संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत नुकतेच एक पत्रक निर्गमित करण्यात आले. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. याविषयी आलेले पत्रक व नवीन माहिती पाहणार आहोत.
विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत......
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. जिल्हा पत्र /२०२४- २५/०४५०२, दि.२४ सप्टेंबर २०२४.
२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/संकीर्ण/इतिवृत्त/
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.मू.चा
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २( PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते.
प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणान्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१(PAT-२ ) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटयर संकलित मूल्यमापन चाचणी १(PAT-२) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक- https://bit.ly/PATUserManual
तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना यापूर्वी दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि, सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील फक्त ४० टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली दिसून येत आहे.
तथापि, सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २७ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
तसेच संदर्भ क्र. ३ अन्वये १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक- https://bit.ly/PAΤ-ΜΗ
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/
0 टिप्पण्या