प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) व महाराष्ट्र शासन याच्यामार्फत शिक्षकांसाठी सतत नवनवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण, मार्गदर्शन, विविध उपक्रम यांचे आयोजन करण्यात येते याचाच भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) व महाराष्ट्र शासन याच्यामार्फत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
शाळांतील इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थी शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहू.
पत्रकाचा विषय - प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणे बाबत.
संदर्भ पत्रक - संदर्भ: जा.क्र राशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव, समृद्धी कार्यक्रम/२०२४-२५/०५६६२ दि. ०३/१२/२०२४
शाळांतील इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थी शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या शाळांसाठी खूला आहे. तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या शाळांसाठी खुला आहे.
रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे. शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, a Story Telling या चार मुद्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक व आवश्यक माहिती
लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर पेस्ट करावयाचे आहे. सदर लिंक आपणास पुरवण्यात येणार आहेत.
माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम आहे की जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये प्रथमच आयोजित केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.
कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये -
१. वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे.
२. अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल.
३. अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.
४. अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.
५. सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.
६. सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.
७. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.
८. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.
९. वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.
१०. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रताः -
१. शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
२. अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन, NCERT, Railways schools, KGBV किंवा Cantonment Board Schools सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
३. समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
४. माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन- अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची ड्राईव लिक व आवश्यक माहिती सादर करू शकता.
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या व्हिडीओची गुगल ड्राईव वरील लिंक, उपल्बध करून दिलेल्या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक माहिती सदर लिंक वर भरणे बाबतही शाळांना सूचित करावे. तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ व पाठाचा ५०० शब्दांच्या मयदित प्रकल्प आराखडा उपल्बध करून दिलेल्या गुगल लिंक वर अपलोड करावा. तसेच समृद्धी कार्यक्रमाची माहिती ही या पल्बध करून दिलेल्या लिंक वर भरावी.
सदर प्रकल्प आराखडा NCERT, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे. रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि. २९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे, तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर SCERTM येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त ०८ उत्तम अध्ययन कुर्तीच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.
रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि. ११ व दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात येईल, रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंतच मर्यादित आहे. तथापि समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल.
राज्यस्तरावर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल,
रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाचे आयोजन ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी होत आहे. समृद्धी उपक्रमात राज्यस्तरावर उत्कृष ठरणाऱ्या संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. रंगोत्सव उपक्रम राज्यापुरताच मर्यादित आहे. रंगोत्सव उपक्रमात काही बाबी विचारात घेतल्या जाणार. अनुभवात्मक शिक्षणाच्या आधारे शालेय विद्यार्थ्यात सहयोग, स्वयं पुढाकार, स्वयं दिशा, स्वयं शिस्त, संघ भावना, जबाबदारी, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी पत्रक वाचन करावे.
शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी हा उपक्रम पत्रक
रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025
NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.... *11 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025* रोजी SCERT येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षक यांचेसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा समृध्दी आहे. रंगोत्सव अंतर्गत 2 प्राथमिक शिक्षक ( इयत्ता 3 री ते 8 वी) यांनी Art integrated pedagogy, sport integrated pedagogy, toy based pedagogy, story telling या पैकी एका विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.
रंगोत्सव कार्यक्रम लिंक
https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8
समृध्दी कार्यक्रम अंतर्गत 2 माध्यमिक शिक्षक ( इयत्ता 9 वी ते 12 वी) यांनी Art integrated pedagogy या विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.अध्ययन अध्यापन प्रक्रियेत 1 विषय शिक्षक व 1 शिक्षक विविध कलांचे अध्यापन करणारे असावेत.
समृद्धी कार्यक्रम लिंक
https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8
सद्यस्थितीत रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक यांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र समृध्दी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षक यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.तदनुषंगाने कृपया जास्तीत जास्त शिक्षक यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे.दोन्हीं स्पर्धेत video लिंक अपलोड करायची अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025 ही आहे. या दोन्ही कार्यक्रम संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जावून you tube वरील Video पाहावे , हे सुध्दा सूचित करण्यात यावे.
You tube लिंक
https://www.youtube.com/live/mA8yZI3X1cE?si=t_rb78jPJ5Ayehi7
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
0 टिप्पण्या