samanya gyan prashn uttar सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर

 Samanya Gyan सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर

आपणास विविध स्पर्धा परीक्षा शालेय जीवनात सामान्य ज्ञानावर samanya gyan prashn uttar आधारीत प्रश्नांची आवश्यकता असते. तसेच विविध स्पर्धा मध्ये सामान्य ज्ञान samanya gyan prashn uttar यावर आधारीत प्रश्न विचारलेले असतात आपण खालील प्रश्नांचा सराव करू शकता. 

samanya gyan prashn uttar


Samanya Gyan सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर



1/15
खालील बाबींचा विचार करा अ) कार्बन डायऑक्साईड ब) नायट्रोजन ऑक्साईड क) सल्फर ऑक्साईड कोळशाच्या ज्वलनाने वरीलपैकी कोणता वायू निर्माण होतो/ होत?
१) केवळ अ
२) ब आणि क
३) अ आणि क
४) अ, ब, क
Explanation: अ) कार्बन डायऑक्साईड ब) नायट्रोजन ऑक्साईड क) सल्फर ऑक्साईड कोळशाच्या ज्वलनाने वरील वायू निर्माण होतो
2/15
एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते, कारण ?
१) जमिनीत पाण्याचा प्रवाह झाडामध्ये अवरूद्ध होतो.
२) मुळांना पुरेसे पोषण मिळत नाही.
३) झाड जमिनीत किटाणूंमुळे बाधीत होते.
४) मुळांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही.
Explanation: एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते, कारण एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते,
3/15
कापसामध्ये PA-255 या वाणाच्या धाग्याची लांबी----- आहे?
१) २०-२२ मी.मी.
२) ३२-३४ मी.मी.
३) २७-२८ मी.मी.
४) ३६.३८ मी.मी.
Explanation: कापसामध्ये PA-255 या वाणाच्या धाग्याची लांबी २७-२८ मी.मी. आहे
4/15
झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे •••••••••• पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते.
१) १०%
२) १%
३) ५%
४) १५%
Explanation: झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे १% पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते.
5/15
•••••••• या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते.
१) अँथ्रासाईट
२) बनिस
३) पीट
४) यापैकी नाही.
Explanation: अँथ्रासाईट या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते.
6/15
विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो ?
१) निर्वात पोकळ
२) नायट्रोजन
३) ऑक्सीजन
४) यापैकी नाही
Explanation: नायट्रोजन हे योग्य उत्तर आहे. बल्बमध्ये वापरल्या जाणार्‍या टंगस्टन फिलामेंटचे ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन सारखा रासायनिक निष्क्रिय वायूंनी भरलेला असतो.
7/15
'अग्निवर्षाव' काय आहे?
१) अग्रिबाण
२) क्षेपणास्त्र
३) क्षेपणास्त्रवाहू नौका
४) यापैकी नाही
Explanation: १७ नोव्हेंबरच्या रात्री सिंह राशीतून मोठा उल्कावर्षाव होईल. तो भारतात हिवाळा असल्याने स्वच्छ दिसू शकेल. धूमकेतूंच्या धूलिकणांचा हा अग्निवर्षाव म्हणजे निसर्गातली एक अद्भुत घटना असते.
8/15
MKS पद्धतीत संवेगाचे एकक --------होय.
१) ग्रॅम सें. मी. प्रति सेकंद
२) किलोग्रॅम मीटर प्रति सेकंदाचा वर्ग
३) किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद
४) यापैकी नाही
Explanation: MKS पद्धतीत संवेगाचे एकक किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद होय.
9/15
MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते?
१) मलेरीया
२) कुष्ठरोग
३) कॅन्सर
४) क्षयरोग
Explanation: MDT ही वैद्यकीय संज्ञा काय आहे? मल्टीडिसिप्लिनरी टीम (MDT) हा आरोग्य आणि सेवा कर्मचार्‍यांचा एक गट आहे जो वेगवेगळ्या संस्था आणि व्यवसायांचे सदस्य आहेत (उदा. GP, सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका), जे वैयक्तिक रूग्ण आणि सेवा कुष्ठरोग वापरकर्त्यांच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यासाठी एकत्र काम करतात. MDTs आरोग्य आणि काळजी दोन्ही सेटिंग्जमध्ये वापरले जातात.
10/15
रेटिनॉल' हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे?
१) अ
२) बी कॉम्प्लेक्स
३) सी
४) डी
Explanation: जीवनसत्वे रासायनिक नाव जीवनसत्व अ रेटिनॉल जीवनसत्व क एस्कॉर्बिक आम्ल जीवनसत्व ब1 थायमाइन जीवनसत्व ब2 राइबोफ्लेविन
11/15
प्रकाशीय तंतूचे कार्य कोणत्या तत्वाने चालते?
१) संपूर्ण अंतर्गत अपवर्तन
२) संपूर्ण अंतर्गत विकिरण
३) संपूर्ण अंतर्गत अपस्करण
४) संपूर्ण अंतर्गत परावर्तन
Explanation: संरचना व कार्यपध्दती : पारदर्शक तंतूमध्ये संपूर्ण अंतर्गत परावर्तनाद्वारे प्रकाशाचे प्रेषण होत असल्याने प्रकाश शलाका त्याच माध्यमात परावर्तित होते. त्यामुळे प्रकाशकीय तंतूच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे प्रकाश शलाकेचे परावर्तन होऊन तिचे नागमोडी मार्गानेही प्रेषण केले जाते.
12/15
नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते?
१) २० ते ३०
२) ३० ते ४0
३) ४० ते ५०
४)५० ते ६०
Explanation: सामान्य संभाषण सुमारे 30-60 dB असते, लॉन मॉवर सुमारे 90 dB असते आणि मोठ्या आवाजातील रॉक कॉन्सर्ट सुमारे 120 dB असते. सर्वसाधारणपणे, 85 वरील आवाज हानीकारक असतात आणि ते एक्सपोजरच्या लांबी आणि वारंवारतेवर अवलंबून असतात.
13/15
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे --------महिन्यांचा कालावधी ग्राह्य मानला जातो ?
१) दोन महिने
२) तीन महिने
३) चार महिने
४) सहा महिने
Explanation: रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत) वजन ४५ कि.ग्रॅ.च्या वर असल्यास.. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.
14/15
जे. जे. थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
१) प्रोटॉन
२) इलेक्ट्रॉन
३) न्यूट्रॉन
४) हेलियम
Explanation: जे जे थॉमसन यांनी काय शोधले? अमेरिकेतून परतल्यावर, त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात तेजस्वी कार्य साध्य केले - कॅथोड किरणांचा मूळ अभ्यास इलेक्ट्रॉनच्या शोधापर्यंत पोहोचला, ज्याची घोषणा शुक्रवारी, 30 एप्रिल रोजी रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये संध्याकाळच्या व्याख्यानादरम्यान करण्यात आली. १८९७.
15/15
मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणाऱ्याचे श्रेय --------या शास्त्रज्ञास जाते ?
१) कार्ल लँडस्टेनर
२) जॉर्ज लिनॅक
३) विल्यम हार्वे
४) प्रफुल सोहनी
Explanation: मानवी रक्त गठन का शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. रक्तगटाचा शोध कधी लागला? कार्ल लँडस्टीनर यांनी 1901 मध्ये रक्ताचे ABO गटांचा शोध लावला. A आणि B या RBC वर प्रतिजनांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावर आधारित, रक्तगट तयार केले जाते. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.
Result:
@@@@@

Post a Comment

0 Comments