Ticker

6/recent/ticker-posts

shikshan saptah 2024 Day 7 शिक्षण सप्ताह उपक्रम उत्कृष्टतेचा उत्सव

 शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस सातवा

28 जुलै 2024

वि‌द्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागा‌द्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. वि‌द्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी वि‌द्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज्ञ, सरकारी/ निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे जान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.

 


उद्दिष्टे-

1. शाळांचे सक्षमीकरण करणे.

2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय

3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उतरदायित्व निर्माण करणे.


वि‌द्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सातव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.

 

1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.

2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.

3. समाजामध्ये वि‌द्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्यपोस्टर  मेकिंगवि‌द्यांजली कार्यक्रमासंदर्भात  घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

4. वि‌द्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.

6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत वि‌द्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे

7. विद्यांजती कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.

8. शालेय स्तरावर वि‌द्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे या‌द्वारे प्रसि‌द्धी करण्यात यावी.


अपेक्षित परिणाम -

 

1. वि‌द्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल 

2. शाळांचे सक्षमीकरण होईल.

3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.


 shikshan saptah 2024 Day 4 Online माहिती भरण्यासाठी लिंक येथे क्लिक करा 

शिक्षण सप्ताह अंर्तगत उपक्रमांची माहिती कशी भरावी ? 

खालिल व्हिडिओ पहा आणि आपल्या शाळेची दि.२२/०७/२०२४  ते दि. २८/०७/ २०२४ या कालावधीत शाळास्तरावर शिक्षण सप्ताह उपक्रम अंतर्गत विविध उपक्रमंची माहिती भरा . 




 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या