुसार)

३.विशेष संवर्ग शिक्षक माग १ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केले प्रमाणे अर्ज करावा.

 4. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास, त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा.

5. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.

6.  बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.

 

आपणास हे ही आवडेल.
1) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १

2) विशेष संवर्ग शिक्षक भाग- १

3) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. नवीन बदल
 4) अवघड क्षेत्राचे निकष



 

 

 

 

 

 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या