राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. खालील उपक्रम शाळा स्तरावर घेण्यात येत आहेत.
शिक्षण सप्ताह कालावधी - २२ ते २८ जुलै, २०२४ शिक्षण सप्ताह निमित्त आयोजित करावयाचे उपक्रम शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे. 1 ते 7 प्रमाणे दिलेले उपक्रम दर दिवशी राबवावेत.
शिक्षण सप्ताह अंर्तगत उपक्रमांची माहिती -
अत्यंत महत्वाचेदि.२४/०७/२०२४ .
प्रति ,
१ ) गटशिक्षणाधिकारी ,
पंचायत समिती ..(सर्व)
२ ) केंद्रप्रमुख ,
पंचायत समिती ...(सर्व)
३ ) मुख्याध्यापक / मुख्य शिक्षक .
सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा .
विषय : - शिक्षण सप्ताह अंर्तगत उपक्रमांची माहिती शाळांनी खालील लिंकवर नोंदवणे बाबत ....
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की ,दि.२२/०७/२०२४ ते दि. २८/०७/ २०२४ या कालावधीत शाळास्तरावर शिक्षण सप्ताह उपक्रम अंतर्गत विविध उपक्रम पार पडत आहे.या दिवस निहाय उपक्रमांची माहिती व फोटो खालील राज्यस्तरीय लिंकवर अपलोड करण्यात यावेत. सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी लिंकवर माहिती नोंदविणे बंधनकारक आहे.या उपक्रमाची माहिती वेळेत नोंदविली जाईल याची दक्षता सर्व शाळांनी घ्यावी.

https://shikshasaptah.com/
0 टिप्पण्या