Ticker

6/recent/ticker-posts

Online Teacher Transfer Ottmahardd जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत

 Online Teacher Transfer जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत महत्वाचे पत्रक

ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्याला अनुसरून नवीन शासन आदेश निर्गमणित करण्यात आले आहे.

Online-Teacher-Transfer-जिल्हा-परिषदेतील-प्राथमिक-शिक्षकांच्या-बदली

विषय : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत......

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोविड १९ आजाराच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषदेच्या रोस्टरची (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नसल्यास नाही. त्यामुळे संदर्भीय शासन निर्णयातील तरतूदीनुसार यावर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पध्दतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी रोस्टरची (बिंदू नामावली) तपासणी करुन घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा, असे आपणास संदर्भीय दि.१०/०६/२०२२ च्या शासन पत्रान्वये कळविले आहे.

तरी, परिच्छेद २ मध्ये नमूद केलेली आवश्यक ती आपल्या जिल्ह्याची अद्ययावत स्वाक्षरीत बिंदुनामावली Vinsys ITServices (I) Pvt. Ltd यांना दिनांक २८ जून, २०२२ पूर्वी उपलब्ध करून द्यावी. सदर बाब आंतरजिल्हा बदलीसाठी अत्यावश्यक असल्याने विलंब कटाक्षाने टाळावा.

अशाप्रकारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी पुढील टप्पा राबवण्यासाठी हे पत्रक निर्गमित करण्यात आळे आहे. या पत्रकानुसार सर्व सीईओ यांना आपली रोस्टरची (बिंदू नामावली) पुरवण्यास सांगण्यात आले आहे. 


शिक्षक बदली पोर्टल २०२२ शिक्षक प्रोफाईल माहिती कशी भरावी?
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या