Ticker

6/recent/ticker-posts

shikshan saptah 2024 Day 5 शिक्षण सप्ताह उपक्रम दिवस पाचवा विषय- शिक्षणात तंत्रज्ञान दिवस

 शिक्षण सप्ताह उपक्रम दिवस पाचवा विषय- शिक्षणात तंत्रज्ञान दिवस

परीशिष्ट - ५ बी

शिक्षा सप्ताह

दिवस-पाचवा

शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४

विषय- शिक्षणात तंत्रज्ञान दिवस

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणाची समानता, सुलभता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दूरगामी परिणाम होऊ शकतो हे वास्तव ओळखून, मुद्दा २३.५ मध्ये असे नमूद केले आहे की "शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन-अध्ययन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल." शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, शैक्षणिक प्रवेश वाढवणे, उपस्थिती, मूल्यांकन इत्यादींशी संबंधित प्रक्रियांसह शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन सुव्यवस्थित करणे, यावर भर असेल.

 

shikshan saptah 2024 Day  5 शिक्षण सप्ताह उपक्रम दिवस पाचवा विषय- शिक्षणात तंत्रज्ञान दिवस

या उद्देशाने दीक्षा प्रणाली व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून १७ मे २०२० रोजी PMe-VIDYA नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू करण्यात आला, जो डिजिटल/ ऑनलाइन/आकाशवाणी द्वारा शिक्षमाशी संबंधित सर्व उपक्रमांना एका व्यासपीठावर आणून गुणवत्तापूर्ण शिक्षणास गती देतो.

 

शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाची उद्दिष्टेः

 

. NEP २०२० मध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणै.

२. डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे.

३. २०० शैक्षणिक टीव्ही चॅनेलचा प्रचार करणे.

४. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे.

५. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी देणे.

 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी CBSE आणि NCERT द्वारे तसेच करोडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी हे व्यासपीठ स्विकारले आहे. दीक्षा प्रणालीचे वापरत महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. सध्या दीक्षा प्रणालीवर राज्याकडे खालीलप्रमाणे ई साहित्य अपलोड झालेले आहे (दिनांक १५/०७/२०२४ नुसार)

६. अध्ययन सत्रे-२९.५७ लाख

७. वापरकर्ते-९.१७ लाख

८. QR Code-१८२२०

९. पाठ्यपुस्तके-६८५४ (CBSE + State Board, & languages)

10. ई-साहित्य- ४०७७७ (Ducument + Interactive Content + Video + YouTube Content + QR codes)

 

Document - 2150

Interactive Content- 1838

Video- 8428

YouTube Content- 10141

Total- 22557

QR Code- 18220

Grand Total- 40777

 

शिक्षकांसाठी सूचना -

१) दीक्षा (DIKSHA) प्रणाली वापरासाठी https://pmevidya.education.gov.in/diksha.html येथे भेट देवून अधिकची माहिती देण्यात यावी.

 

२) दीक्षा (DIKSHA) प्रणाली वापरासाठी खालील लिंक दाखविण्यात यावी. Diksha app download link-https://www.youtube.com/watch?v=KBpxR620joQ दीक्षा प्रणालीवर राज्याचे योगदान पाहण्यासाठी येथे भेट द्यावी.

https://drive.google.com/drive/u/1/folders/1B7j9SLCzVnXo76PhNX360k11PPFP6B5

याबाबत विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवण्यात याव्यात.

शिक्षकांसाठी सूचना -

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना https://pmevidyn.education.gov.in/  येथे भेट देण्यास सांगाचे व याबानत अधिकची माहिती देण्यात यावी. याबाबत विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवण्यात याव्यात.

दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक ठरणारे ई-साहित्य CIET नवी दिल्ली संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक ठरणारे अध्ययन-अध्यापन, योगा व इतर विषयातील ई-साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याची सविस्तर माहिती https://pmevidya.education.gov.in/cwan.html या लिंक वर उपलब्ध आहे.

 

राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक यांच्या अध्ययन अध्यापनात सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ मध्ये STARS प्रकल्पांतर्गत इयत्ता ४ थी, व ५ वी साठी ५०० ई- साहित्य विकसित केलेले आहेत.

 

Virtual Labs- शिक्षक व विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व भाषा विषयातील अनुभवाधिष्टीत अध्ययन- अध्यापन कृतियुक्त पद्धतीने करून क्लिष्ट संकल्पना सोप्या करण्यासाठी CIET नवी दिल्ली संस्थेमार्फत Virtual Lab कार्यान्वित करण्यात आल्या असून इयत्ता ६ वी ते १२ वी साठी गणित, विज्ञान विषयातील ई-साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याची सविस्तर माहिती https://diksha.gov.in/virtuallabs.html या लिंक वर उपलब्ध आहे. लवकरच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत ही Virtual Lab कार्यान्वित करण्यात येवून इयत्ता ६ वी ते १२ वी साठी गणित, विज्ञान विषयातील ई-साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील लिंक वर भेट देण्यास सांगून अधिकची माहिती देण्यात यावी. याबाबत विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवण्यात याव्यात.

 

विद्या समीक्षा केंद्र (VSK)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक १२ मार्च २०२४ नुसार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली "विद्या समीक्षा केंद्र (VSK)" कार्यान्वित करण्यात आलेले आहे. समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पी.एम.श्री., मध्यान्ह पोषण आहार अशा केंद्र पुरस्कृत योजनांसह राज्य शासनाद्वारा विभागांतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनांचा लाभ सर्व संबधित घटकांना देण्यात येतो. सदर उपक्रमांचा परिणाम अंतिमतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रतिबिंबित होणे गरजेचे असते. अशा परिणामांचे मापन परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI), राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य 

स्तरावरील संपादणूक सर्वेक्षण (SLAS), नियतकालिक चाचण्या यातून केले जाते. सदरील माहिती संकलन व विश्लेषण करण्यास यंत्रणेतील सर्व घटकांचा श्रम व वेळ खर्च होतो.

 

विद्यार्थी आपली संपादणूक पातळी वाढविण्यासाठी, शिक्षक आपला व्यावसायिक विकास करण्यासाठी व प्रशासन पर्यवेक्षणात सुधारणा करण्यासाठी विविध अध्ययन सामुग्रींचा, प्रशिक्षणांचा व डीजिटल साधनांचा नियमित उपयोग करीत असतात. तथापि, यातील परिणाम देणारे घटक कोणते याचे विश्लेषण डेटा अभावी करता येत नाही.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व मशीन लर्निंगच्या मदतीने माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. प्राप्त डेटा विश्लेषणाच्या आधारे राज्यातील शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदान करता यावे, प्रत्येक स्तरावरील गरजांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी नेमकेपणाने कृती कार्यक्रमांचे नियोजन, प्रभावी अंमलबजावणी व अचूक मूल्यमापन करता यावे, यासाठी विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्दित करण्यात आले आहे.

 

विद्या समीक्षा केंद्राची उद्दिष्टेः समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे. शैक्षणिक व भौतिक उपक्रम / योजनांचा राज्य स्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण करणे. प्रवेशित विद्यार्थी, शालाबाह्य विद्यार्थी, गळती झालेले विद्यार्थी, मुक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट बालकामगार, CWSN विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, शिष्यवृत्ती, आर्थिक लाभाच्या योजना, शाळास्तरावरील मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षक यांना आवश्यक मदत, प्रोत्साहन व पुरस्कार इ. बाबींवर लक्ष ठेवणे.

विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.

डेटा आधारे तातडीने लक्ष देण्यासाठीची गरजा क्षेत्रे निश्चिद करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे.

शिक्षण व्यवस्थेस पूरक ठरणाऱ्या सर्व संबंधितास माहिती, जागरुकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर हेल्प डेस्क तयार करणे.

सुनिश्चित शाळा मानकांनुसार शाळांची सद्यस्थिती व सुधारात्मक कामगिरीचा Real Time माहिती दर्शविणारा डॅशबोर्ड विकसित करणे.

राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे.

समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पी.एम. श्री. तसेच शासनाचे विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण निश्चितीस मदत करणे.

 

शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्त विषयक बाबींचे डॅशबोर्ड विकसित करून संनियंत्रण करणे,

प्रस्तुत "विद्या समीक्षा केंद्र (VSK)" राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी व कार्यान्वयन बावत सद्या राज्यामार्फत Chatbot प्रणालीद्वारे नियतकालिक चाचण्या (PAT) आयोजन, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती संकलित करून dashboard उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या