शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष
प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक
शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष Sanch manayata Nikash सुधारित करण्याबाबत पत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार संचमान्यता
सुधारीत निकष Sanch manayata Nikash देण्यात आलेले आहेत. त्या निकषानुसार शिक्षक
पदे निश्चित करण्यात येणार आहेत. असे Sanch manayata
Nikash संचमान्यता सुधारीत निकष कोणते आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली
आहे. आशा करतो आपणास या पोस्टद्वारे सर्व माहिती समजण्यास मदत होईल.
Government of Maharashtra Commissionerate
of Education, Maharashtra State Central Building, Dr. Annie Besant Road, Pune 411001. शिक्षण
आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग पुणे ४११ ००१. यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेले
पत्रक.
प्रति, मा. अपर मुख्य सचिव, क्र. आस्था / माध्य/संच मान्यता / निकष / २०२० / /833 दि. १३/०७/२०२० शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
संचमान्यता सुधारीत निकष विषय : प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक
संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याबाबत.
संचमान्यता सुधारीत निकष संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय
क्रं एसएसएन-२०१८/प्रक्र१६/ १५/ टीएनटी-२ दि.२८/८/२०१५ व दि. ०२/०७/२०१६ व दिनांक
०१/०१/२०१८.
२.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि. २/७/२०१३ व दि. १९/९/२०१९
३.
शासन पत्र क्र संकीर्ण-२०१९ / प्रक्र १४१/१९/टिएनटी-२ दि. २१/९/२०१९
राज्यातील
सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक
संवर्गातील पदे निश्चित करण्यासाठी शासनाने संदर्भाधिन क्र.१ च्या शासन
निर्णयान्वये धोरणात्मक निर्णय घेवून त्यानुसार सद्यस्थितीत सन २०१५-१६ पासून
शाळांना पदे मंजूर करण्यात येत आहेत.
संच
मान्यतेच्या सदर निकषानुसार शाळांना पदे मंजूर होत नसल्याने संबंधित घटक, लोकप्रतिनिधी, विधिमंडळाचे सन्माननीय सदस्याकडून विधानमंडळामध्ये लक्षवेधी सूचना,
प्रश्नोतरे यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. सदर बाब
विचारात घेवून शासन निर्णय दि. २८/८/२०१५ मधील मुद्दा क्र २.१ ते २.३ वरील तरतुदी
सुधारित करण्यासाठी माध्यमिक शाळेसाठी परिशिष्ट-अ व प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेसाठी परिशिष्ट व मध्ये नमुद केल्यानुसार निकष
प्रस्तावित करण्यात येत आहेत.
सदर
निकष निश्चित करताना खालील बाबी प्रस्तावित करण्यात येत आहेत.
संचमान्यता सुधारीत निकषः-
१.
प्राथमिक शाळांतील प्राथमिक (इ.१ ली ते इ.५वी) व उच्च प्राथमिक (इ.६वी ते इ.८ वी)
या गटातील पदांसाठी केंद्र शासनाच्या दि. २९/८/२००९ मधील राजपत्रातील
परिशिष्टामध्ये नमुद केल्यानुसार पदे देण्यासाठी सदर निकष विचारात घेवुन
प्रस्तावित करण्यात येत आहेत.
२. बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदी विचारात घेता ज्या
माध्यमिक शाळा इ.५वी वर्गापासून आहेत त्या शाळांतील इ. ५ वी वर्ग नजीकच्या १ किमी
परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या प्राथमिक शाळेस सन २०२१-२२
पासून जोडण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.
३.
माध्यमिक शाळांमध्ये पूर्वी विशेष शिक्षक स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येते होते
त्यानुसार येणारा कार्यभार विचारात घेवून शिक्षकांच्या प्रमाणात विशेष शिक्षक
क्रीडा, कला व
कार्यानुभव यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.
४. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक
पदासाठी सध्या असलेल्या निकषामध्ये बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात येत नाही,
सध्या असलेले निकष योग्य आहेत.
५.
नव्याने निश्चित होणा-या निकषानुसार सन २०२०-२१ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक
अतिरिक्त होत असले तरी अशा शिक्षकांना शाळांतील विद्यार्थी वाढीसाठी पुढील एक
शैक्षणिक वर्षासाठी संधी देण्याबाबत व विद्यार्थी वाढ न झाल्यास सन २०२१-२२ च्या
संच मान्यतेनुसार अन्य शाळेत समायोजन करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.
६.
कमी पटसंख्येच्या शाळांबाबत पुर्वोच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्यास
अनुदान बंद करणे अथवा शिक्षार्थ कपात करण्याची तरतूद होती. सदर तरतुदी विचारात
घेता प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील १५, खाजगी अनुदानित प्राथमिकसह उच्च
प्राथमिक वर्ग असणा-या शाळेत २० व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील २५ या पेक्षा
कमी असल्यास व अनुक्रमे १.३ व ५ किमी परिसरात संबंधित प्रकाराची शाळा असल्यास अशा
शाळांतील स्थायी शिक्षकांचे पदासह समायोजन अन्य शाळांमध्ये करुन व्यवस्थापनास सदर
शाळा पुढे चालवावयाची असल्यास सदर शाळा स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर पुढे चालू
ठेवण्यास परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे व यासाठी शाळांना पटसंख्या वाढविण्यास २
शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन २०२१-२२ व सन २०२२-२३ साठी संधी देण्याबाबत प्रस्तावित
करण्यात येत आहे.
७.
यासोबतच्या परिशिष्टामध्ये नमुद करण्यात आलेल्या निकषानुसार पदे ही शासनाने
वेळोवेळी मंजूर केलेल्या पदसंख्येच्या मर्यादेत देय होत आहेत.
८. सन
२०१९-२० या वर्षांच्या संच मान्यता झालेल्या नाहीत व आता शैक्षणिक वर्ष २०२० २१
सुरु झाल्यामुळे सन २०१८-१९ या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेली पदेच सन २०१९-२०
विचारात घेवून सुधारित निकष सन २०२० २१ पासून लागू करणे आवश्यक राहील,
वरील
प्रमाणे प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील शाळांच्या संच मान्यतेसाठी यासोबतच्या
परिशिष्ट-अ व ब मध्ये नमूद केल्यानुसार प्रस्तावित करण्यात येत आहे. याबाबत
शासनाचे योग्य ते आदेश व्हावेत, ही विनंती.
प्रतिलिपी
(विशाल
सोळंकी) आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे-१
उपसचिव
(टिएनटी), शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
यांना माहितीस्तव शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे- १
शिक्षण
संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म. रा. पुणे-१
संचमान्यता सुधारीत निकष टिप-
टिप
१. वरील प्रमाणे क्रीडा, कला व
कार्यानुभव ही पदे मंजूर होणा-या शिक्षक पदांच्या प्रमाणात त्या पुढील पदे मंजूर
करण्यात येतील.
टिप
२. क्रीडा, कला व
कार्यानुभव ही पदे मंजूर होणासाठी एकुण मान्य होणा-या शिक्षक पदांतर्गतच पदे असतील,
त्या त्या निकषानुसार स्वतंत्रपणे दर्शविण्यात येतील.
टिप
३. शाळेस वरील निकषानुसार विशेष शिक्षक पदे मंजूर होत असली तरी प्रत्यक्ष पद रिक्त
नसल्यास कार्यरत पदामधील शिक्षकमधील पद रिक्त झाल्याशिवाय असे विशेष शिक्षक पद
भरता येणार नाही. विशेष शिक्षक पदावर सदर शिक्षक कार्यरत राहतील.
टिप
४. एखाद्या शाळेत विशेष शिक्षकाची पदे मंजूर होत आहेत व तेवढीच कार्यरत असतील व
शाळेत शिक्षक अतिरिक्त होत असतील तर विशेष शिक्षकास अतिरिक्त ठरविण्यात येणार
नाही.
टिप
५. शाळेस मंजूर होणा-या पदासाठी प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करुन देताना विषयनिहाय
येणारा कार्यभार विचारात घेण्यात यावा.
0 टिप्पण्या