Ticker

6/recent/ticker-posts

Ganitotsa-2024 राष्ट्रीय गणित दिन Mathematicsday Ganit Utsav 2024

 राज्यात शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. याचाच भाग म्हणून दिनांक २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन करण्यात येणार आहे. Ganitotsa-2024 राबवण्याबाबत विविध उपक्रम देण्यात आलेले आहेत. गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन जन्मदिनी Ganitotsa-2024 हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात आलेली माहिती पाहू.

Ganitotsa-2024 राष्ट्रीय गणित दिन Mathematicsday Ganit Utsav 2024

 


राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन करणेबाबत या विषयाला अनुसरून एक पत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यामध्ये Ganit Utsav 2024 कसे साजरा करावे याविषयी माहिती दिलेली आहे. या पत्रकात संदर्भ दिलेला आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चा त्यानुसार आपण शाळा सत्रावर असा गणितोत्सव साजरा करणार आहोत.

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये गणित विषयाचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणित विषयाचे पूर्व प्राथमिक स्तरापासून कृती आधारित व आनंदायी पद्धतीनेअध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनच खेळ आधारित अध्यापन शास्र, गणितीय खेळ, कोडी, परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या