Shishavarti Form kasa Bharava 2023 शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म कसा भरावा How to fill PUPPSS Scholarship Form.
दर वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) अर्थात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परेक्षेकरीता ऑनलाईन फॉर्म https://www.mscepuppss.in/ या वेबसाईटवर भरले जातात. त्यानंतर त्या विद्यार्थींची शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam घेण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म कसे भरले जातात याविषयीची माहिती आपण आज माहिती घेणार आहोत.
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपणास पूर्व तयारी म्हणून कांही गोष्टी तयार कराव्या लागतात. ज्यामध्ये मुख्याध्यापक यांचा फोटो सही व शिक्का सोबत असलेला, विद्यार्थी फोटो, शाळेचा ईमेल आयडी, मुख्याध्यापक यांचा ईमेल आय डी, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर पालकांचे उत्पन्न यासर्व बाबी आपण घेतल्यानंतर आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरवात करू शकता.
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी आपणास खालील पायऱ्याने जावे लागेल त्यानंतर आपणास फॉर्म भरता येतील.
1) प्रथमिक माहिती गोळा करणे
2) शाळा नोंदणी करणे
3) विद्यार्थी फॉर्म भरणे
4) शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे
वरील चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आपले 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरता येतील. प्रथम आपण प्राथमिक माहिती विषयी पाहू या. वर सांगितल्याप्रमाणे आपणास सर्व माहिती तयार ठेवावी लागेल ती सर्व माहिती मिळाल्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.
1) शाळा नोंदणी करणे- शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपणास प्रत्येक वर्षी शाळा नोंदणी School Registration करणे गरजेचे असते. यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
अ) कोणताही एक बाऊझर ओपन करा त्यामध्ये Puppss असे सर्च करा किंवा https://www.mscepuppss.in/ हा वेब पत्ता टाकून ही वेबसाईट ओपन करा. आपणासमोर खालील प्रमाणे दोन पर्याय येतील.
आ) यामधील दुसरा पर्याय आपण निवडावा त्यानंतर आपणासमोर आपली वेबसाईट ओपऩ होईल यामधील वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या शाळा नोंदणी या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर आफणास खालील प्रमाणे पेज येईल.
इ) यामध्ये आपल्या शाळेचा युडास कोड टाका. आणि बाहेर क्लिक करा. लगेच आपल्या शाळेचे नाव आलेले दिसेल जर नाव बरोबर असेल तर खालील पर्यायातून Yes हा पर्याय निवडा. जर आपल्या शाळेचे नाव नसेल तर मदतीसाठी संपर्क क्रमांवर संपर्क करावा.
ई) Yes हा पर्याय निवड्यानंतर आपणास शाळा नोंदणी फॉर्म भरावा लागेल यामध्ये खालील माहिती भरावयाची आहे.
School Registration
1) School UDISE Code / युडायस कोड *
2) School Name / शाळेचे नाव *
3) School Management Type
शाळा व्यवस्थापनाचा
प्रकार *
4) Syllabus taught in school
शाळेत शिकविला
जाणारा अभ्यासक्रम *
5) Medium of School / शाळा माध्यम *
6) School Type / शाळेचा प्रकार *
आपली शाळा कोणत्याही
प्रकारची आश्रमशाळा नसल्यास "आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा " हा शेवटचा
पर्याय निवडावा
7) School Area / शाळेचे क्षेत्र *
8) School Email Id शाळेचा ई-मेल आयडी *
9) Confirm School Email Id
शाळेचा ई-मेल आयडी
पुन्हा नोंदवावा * आपला ई-मेल आयडी काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर
युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.
10) Do You Have Internet Connection at School ?
शाळेत इंटरनेट
कनेक्शन आहे का ? *
1) Survey No./ House No. / Flat No. / Peth / Lane / Society सर्वे क्र./ घर क्र.
/ फ्लॅट क्र./ पेठ / गल्ली / सोसायटी *
2) Village / City गाव / शहर *
3) Post पोस्ट *
4) District जिल्हा *
5) Taluka / Tehsil / Block / Ward
तालुका / तहसील /
ब्लॉक / वॉर्ड *
6) Pincode पिनकोड *
7) Telephone No.(With STD Code)
दूरध्वनी क्र.(एस
टी.डी.कोडसह) * नसेल तर 0000000 टाकावे.
8) MSCE Affiliation Fees
परीक्षा परिषद
संलग्नता शुल्क *
1) Last Name आडनाव *
2) First Name प्रथम नाव *
3) Middle Name मधले नाव *
4) Headmaster's Mobile Number मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक *
5)Confirm Mobile Number मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावा *
वरील रकान्यामध्ये आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा. सदर नमूद
केलेल्या मोबाईल नंबरवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.
6) E-mail Id ईमेल आयडी *
शेवटी सबमिट वर क्लिक करावे परत आपणासमेर एक संदेश येईल त्यावर होय
करावे. नंतर आफल्या मोबाईल व दिलेल्या ईमेल आयडीवर पासवर्ड येईल आलेल्या पासवर्डने
शाळा लॉगइन करावे. लॉग इन केल्यानंतर परत आपणास मुख्याध्यापक फोटो व वैकल्पिक
मोबाईल नंबर टाकावयाचा आहे. तो टाकल्यानंतर आपली शाळा नोंदणी पूर्ण होईल.
शाळा नोंदणी झाल्यानंतर आपणासमोर खालील प्रमाणे पेज येईल.
3) Shishavarti Form kasaBharava -
अशाप्रकारे शाळा नोंदणी झाल्यानेतर आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरायला सुरवात करायची आहे. फॉर्म भरण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या Std 5th (PUP) या पर्यायावर क्लिक करावे. त्यामध्ये दोन टॅब आहेत पहिली आहे रजिस्ट्रेशन व दुसरी आहे फिस पेमेंट फॉर्म भरण्यासाठी पहिल्या पर्यायवर क्लिक करून 5 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरावेत.
जर आपणास 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरावयाचे असतील तर 8th (PSS) या पर्यायावर क्लिक करावे. त्यामध्ये दोन टॅब आहेत पहिली आहे रजिस्ट्रेशन व दुसरी आहे फिस पेमेंट फॉर्म भरण्यासाठी पहिल्या पर्यायवर क्लिक करून 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरावेत.
4) शिष्यवृत्ती फी भरणे.-
आपले सर्व फॉर्म भरावयाचे झाल्यानंतरच आपण शिष्यवृत्ती फीस पेमेंट करावयाचे आहे. पेमेंट हे ऑनलाईनच करावयाचे आहे. यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर पर्यायाचा वापर करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा शाळा सलग्न फी ही जे पेमेंट आपण आगोदर कराल त्यामध्येच असेल ती दोनदा घेतली जाणार नाही. आपणास 5 वी आणि 8 वी चे फॉर्म असतील तर त्या प्रमाणे पेमेंट करावे लागेल.
पेंमेंट करण्यासाठी प्रथम Std 5th (PUP) या पर्यायावर क्लिक करावे. त्यामध्ये दोन टॅब आहेत पहिली आहे रजिस्ट्रेशन व दुसरी आहे फिस पेमेंट. फिस पेमेंट साठी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आफणास एकूण फिस दाखवली जाईल खालील प्रमाणे पेज येईल.
आपणाकडे पेमेंटचा जो पर्याय असेल तो पर्याय वापरून पेमेंट करावे. यासाठी आपण दोन पर्याय वापरू शकतो 1) Credit Card/Debit Cards 2) Internet Banking आपणाकडे जो पर्याय असेल तो वापरून पेमेंट करावे.
अशाप्रारे आपले पेमेंट झाल्यानंतर आपले सर्व विद्यार्थी Pending Payment Student List मधून वर असलेल्या Successfully Registered Student List मध्ये दिसतील. जो पर्यंत आपले विद्यार्थी Successfully Registered Student List मध्ये दिसत नाहीत तोपर्यंत आपले फॉर्म यशस्वीपणे भरले गेले असे समजू नये.
आपणास हे ही आवडेल
● शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम ●
● इयत्ता 8 वी●
"कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहे? कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात? अभ्यासक्रम कसा आहे? प्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात."
1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता https://bit.ly/3oB5XGn
2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3ye5I79
3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3s2OEjF
4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3EJnwcY
● इयत्ता 5 वी●
1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता https://bit.ly/31HYVGP
2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3rMU95z
3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3y9xxxC
4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3lMd9xz
शिष्यवृत्ती परीक्षा माहिती https://bit.ly/3EDJA8K
Scholarship चाचणी सोडावा https://bit.ly/3EDJA8K
1 टिप्पण्या
Thank you sir sumpurn mahahiti dilya bddl . English Medium (CBSC ) cha Mulan bddl mahati dili ter br hoil .🙏🙏
उत्तर द्याहटवा