Back Dated MDM शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती
शाळेत दररोज शिवजवला जाणारा शालेय पोषण आहार याची नोंद आपणास MDM Maharashtra Portal वर करावयाची असते. आपण तसे नंद करत आसतो. मात्र वेबसाईट न चालणे मुख्याध्यापक रजेवर असणे किंवा इतर कारणामुळे आपण तशी नोंद करू शकत नाही. सध्या आपल्याला मागील दिवसाचा राहिलेला डाटा भरण्याची सुविधा उपल्बध करून देण्यात आलेली आहे. आपण केंद्रप्रमुख किंवा तालुका लॉगीन वरून ही माहिती भरू शकता.
MDM-Maharashtra-Portal पत्रक-
विषय :- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत. संदर्भ:- संचालनालयाकडील पत्र जा. क्र. प्राशिसं/ शापोआ/ ऑनलाईन/२०२२/१७४० दि. ३०.०९.२०२२.
उपरोक्त विषयान्वये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणा या लाभार्थ्याच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल APP व वेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळानी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शालाया खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे. कोचिङ १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शालार्थ अनलाईन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालावे वितरण विद्यार्थ्याना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळा अन शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रति निवेदने संचालनायास प्राप्त झाली आहेत.
उक्त बाबत सर्व जिल्ह्यांना सूचित करण्यात येते की, शाळांना मागिल कालावधीची (माहे मार्च २०२२ सप्टेंबर २०२२ अखेर दैनदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरीता केंद्र प्रमुख तथा तालुका लॉगिनवर दि. १५.१०.२०२२ रोजी पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदरच्या कालावधित आपल्या जिल्ह्यातील काही शाळाची दैनदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास, अद्यावत करून घेण्यात यावी. तद्नंतर सेब सवालनालयस्तरावर देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार नसलेबाबा अवगत करून देण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम पोर्टलवर उपस्थितीची माहित अद्यावत करीत असलेबाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा.
Back Dated MDM सूचना-
ALL SCHOOLS ARE INSTRUCTED THAT IF THEY MISSED THEIR DAILY ATTENDANCE FROM MARCH 2022 THE FACILITY OF BACK DATED DATA ENTRY IS MADE AVAILABLE FOR ALL ELIGIBLE SCHOOLS FROM 01 OCT TO 06 OCT 2022 COMPLETE YOUR DATA ENTRY WITHIN PRESCRIBED TIME LIMIT AFTER THAT SUCH TYPE OF FACILITY SHOULD NOT BE MADE AVAILABLE FOR ANY SCHOOL AT ANY COST
मागील दिवसाचा MDM कसा भरावा-
आपणास दिलेल्या मुदतीमध्ये शालेय पोषण आहार भरावयाचा आहे. तो आपण केंद्रप्रमुख MDM Login किंवा गयशिक्षणाधिकारी यांच्या MDM Login वरून भरू शकता. अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा. अतिशय सोप्या पध्दतीने ही माहिती आपण मोबाईल वरून देखील भरू शकता.
आपणास हे ही आवडेल.
0 टिप्पण्या