NIPUN BHARAT निपुण भारत अभियान सर्वेक्षण मुख्य उद्देश , सर्वेक्षणासाठीच्या इयत्ता , सर्वेक्षणासाठी विषय, सर्वेक्षण साधन
भारत सरकारने निपुण भारत अभियान National
Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व
संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
ABOUT NIPUN BHARAT - As per NEP 2020, “the highest priority of the education system will be to achieve universal foundational literacy and numeracy in primary school by 2025. The rest of this Policy will become relevant for our students only if this most basic learning requirement (i.e., reading, writing, and arithmetic at the foundational level) is first achieved. To this end, a National Mission on Foundational Literacy and Numeracy will be set up by the Ministry of Education on priority. Accordingly, all State/UT governments will immediately prepare an implementation plan for attaining universal foundational literacy and numeracy in all primary schools, identifying stage-wise targets and goals to be achieved by 2025, and closely tracking and monitoring progress of the same”.
दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन
निर्णय निर्गमित केला आहे, यानुसार सन
२०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांचे पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता तिसरीच्या पुढे
गेलेल्या/अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत
अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करण्यात
येत आहे.
सन २०२२-२३ शालेय शिक्षण विभाग
KRA
सन २०२२-२३ या कालावधीसाठी विभागास
दिलेल्या KRA मधील पहिले उद्दिष्ट “प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत (Learning
Outcomes) मध्ये १० टक्केने वाढ करणे" हे आहे.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण मुख्य उद्देश
“प्रत्येक विद्यार्थ्याने
इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त /संपादित
केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.'
निपुण भारत अध्ययन अभ्यास
सर्वेक्षणासाठीच्या इयत्ता कोणत्या असतील?
-इयत्ता दुसरी ते पाचवी
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षणासाठी विषय कोणते असतील?
इयत्ता व विषय
दुसरी ते पाचवी- प्रथम भाषा
दुसरी ते पाचवी - गणित
चौथी व पाचवी परिसर अभ्यास: भाग १ व
२
दुसरी ते पाचवी- तृतीय भाषा-इंग्रजी
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण कोणत्या शाळांचे करावयाचे?
सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व
माध्यमाच्या शाळा
निपुण भारत : अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण कोणी करायचे?
संबधित शाळेतील विषयाचे अध्यापन
करणाऱ्या शिक्षकांनी
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण कालावधी
शाळेमध्ये असणारे वर्ग,
शिक्षक व विद्यार्थी यांचे संख्येनुसार तसेच शालेय सुट्टी चा
कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्याची लवचिकता शाळांना वरील वेळापत्रकामध्ये असेल.
वर्गातील विद्यार्थी पटसंख्येवर आधारित सदर कालावधी कमी अथवा जास्त होऊ शकतो.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण साधन
सर्वेक्षणाचे साहित्य
Nipun Bharat अध्ययन अभ्यास साधन
परिषदेच्या https://www.maa.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वेक्षणाचे साधन सर्वांना
ऑनलाईन पाहता येतील, डाउनलोड करता येतील.
शिक्षकांनी आपण अध्यापन करीत
असलेल्या संबधित इयत्तेच्या विषयाचे सर्वेक्षण साधन (Tool)
ची एकच प्रिंट अथवा झेरॉक्स काढावी. प्रती विद्यार्थी प्रिंट
अथवा झेरॉक्स काढू नयेत.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण साधन (Tool)
• शिक्षकांनी सर्वेक्षण साधन
कसे वापरावे, याबाबत शिक्षकांसाठी सर्वसाधारण सूचना
परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येत आहेत.
शिक्षकांनी सूचनांचे काळजीपूर्वक
वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण साधन (TO वापर: शिक्षक
सर्वसाधारण सूचना
> सर्वेक्षणास सुरवात
करण्यापूर्वी इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून
ठेवावे.
> दिव्यांग
विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याचा
दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा.
आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
>सर्वेक्षण साधनातील प्रश्न
विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा सोडवण्यास सांगावे. सर्वेक्षण साधनातील
दिलेले प्रश्न/कृती चित्रे, उदाहरणे, परिच्छेद इत्यादी आवश्यतेनुसार विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर
लिहावेत.
>विद्यार्थ्याला
प्रश्न/कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नाकडे/कृतीकडे जावे.
> सदर सर्वेक्षण प्रत्येक
विद्यार्थीनिहाय मौखिक स्वरूपात घ्यावयाचे आहे. मात्र काही प्रश्नांच्या/
कृतींच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये
किंवा आखीव ताव/पेपरवर घ्यावा.
> विद्यार्थी शिकत असलेल्या
पूर्वीच्या/पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित निपुण भारत: अध्ययन
अभ्यास सर्वेक्षण साधन तयार करण्यात आलेले आहे.
> निपुण भारत अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरणात राहील, याची
काळजी घ्यावी.
> प्रत्येक विद्यार्थ्याचे
शिक्षकांनी स्वतंत्र सर्वेक्षण करावयाचे आहे. यासाठी साधारणपणे प्रती विद्यार्थी,
प्रती विषय सर्वेक्षण कालावधी सर्वसाधारणपणे १० ते १५ मिनिटाच्या
असणार आहे. मात्र यामध्ये विद्यार्थी प्रतिसादनुसार लवचिकता असेल.
>सदर सर्वेक्षण साधनासाठी
गुण असणार नाहीत मात्र सर्वेक्षण साधनामधील प्रत्येक प्रश्नासाठी मूल्यांकन
रुब्रिक असणार आहे.
> निपुण भारत: अध्ययन
अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे
मूल्यांकन करण्यासाठी “मूल्यांकन रुब्रिक” देण्यात आलेले आहे.
“मूल्यांकन रुब्रिक” मध्ये प्रामुख्याने चार मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण
साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या प्रतिसादावरून
विद्यार्थ्याच्या संपादणूकीचे वर्गीकरण “मूल्यांकन
रुब्रिक ” नुसार श्रेणी - ३, श्रेणी
- २, श्रेणी - १, श्रेणी - ०
यापैकी एका श्रेणीमध्ये होईल.
प्रत्येक विद्यार्थ्यांला विषयनिहाय
अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या/कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत:
अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावी. ही नोंद
अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्न विचारून आलेल्या प्रतीसादानुसार “मूल्यांकन रुब्रिक" मधील निकषानुसार त्या त्या वेळी करावी.
> प्रत्येक अध्ययन
निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नावर आधारित मूल्यांकन रुब्रिक नुसार
विद्यार्थी अध्ययन श्रेणी निश्चित करावयाची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या
रुब्रिकमध्ये चार मूल्यांकन निकष असणार आहेत. प्रत्येक निकषाला ०, १, २ व ३ अशी श्रेणी देण्यात आलेली आहे.
यामुळे प्रत्येक मूल्यांकन रुब्रिकनिहाय आलेल्या विद्यार्थी प्रतिसादाचे/ उत्तराचे
वर्गीकरण खाली दिलेल्या स्तरावर होईल.
उत्तराचे वर्गीकरण स्तर
१) प्रारंभिक (Below
Basic / Beginners)
या स्तरामधील विद्यार्थ्यांच्या
संबधित विषयाच्या / विषयाची अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्ये
पुरेशा प्रमाणात प्राप्त/संपादित झालेली / झालेल्या नसतात. या विद्यार्थ्यांना
अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची, प्रोत्साहन देण्याची गरज असते
२) प्रगतशील (Basic
/ Progressive)
या स्तरामधील विद्यार्थ्यांने
संबधित विषयाच्या/विषयाची अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये
प्राप्त/संपादित केलेली असतात. हे विद्यार्थी सामान्य सूचनांचे / नियमांचे
पालन/अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये
सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
सामान्य समस्या ते तर्काने सोडव शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले
म्हणणे अभिव्यक्त करतात.
३) प्रवीण (Proficient)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी
अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या असतात. या स्तरावरील
विद्यार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. पद्धतशीरपणे
ते आपली समस्या निराकरण करतात. स्वतःच्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात.
कमीत कमी मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किंवा निर्माण
करतात.
४) प्रगत (Advanced)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी
अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित प्राप्त केलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यामध्ये
उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता,
चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण
कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता
असते. असे विद्यार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना यादवारे नवीन ज्ञानाची
निर्मिती करतात. या स्तरामधील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त
परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.
> विद्यार्थ्यास शिक्षकांनी
मूल्यांकन रुब्रिकमधील जास्तीत जास्त वरची श्रेणीमिळावेत या हेतूने
विद्यार्थ्यांना सर्वेक्षण पूर्वी अथवा सर्वेक्षणाच्यावेळी अतिरिक्त मदत करू नये,
असे केल्यास विद्यार्थ्यास नेमक्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती
संपादित करण्यामध्ये अडचणी आहेत, हे समजू शकणार नाही.
त्यामुळे त्यास उपचारात्मक अध्यापन करण्यास मदत होणार नाही. एखादा विद्यार्थी
गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी सर्वेक्षण करण्यात यावे.
निपुण भारत: अध्ययन सर्वेक्षण श्रेणी नोंद संकलन पत्रक सोबत जोडण्यात येत आहे. या प्रपत्रामध्ये शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय श्रेणी मूल्यांकन रुब्रिकच्या आधारे निश्चित करता येणार आहेत.
प्रत्येक प्रश्नावरील विद्यार्थी
प्रतिसादानंतर शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक निकषानुसार श्रेणी निश्चित केल्यानंतर
निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी योग्य
त्या ठिकाणी / अशी टिक/खूण करावी
सर्वेक्षण झालेनंतर...
शिक्षकांनी सर्वेक्षण साधनानुसार
विद्यार्थी प्रतिसाद घेऊन निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद
प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांना खालील बाबी समजण्यास मदत होतील.
१. प्रत्येक विद्यार्थ्याने
इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त/ संपादित
केलेल्या आहेत, हे समजण्यास मदत होईल.
२. शिक्षकांना आपल्या विषयाचा /
वर्गाचा सरासरी संपादणूक स्तर समजण्यास मदत होईल.
३. प्रत्येक विद्यार्थी कोणत्या
अध्ययन निष्पत्तीमध्ये खालीलपैकी संपादणूकीच्या कोणत्या स्तरावर हे लक्षात येईल.
४. सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर
जाण्यासाठी उपचारात्मक अध्यापन नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यासाठी व अध्ययन
निष्पत्तीसाठी प्राप्त करण्यासाठी करावे लागणार आहे, हे शिक्षकांना समजणार आहे.
५. शिक्षकांनी प्रत्येक अध्ययन
निष्पत्तीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना/आराखडा तयार
करावा.
६. निपुण भारत अभियान चे उद्दिष्ट
साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे अध्ययन निष्पत्तीनिहाय
प्रश्नपत्रिका/चाचण्यांचे विकसन आपल्या स्तरावर करून विद्यार्थी अपेक्षित क्षमता
स्तर प्राप्त करतात की नाही याची आपल्या स्तरावर पडताळणी करणे देखील अपेक्षित आहे.
७. निपुण भारत: अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र याची प्रती विद्यार्थीनिहाय माहिती शिक्षकांच्या
दप्तरी असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षीय अधिकारी ज्या वेळी शाळाभेटीला येतील त्यावेळी
विद्यार्थी अध्ययन श्रेणी व कृति-योजना/आराखडा याबाबत चर्चा करण्यात यावी.
८. निपुण भारतः अध्ययन अभ्यास
सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रामध्ये विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा
मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरुपात
शाळास्तरावर ठेवावी. ही माहिती सरळ पोर्टलवर भरणेबाबत यथावकाश सूचना देण्यात
येतील.
0 टिप्पण्या