Ticker

6/recent/ticker-posts

Techno Teacher तंत्रस्नेही शिक्षक - काळाजी गरज

     'बदल' बदल हा काळाचा नियम आहे. सतत बदल होत असतात. झालेला बदल आत्मसाद करणे व त्याप्रमाणे आपण स्वतःमध्ये बदल करून घेणे क्रमप्राप्त असते. शिक्षण क्षेत्र देखील याला अपवाद नाही. शिक्षण पध्दतीमध्ये देखील फार बदल झालेले आहेत आणि आजची शिक्षण पध्दती आपण डोळ्यासमोर आणली की आपणास हे बदल सहज लक्षात येतात. बदलाचे हे वारे शिक्षण क्षेत्रात देखील आले आहे. 

    अध्ययन - अध्यापन नवनवीन तंत्रे व साधने सध्या उपल्बध आहेत. अशा साधनाचा व तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन -अध्यापन करणे ही देखील खूप महत्वाची गोष्ट बनली आहे. उपल्बध असलेले नवनवीन साधने व तंत्रे शिक्षकाला वापरता आली पाहिजेत. बदललेला काळ लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसाद करून ते आपल्या दैनंदिन अध्यापनात वापरले पाहिजे. 

तंत्रस्नेही शिक्षक - काळाजी गरज


    शिक्षक म्हणून आपण नवनवीन साधने प्रभावीपणे कशी वापरावीत? आपले अध्यापन अधिक परिणामकारक व प्रभावी करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा? सध्या उपल्बध असलेले व अगदी मोफत साधने कोणती आहेत? अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात दाखवण्यासाठी मला कोणते तंत्रज्ञान किंवा साधने उपयोगी पडतील? याविषयी आपणास माहिती असणे व आपण अपडेट असणे खूप गरजेचे आहे. थोडक्यात काय तर आपण तंत्रस्नेही असणे ही आता काळाची गरज बनली आहे. 

    अस म्हणतात आपल्या पाठीमागील पीढी पुढील जग आपल्या खांद्यावरून पुढच जग पाहत असते. आपल्यापेक्षा नक्कीच ची काकणभर हूशार असते. आपल्यापेक्षा पूढच जग त्यांना पाहता येत. त्याच्यासारखे आपण अपडेट असणे खूप गरजेचे आहे. सध्या उपल्बध असलेले नवनवीन तंत्रज्ञान, साधने, विविध ऑनलाईन टूल्स आपणास वर्गअध्यापनात व शालेय प्रशासनात वापरता आली पाहिजेत. तरच आपण आजच्या जगात टिकू शकू. 

    तंत्रस्नेही शिक्षक म्हणजे नेमके काय ? कोणला तंत्रस्नेही म्हणता येईल? तंत्रस्नेही झालो म्हणजे नेमके काय? केवळ वाट्सअप, फेसबुक, दोन चार वेबसाईट आल्या म्हणजे आपण तंत्रस्नेही झालो का? एखादा इमेल पाठवता आला, कागदपत्रे स्कॅन करता आली , लिंक भरता आली म्हणजे आपण तंत्रस्नेही झालो का ? तर नाही. 'तंत्रस्नेही शिक्षक' म्हणजे अध्ययन-अध्यापन व शालेय प्रशासन चालवताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्ये आपल्याकडे असणे होय. असे तंत्रस्नेही शिक्षक होणे ही काळाची गरज आहे. 

    मोबाईल, संगणक या साधनाचे ज्ञान असणे व ते प्रभावीपणे वापरता येणे किती आवश्यक हे आपण कोरोना कालावधीत अनुभवले आहे. सध्यची मुले नव्हे २१ व्या शतकातील मुले खूप अडव्हन्स आहेत मोबाईल, संगणक हाताळताना येत नाही असे मुल आपणास शोधून सुद्धा सापडणार नाही. सर्वांना मोबाईलचा वापर अतिशय चागल्या प्रकारे करता येतो. अशा मुलांना अध्यपन करणारे आपण शिक्षक मागे राहून चालणार नाही. आपणास देखील त्यांच्या बरोबरीने चालावे लागेल. तंत्रज्ञानाच्या ज्या गोष्टी आपणास माहिती नाहीत अशा गोष्टी आपणास शिकून घ्याव्या लागील. आपणास तंत्रस्नेही बनावेच लागेल. हीच बदलत्या काळाची गरज आहे. 

   वर्गात अध्यापन करत असताना अपणास आवश्यक असणारी साधने जसे मोबाईल, संगणक , प्रजेक्टर, AR-VR, AI, विवध शैक्षणिक APP अध्यापन करताना प्रभावीपणे वापरता यायला हवीत. आपण जो घटक अध्यापन करत आहोत त्या घटकाला अनुसरून मला कोणते डिडिटल साहित्य वापरता येईल असा विचार आफल्या मनात यायला हवा. अशा डिजिटल साधनाचा वापर करून आफले अध्यापन अधिक प्रभावी व सुकर बनवता येईल याचा विचार आपण करायला हवा. आपणास जो घटक वर्गात अध्यापन करावयाचा आहे त्या घटकाला अनुसरून व्हिडिओ, फोटो, APP, कृत्रिम बुध्दीमत्ता AIयांचा वापर कसा करता येईल हे शिकून घ्यावे लागेल. याचाच अर्थ आपणास तंत्रस्नेही व्हावे लागेल त्याशिवाय हे साध्य करता येणार नाही.

    अध्ययन- अध्यापनापुरते तंत्रज्ञान वापरता येणे म्हणजे तंत्रस्नेही नाही तर अशा डिजिटल साधनाचा वापर मुल्यमापन करताना देखील वापरता आला पाहिजे. मुल्यामापनाची विधिध साधने तयार करणे, मुल्यमापन प्रक्रिया राबवणे यासाठी देखील तंत्रज्ञान वापरता यायला हवे. सध्या अगदी मोफत व सोपी विविध साधने उपल्बध हेत अशा साधनाचा शोध घेऊन ती वापरता येणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपणास नवनवीन गोष्टी सतत शिकत राहणे गरजेचे आहे. अधिक मनोरंजक मुल्यमापन  साधने उपल्बध आहेत. विवध मुल्यमापनासाठी लागणारी टूल्स आहेत. ती माहिती करून ती बनवणे व प्रभावीपणे वापर करता येणे गरजेचे आहे. शिक्षक म्हणून आपणास यासर्वांचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. 

    बऱ्याच वेळा आपणास वर्गात अध्यापन करताना विविध अडचणी निर्माण होत असतात. आपणास आलेल्या अडचणी तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवीता आली पाहिजे. सध्या नवनवीन तंत्रे व साधने, विविध टूल्स येत आहेत त्याची माहिती घेऊन ती आपणास आपल्या अध्यपन कार्यात वापरता यायला हवीत. विवध डिजिटल साधनाचा वापर करून आपले अध्यापनात नाविन्य व परिणामकता आणणे खूप गरजेचे आहे. २१ व्या शतकातील कौशल्य मुलांना शकवताना या साधनाचा खूप उपयोग होणार आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या