भारत सरकारकडून सर्व व्यवस्थापनाच्या इ. १ ली ते इ. १२ वी मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविलेले आहे. त्यानुसार सन २०२४-२५ यू-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थी अपार आयडी, आधार बाबतचे कामकाज पूर्ण करून ऑनलाइन पूर्ण भरून अंतिम करावयाची आहे. यु-डायस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, नीती आयोग, शाश्वत विकास ध्येय, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), शालेय पोषण आहार (MDM), School Education Quality Index (SEQI) निर्देशाकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.
शाळा स्थरावरून सन २०२४-२५ यू-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थी अपार आयडी, आधार बाबतचे कामकाज पूर्ण करून ऑनलाइन पूर्ण भरून अंतिम करावयाची आहे. त्याबाबत आपणास कोणकोणते कामे पूर्ण करावयाची आहेत. याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत.
Udise+ Aadhar Update Apaar Id
Udise+ Aadhar Update Apaar Id या कामकाजाबाबत विविध पत्रके निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्याविषयीचा माहिती खालीलप्रमाणे.
१. या कार्यालयाचे दिनांक २५.६.२०२४ रोजीचे पत्र संदर्भ
२. या कार्यालयाचे दिनांक ४.७.२०२४ रोजीचे पत्र
३. या कार्यालयाचे दिनांक ७.८.२०२४ रोजीचे पत्र
४. या कार्यालयाचे दिनांक १२.८.२०२४ रोजीचे पत्र
५. या कार्यालयाचे दिनांक १२.९.२०२४ रोजीचे पत्र
६. या कार्यालयाचे दिनांक २७.९.२०२४ रोजीचे पत्र
७. या कार्यालयाचे दिनांक ४.१०.२०२४ रोजीचे पत्र
८. या कार्यालयाचे दिनांक १८.१०.२०२४ रोजीचे पत्र
९. मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दिनांक २३.१०.२०२४ रोजीच्या बैठकीतील सूचना
१०. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांचे दिनांक २३.१०.२०२४ रोजीचे निर्देश
११. या कार्यालयाचे दिनांक १२.११.२०२४ रोजीचे पत्र
१२. मा. राज्य प्रकल्प संचालक, मप्राशिप मुंबई यांचेकडील दिनांक १३.११.२०२४ रोजीचे प्राप्त पात्र
अ. यु डायस प्लस प्रणालीच्या माहितीनुसार-खालीलबाबी पूर्ण करून घेणे
१. इली १. ते इवी १२. मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करणे.
२. यूडायस मध्ये इ. ली ते इ १.१२ वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे.
३. ड्रॉप बॉक्स मध्ये आढळून आलेले विद्यार्थी इम्पोर्ट करून ड्रॉपबॉक्स निरक करणे,
४. शून्य पटसंख्या असलेल्या शाळा
५. शून्य शिक्षकी शाळा
६. बांधकाम (इमारत, वर्गखोली दुरुस्ती, स्वच्छतागृह, शौचालय, Ramp, Electricity, किचन शेड, पाणीसुविधा, Cwsn शौचालय इ.) बाबतच्या अचूक नोंद झाली असल्याची खातरजमा करण्यात यावी.
७. दिव्यांग विद्यार्थी (Cwsn students entry, special Educator, Facility, cwsn special school) च्या नोंदी परिपूर्ण तपासणे,
८. इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये विद्यार्थी Repeater मध्ये आढळून आलेले आहेत.
९. PGI मानांकन करिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी (CRC BRC visit, Youth club, Eco club, Teacher ID card, PFMS) च्या शाळांची अचूक नोंद झाली असल्याची खातरजमा करण्यात यावी.
१०. ICT व CAL Lab देण्यात आलेल्या शाळांची अचूक नोंद झाली असल्याची खातरजमा करण्यात यावी.
ब. शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षा विषयक उपाययोजना
१. तालुका / न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
२. तालुका/न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळा व परिसरात कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांची चारित्र पडताळणी करणे.
३. तालुका/न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळा व परिसरात ६ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचा-यांची नियुक्ती करणे.
४. तालुका / न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे,
५. तालुका/न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठित करणे.
६. तालुका/न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठित करणे.
७. तालुका / न.पा./मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये परिवहन समिती गठित करणे.
क. महावाचन उत्सव २०२४
१. इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे लेखन साहित्य महावाचन वेबसाईट वर शाळेने गुणांकन करून अपलोड करणे.२. तालुका स्तरावर अश्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणांकन करून ३ गटामधून प्रत्येकी ३ विद्यार्थी जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे.
ड. सरल प्रणाली
१. सरल प्रणालीत नोंदणी असलेल्या सर्व विद्यार्थी यांचे आधार नोंदणी व आधार अद्ययावत करून घेणे.२. सरल प्रणालीत शाळा पोर्टलवरील सर्व माहिती अचूक भरून घेणे,
३. शाळेचे व्यवस्थापन, माध्यम व प्रवर्ग अचूक असल्याची पडताळणी करणे.
ई. शालेय पोषण आहार (MDM)
१. शालेय परसबाग२. MIS डाटा एंट्री व इतर बाबी
फ. जिल्हा परिषद व खाजगी शाळा संचमान्यता
१. संचमान्यता शिक्षक वर्किंग पोस्ट भरणे
२. संचमान्यता दुरुस्ती
स. अनधिकृत शाळा
१. नोटिस बजावणे
वरील सर्व कामे येत्या काही दिवसात शाळा स्तरावरून पूर्ण करून घेतली जाणार आङेत तेव्हा आपण आपल्या शाळा स्तरावर तयारी करून घ्यावी. शाळा स्थरावरून सन २०२४-२५ यू-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थी अपार आयडी, आधार बाबतचे कामकाज पूर्ण करून ऑनलाइन पूर्ण भरून अंतिम करावयाची आहे. यागोष्टीची पूर्व तयारी करून घ्यावी.
0 टिप्पण्या