Ticker

6/recent/ticker-posts

OTT Teacher Transfer Portal विशेष संवर्ग शिक्षक भाग- १ अर्ज कसा भरावा?

 OTT Teacher Transfer Portal  विशेष संवर्ग शिक्षक भाग- १

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णातील तरतुदीनुसार लवकरच आपणास संवर्ग १ चे फॉर्म भरण्यास सांगितले जाईल.

ott-mhrd-badali-form-kasa-bharava


विशेष संवर्ग शिक्षक भाग- १-

खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक)मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. १.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार ( उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.

वरील शिक्षकांचा समावेश संवर्ग १ मध्ये होतो.

शिक्षक संवर्ग १ साठी बदली फॉर्म कसा भरावा?

आपण खालील व्हिडिओ काळजीपूर्व पहा व संपुर्ण माहिती समजून घ्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या