Periodic Assessment Test (PAT) PAT चाचणी चे गुण कसे भरावेत ? Swift chat वरून गुण कसे भरावेत ?
पायाभूत चाचणी गुण नोंदणी ऑनलाईन STARS प्रकाल्पामधील SIG - २ improved Learning Assessment System नुसार सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा - इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.त्यानुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी चॅटबॉट वर कसे नोंदवावेत सांगण्यात आलेले आहे.
पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. याबाबतची लिंक खाली दिलेली आहे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिकाhttps://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.
0 Comments