Unified District Information System for Education Plus UDISE+ बाबत

Unified District Information System for Education Plus UDISE+ बाबत  महत्वाचे 

About Unified District Information System for Education Plus UDISE+ Timely and accurate data is the basis of sound and effective planning and decision-making. Towards this, the establishment of a well-functioning Sustainable Educational Management Information System is of utmost importance today.

Unified District Information System for Education Plus (UDISE+) is one of the largest Management Information Systems initiated by Department of School Education and Literacy, Ministry of Education, GoI covering more than 14.89 lacs of schools, 95 lacs of teachers and 26.5 crores of children.

The entire system is online and has been collecting data in real-time since 2018-19. UDISE+ has a mandate of collecting information from all recognized schools imparting formal education from Pre-primary to class XII. Information collected through the digital platform, UDISE+ is utilized for planning, optimizing resource allocation and implementing various education-related programs and assessing progress. UDISE+ provides a platform to organize and classify all school data across the country and build a credible database of school data. It monitors, measures and keeps track of vital KPIs related to school performance.

Unified District Information System for Education Plus UDISE+ बाबत


युडायस प्लस बाबत - 

शैक्षणिक वर्षे सन २०२२-२३ मधील विद्यार्थी माहिती भरण्याबाबतच्या सूचना आपणाना सर्वांना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे आपण Udise+ Portal वर विद्यार्थी शिक्षक माहिती यापुर्वीच भरलेली आहे. Unified District Information System for Education Plus (Uidise+) Portal वर आपण ही माहिती भरलेली आहे. सोबतच शिक्षक माहिती देखील आपण भरलेली आहे. udise+ बाबत नुकतेच एक पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपणास कांही महत्वाच्या बाबी करावयाच्या आहेत. सर्वप्रथम ते पत्रक पाहू या.

UDISE+ बाबत पत्रक- 

महाराष्ट्र निपुण भारत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई मार्फत जा.क्र.गप्राशिप/सशि/UDISE/IF/ (13/24/२०२३-२४/9823: 17 MAY 2023 या जावक क्रमांकाने सदरचे पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. हे पत्रक  १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व २) आयुक्त, महानगरपालिका, सर्व यांना उद्देशून काढण्यात आलेले आहे. 

पत्रकाचा विषय-   विषय विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे U-DISE प्लस प्रणालीमध्ये अचानकपणे कमी नोंदी आढळून आल्याबाबत.

पत्रकाचा संदर्भ -  हाराष्ट्र निपुण भारत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई  या कार्यालयाने दि. २९/०५/२०२३ रोजी आयोजित केलेल्या झूम मिटिंग

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, सोबत जोडलेल्या तक्त्यात नमूद माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील विशेष गरजा असणान्या विद्यार्थ्यांची संख्या U-DISE प्लस प्रणालीमध्ये अत्यंत कमी दिसून येत आहे. अशी तफावत येणे ही बाब खेदजनक असून याबाबत संगणक प्रोग्रामर, जिल्हा सक्षमीकरण समन्वयक (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था), समावेशित शिक्षण समन्वयक (जिल्हा परिषद/ महानगरपालिका), समन्वयक (शाळाबाह्य) व MIS को-ऑडिनेटर यांनी सुयोग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. U-DISE प्लस प्रणालीमधील विशेष गरजा असणान्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय व शाळानिहाय माहिती संगणक प्रोग्रामर यांनी जिल्हा सक्षमीकरण समन्वयक (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व समावेशित शिक्षण समन्वयक (जिल्हा परिषद / महानगरपालिका) यांना देऊन सदर माहितीमध्ये आलेली तफावत तपासण्याचे काम U-DISE प्लसचे कामकाज पाहणारे विषयतज्ज्ञ (भाषा, गणित, सामाजिकशास्त्र), विषयता (CWSN), रिसोर्स टिचर, थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट व डेटा ऑपरेटर यांचेकडून सर्व शाळा U-DISE नुसार तपासून घेऊन संबंधित अधिकारी / गटशिक्षणाधिकारी यांचेकडून प्रमाणित करून घ्यावेत.

विशेष शाळांना सलग्न असलेले स्पेशल सेंटर यांची मान्यता व तत्सम बाबी तपासून घ्याव्यात यामध्ये दिरुक्ती होणार नाही याची खातरजमा करण्यात यावी. त्याचप्रमाणे शाळाबाह्य विशेष गरजा •असणारी बालके कोणत्या शाळेत / सेंटरमध्ये प्रवेशित आहेत हे तपासण्याचे काम जिल्हा सक्षमीकरण समन्वयक (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) व समावेशित शिक्षण समन्वयक (जिल्हा परिषद / महानगरपालिका), विषमता (CWSN), रिसोर्स टिचर, थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि शाळाबाह्य समन्वयक यांनी समन्वय साधावा. तसेच नव्याने शाळेत प्रवेशित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्याथ्यांची यादी समावेशित शिक्षणामध्ये कार्यरत असलेल्या चमूने (Team) समक्ष शाळाबाह्य समन्वयक यांना तात्काळ सादर करावी, जेणेकरून U-DISE प्लस मधील विद्यार्थ्यांच्या नोंदी वस्तुस्थितीप्रमाणे नोंदविल्या जातील.

अशा सर्व बाबी तपासून https://udiseplus.gov.in/#/home प्रणालीमध्ये नोंद करून तफावतीचा प्रत्यक्ष आढावा शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य.) / प्रशासन अधिकारी यांनी घ्यावा व त्याबाबतचा अद्याचत अहवाल या कार्यालयास दि. २५ मे २०२३ पूर्वी सादर करावा.
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प. मुंबई

प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव:
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
३. मा. शिक्षण संचालक (प्राथ.), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद, सर्व
५. शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य.), जिल्हा परिषद, सर्व
६. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व

UDISE+ बाबत  महत्वाचे पत्रक click here

युडायस+ माहिती कशी भरावी ? click here


Udise+ Form Marathi English Download Pdf   click here


Udise+ Student Database Management System (SDMS) विद्यार्थी माहिती कशी भरावी ? click here
युडायस प्लस २०२२-२३ ऑनलाईन माहिती भरणेबाबत  click here





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या