NIPUN BHARAT निपुण भारत अभियान सर्वेक्षण निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन (Tool)
भारत सरकारने निपुण भारत अभियान National
Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता
तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे
लक्ष्य निर्धारित केले आहे. दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला
आहे, यानुसार सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या
पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे लक्ष्य
प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता तिसरीच्या पुढे गेलेल्या/अपेक्षित क्षमता प्राप्त
न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता
व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करण्यात येत
आहे.
सन
२०२२-२३ शालेय शिक्षण विभाग KRA- सन २०२२-२३ या कालावधीसाठी विभागास दिलेल्या KRA मधील पहिले उद्दिष्ट “प्राथमिक स्तरावरील
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत (Learning Outcomes) मध्ये १० टक्केने वाढ करणे" हे आहे.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण मुख्य
उद्देश
“प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.”
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठीच्या इयत्ता कोणत्या असतील? -इयत्ता दुसरी ते पाचवी
निपुण
भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी विषय कोणते असतील?
इयत्ता
व विषय
दुसरी
ते पाचवी- प्रथम भाषा
दुसरी
ते पाचवी - गणित
चौथी
व पाचवी परिसर अभ्यास: भाग १ व २
दुसरी
ते पाचवी- तृतीय भाषा-इंग्रजी
निपुण
भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कोणत्या शाळांचे करावयाचे?
सर्व
व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा
निपुण
भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कोणी करायचे?
संबधित
शाळेतील विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी
निपुण
भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कालावधी
शाळेमध्ये असणारे वर्ग, शिक्षक
व विद्यार्थी यांचे संख्येनुसार तसेच शालेय सुट्टी चा कालावधी विचारात घेऊन नियोजन
करण्याची लवचिकता शाळांना वरील वेळापत्रकामध्ये असेल. वर्गातील विद्यार्थी
पटसंख्येवर आधारित सदर कालावधी कमी अथवा जास्त होऊ शकतो.
सर्वेक्षणाचे
साहित्य
Nipun
Bharat अध्ययन अभ्यास साधन परिषदेच्या https://www.maa.ac.in संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वेक्षणाचे साधन सर्वांना ऑनलाईन पाहता येतील, डाउनलोड करता येतील.
शिक्षकांनी
आपण अध्यापन करीत असलेल्या संबधित इयत्तेच्या विषयाचे सर्वेक्षण साधन (Tool) ची
एकच प्रिंट अथवा झेरॉक्स काढावी. प्रती विद्यार्थी प्रिंट अथवा झेरॉक्स काढू नयेत.
निपुण
भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन (Tool)
• शिक्षकांनी सर्वेक्षण साधन कसे वापरावे, याबाबत
शिक्षकांसाठी सर्वसाधारण सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येत आहेत.
शिक्षकांनी
सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
निपुण
भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन (TO वापर: शिक्षक सर्वसाधारण
सूचना
> सर्वेक्षणास सुरवात करण्यापूर्वी इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे.
> दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित
विद्यार्थ्याचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी
घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
>सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा
सोडवण्यास सांगावे. सर्वेक्षण साधनातील दिलेले प्रश्न/कृती चित्रे, उदाहरणे, परिच्छेद इत्यादी आवश्यतेनुसार
विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर लिहावेत.
>विद्यार्थ्याला प्रश्न/कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद
देण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील
प्रश्नाकडे/कृतीकडे जावे.
> सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थीनिहाय मौखिक स्वरूपात घ्यावयाचे आहे.
मात्र काही प्रश्नांच्या/ कृतींच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो
विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा आखीव ताव/पेपरवर घ्यावा.
> विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या/पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन
निष्पत्तीवर आधारित निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन तयार करण्यात आलेले
आहे.
> निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरणात
राहील, याची काळजी घ्यावी.
> प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांनी स्वतंत्र सर्वेक्षण करावयाचे आहे.
यासाठी साधारणपणे प्रती विद्यार्थी, प्रती विषय
सर्वेक्षण कालावधी सर्वसाधारणपणे १० ते १५ मिनिटाच्या असणार आहे. मात्र यामध्ये
विद्यार्थी प्रतिसादनुसार लवचिकता असेल.
>सदर सर्वेक्षण साधनासाठी गुण असणार नाहीत मात्र सर्वेक्षण साधनामधील
प्रत्येक प्रश्नासाठी मूल्यांकन रुब्रिक असणार आहे.
> निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर
आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी “मूल्यांकन
रुब्रिक” देण्यात आलेले आहे.
“मूल्यांकन रुब्रिक” मध्ये प्रामुख्याने चार
मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर
आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्याच्या संपादणूकीचे
वर्गीकरण “मूल्यांकन रुब्रिक ” नुसार श्रेणी - ३, श्रेणी - २, श्रेणी - १, श्रेणी - ० यापैकी एका श्रेणीमध्ये
होईल.
प्रत्येक
विद्यार्थ्यांला विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या/कृतीच्या
प्रतिसादाची नोंद निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये
शिक्षकांनी करावी. ही नोंद अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्न विचारून आलेल्या
प्रतीसादानुसार “मूल्यांकन रुब्रिक" मधील निकषानुसार त्या त्या वेळी करावी.
> प्रत्येक अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नावर आधारित
मूल्यांकन रुब्रिक नुसार विद्यार्थी अध्ययन श्रेणी निश्चित करावयाची आहे. प्रत्येक
प्रश्नाच्या रुब्रिकमध्ये चार मूल्यांकन निकष असणार आहेत. प्रत्येक निकषाला ०, १, २ व ३ अशी श्रेणी देण्यात आलेली आहे. यामुळे
प्रत्येक मूल्यांकन रुब्रिकनिहाय आलेल्या विद्यार्थी प्रतिसादाचे/ उत्तराचे
वर्गीकरण खाली दिलेल्या स्तरावर होईल.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन
(Tool)
शिक्षक सूचना
अ.क्र |
विषय |
डाऊनलोड |
१ |
मराठी |
|
२ |
उर्दू |
|
३ |
तमिळ |
|
४ |
तेलगू |
|
५ |
कन्नड |
निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन (Tool)
विषय |
इयत्ता |
मराठी |
उर्दू |
इंग्रजी |
हिंदी |
मराठी |
२ री |
||||
३ री |
|||||
४ थी |
|||||
५ वी |
|||||
गणित |
२ री |
||||
३ री |
|||||
४ थी |
|||||
५ वी |
|||||
प.अ.१ |
४ थी |
||||
५ वी |
|||||
प.अ.२ |
४ थी |
||||
५ वी |
|||||
तृतीय भाषा |
२ री |
|
|
|
|
३ री |
|
|
|
||
४ थी |
|
|
|
||
५ वी |
|
|
|
निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन (Tool)
0 टिप्पण्या