महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ०४ कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ परिरक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना
१. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात
येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) ची लेखी परीक्षा दि.०४/०३/२०२२ ते दि.३०/०३/२०२२
व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) ची लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते दि.
०४/०४/२०२२ या कालावधीत प्रचलित पध्दतीने (ऑफलाईन) आयोजित करण्यात येत आहेत.
२. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये काविड १९
विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह
शाळा उशीराने सुरू झालेल्या आहेत. तद्नंतर काही ठिकाणी त्या वेळोवेळी बंद ठेवाव्या
लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव पुरेसा होऊ न शकल्यामूळे लेखी
परीक्षेतील पेपरचा वेळ या परीक्षेला ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे व ४०
ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढविण्यात आला असून त्यानुसार अंतिम
वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
३. या जादा वेळेव्यतिरिक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जादा वेळेसह इतर सर्व सुविधा व सवलती कायम राहतील. (उदा. तीन तासाच्या पेपरसाठी या परीक्षेला ३ तास ३० मिनीटे देण्यात आलेली आहे.
या वेळेव्यतिरिक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर तीन तासाच्या पेपरसाठी ६० मिनीटे प्रचलित जादा वेळेची सवलत देय राहील.) ४. सदर लेखी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्याथ्र्यांना २५ टक्के कपात केलेला अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दयावी लागणार आहे.
परीक्षेची बैठक व्यवस्था-
५. लेखी परीक्षा विद्याथ्र्यांच्या शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयातच घेण्यात येईल. १५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी
एकापेक्षा अधिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल.
मंडळामार्फत निश्चित केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ही प्रचलित पध्दतीने मुख्य
केंद्र राहतील व अन्य जोडण्यात आलेल्या शाळा/कनिष्ठ ही महाविद्यालये उपकेंद्र
राहतील,
मुख्य परीक्षा केंद्र असलेले शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे
मुख्याध्यापक / प्राचार्य हे केंद्रसंचालक राहतील तसेच ज्या शाळा/कनिष्ठ
महाविद्यालय जोडण्यात आलेले आहे. त्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/
प्राचार्य हे उपकेंद्रसंचालक म्हणून कार्यरत राहतील.
६. विद्याथ्र्यांची बैठक व्यवस्था ही त्याच्या
स्वतःच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात यावी. मुख्य केंद्राच्या
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मुख्य केंद्रात व उपकेंद्राच्या
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी संबंधित उपकेंद्रातून परीक्षेसाठी प्रविष्ट
होतील. मुद्दा क्र.५ प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत एकापेक्षा अधिक शाळा / कनिष्ठ
महाविद्यालये एकत्र करून उपकेंद्र निश्चितीकरण केलेले असल्यास विभागीय मंडळाने
निश्चित केलेल्या एकाच उपकेंद्रावर विद्यार्थी प्रविष्ट होतील.
७. विद्यार्थ्यांची परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था
करण्यासाठी इमारतीतील जास्तीत जास्त आकारमानाच्या खोल्यांचा/ हॉलचा वापर करण्यात
येणार आहे. वर्गखोलीमध्ये बैठक व्यवस्थेसाठी बेंच मांडणी करताना जास्तीत जास्त
जागेचा वापर करुन दोन बॅचमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, वर्गखोलीत
प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी याप्रमाणे झिगझॅग (Zig-Zag) पध्दतीने
बसवण्याबाबत आणि बैठक व्यवस्थेसाठी शक्यतो मोठ्या आकारमानाच्या वर्गखोल्या / हॉल
वापरण्याबाबत केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालकांना सूचित केलेले आहे. याप्रमाणे
कार्यवाही होत असल्याची खातरजमा करावी.
८. आपत्कालीन परिस्थितीत / कोविड १९ च्या
प्रादुर्भावामुळे शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत अधिग्रहित प्रतिबंधित
करण्याची शक्यता असल्यास अथवा विलगीकरण केंद्र/चारंटाईन सेंटर म्हणून घेण्याची
शक्यता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यथोचित कार्यवाही करण्याबाबत
सूचित करण्यात आलेले आहे. याबाबत आवश्यकता भासल्यास आपणही आपल्या स्तरावरुन आवश्यक
कार्यवाही करावी..
९. उपरोक्तप्रमाणे बैठक व्यवस्था करताना प्रत्येक विद्यार्थ्याची सर्व विषयांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्र उपकेंद्रावर घेण्याचे नियोजन केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालक यांचेमार्फत होईल असे पहावे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता
१०. परीक्षेपूर्वी परिरक्षण केंद्राच्या बर्ग खोल्पा, स्वच्छतागृहे व संपूर्ण परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. आवारातील कचरा कुंडया झाकून ठेवाव्यात. परीक्षा कालावधीत स्वच्छतागृहाची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी व स्वच्छतागृहात साबण किंवा हॅन्डवॉश ठेवण्यात यावा
११. परिरक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर
सर्व घटकांचे Thermal Screening दद्वारे तापमान घेण्यात यावे.
तसेच मास्क, सॅनिटायझर वापरणे संदर्भात सूचना देण्यात
याव्यात. तापमान मर्यादिपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यात
यावी.
१२.इ.१०वी व इ. १२ वी परीक्षा सकाळ सत्रात १०.३०
वाजता व दुपार सत्रात ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्य
परीक्षा केंद्रावर सकाळ सत्रात सकाळी ०८.५० पर्यंत व दुपार सत्रात दुपारी ०१.२०
पर्यंत प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे पोहोच करणे आवश्यक राहील तसेच उपकेंद्रावर
सकाळ सत्रात सकाळी ०९.५० पर्यंत व दुपार सत्रात दुपारी ०२.२० पर्यंत
प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे पोहोच करणे आवश्यक राहील. सदर वेळा तसेच परिरक्षक
केंद्रापासून मुख्य परीक्षा केंद्र व उपकेंद्रांची अंतरे व प्रवासासाठी लागणारा कमाल
वेळ विचारात घेऊन परिरक्षण केंद्र उघडणे, Thermal Screening द्वारे तापमान घेणे, परीक्षा क्रेंदनिहाय
प्रश्नपत्रिका पाकीटांची विभागणी करणे व ती परीक्षा केंद्रावर पोहचविणे
इत्यादीबाबत परिरक्षकांनी नियोजन करुन कार्यवाही करावी. अपवादात्मक परिस्थितीत
उपरोक्त कार्यवाहीला अधिकचा वेळ लागणा-या प्रकरणात विभागीय मंडळाच्या सूचना / आदेश
विचारात घेवून कार्यवाही करावी.
१३. परिरक्षण केंद्रावर येणाऱ्या सर्व घटकांकडून
कोबिड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या आरोग्य विषयक सर्व
सूचनांचे पालन होणे बंधनकारक राहील.
१४. परिरक्षण केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व
सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. तथापि, अधिक
सुरक्षिततेच्या दृष्टीने परिरक्षण केंद्रात येताना स्वतःची पाण्याची बाटली व
लॅनिटायझरची छोटी बाटली सोबत आणण्याबाबत तसेच मास्क आणण्याबाबत संबंधितांना सूचित
करावे.
१५. परिरक्षण केंद्रात कार्यरत असणाऱ्या व येणाऱ्या
सर्व घटकांमध्ये पुरेसे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच प्रश्नपत्रिका वितरित
करणे,
उत्तरपत्रिका जमा करणे, उत्तरपत्रिकेबर युआयडी
स्टिकर लावणे, उत्तरपत्रिकांचे गट्टे तयार करणे व इतर सर्व अनुषंगिक
कामे • करतानादेखील पुरेसे अंतर ठेवावे आणि शासन व आरोग्य
विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करून कार्यवाही करावी.
१६. परिरक्षण केंद्रातील कामाशी संबंधित नसणाच्या अन्य कोणत्याही घटकांना परिरक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये.
प्रश्नपत्रिका वितरण व उत्तरपत्रिका संकलन व्यवस्थापन
१७. परिरक्षकांनी आपल्या केंद्रासाठी आपल्या
अधिनस्त सर्व उपकेंद्रासाठी विषयनिहाय विद्यार्थी संख्या विचारात घेऊन आवश्यक
उत्तरपत्रिका, पुरवण्या व इतर साहित्य लेखी परीक्षा सुरु
होण्यापूर्वी उपलब्ध झाले असल्याची केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालक यांच्याकडून
खातरजमा करून घ्यावी लेखी परीक्षेदरम्यान वेळोवेळी केंद्रसंचालक व उपकेंद्रसंचालक
यांचेकडून सदर साहित्याबाबत आढावा घेऊन आवश्यकता असल्यास ते परिरक्षक / विभागीय
मंडळाकडून उपलब्ध करून दयावे.
१८. उर्वरित प्रश्नपत्रिकांची पाकिटे, फॉर्म नं.१ व २ आणि अनुषंगिक अहवाल त्या त्या दिवशी तसेच शिल्लक स्टेशनरी व इतर साहित्य परीक्षा संपल्यानंतर मुख्य केंद्र व उपकेंद्र यांच्याकडून जमा करून विभागीय मंडळाकडे देण्यात यावे.
१९. केंद्रसंचालकांना दोन प्रतीत सेंटर हॉलरीज
देण्यात येईल. सदर हॉलरीज पैकी एक मुख्य प्रत मुख्य केंद्रासाठी व दुसरी प्रत
उपकेंद्रासाठी असेल. यामध्ये परीक्षा केंद्र / उपकेंद्रातील दिनांक, विषय माध्यम व प्रविष्ट विद्याथ्र्यांचे बैठक क्रमांक इ. माहितीचा समावेश
असेल. या हॉलरीजनुसार प्रत्येक दिवसाची बैठक व्यवस्था परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर
स्वतंत्रपणे करण्याबाबत केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालकांना सूचना देण्यात आलेल्या
आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत संबंधितांना सूचित करावे.
२०. हॉलरीजप्रमाणे प्रत्येक दिवशी सत्रनिहाय
परीक्षा केंद्र/ उपकेंद्रास आवश्यक प्रश्नपत्रिकांची संख्या विचारात घेऊन
प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे परिरक्षकांमार्फत मुख्य केंद्रास प्रचलित
पध्दतीप्रमाणे वितरीत केली जातील. हॉलरीजमधील तपशील विचारात घेऊन उपकेंद्रासाठी
आवश्यक असणारी प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रामार्फत
उपकेंद्रास निर्धारित वेळेत पुरवली जातील याबाबत दक्षता घ्यावी.
२१. १० वी परीक्षेसाठी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र (७७) या विषयास प्रविष्ट होणा-या पुनर्परीक्षार्थ्यांसाठी / श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ट विद्याथ्र्यांसाठी प्रश्नपत्रिकांच्या पाकिटांचा रंग पिवळा (Yellow) व इ. १२ वी (सर्वसाधारण अभ्यासक्रम) परीक्षेसाठी एन. एस. क्यू. एफ अंतर्गत व्यावसायिक विषय Electronics & Hardware Installation Technician Peripherals (E. 5) व कलेचा इतिहास व रसग्रहण (६०), भारतीय संगीताचा इतिहास व विकास (६५), तालवाद्य (६९) या विषयांना प्रविष्ट होणा-या पुनर्परीक्षार्थ्यासाठी / श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकांच्या पाकिटांचा रंग गुलाबी (Pink) असेल.
२२. इ.१० वी व इ. १२ वीच्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांसाठी
२५ प्रश्नपत्रिकांचे एक याप्रमाणे ब्राऊन / खाकी (Brown) रंगाची
पाकिटे पुरविण्यात येतील. उपरोक्त क्र. २२ व २३ मधील बाब लक्षात घेऊन
प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे वितरित करण्यात यावीत.
२३. प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट विहित पध्दतीने
परीक्षा कक्षात उघडल्यानंतर गैरहजर परीक्षार्थी किंवा अन्य कारणांमुळे शिल्लक
राहीलेल्या प्रश्नपत्रिका पेपर संपेपर्यंत पर्यवेक्षकाने स्वतःकडेच जतन करून ठेवणे, त्याचा गैरवापर होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेणे तसेच पेपर
संपल्यानंतर सदर शिल्लक प्रश्नपत्रिका केंद्रसंचालकाकडे जमा करणे इत्यादीबाबत
सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत असल्याची आपल्या
स्तरावरून वेळोवेळी खातरजमा करावी.
२४. परिरक्षण केंद्र ते मुख्य केंद्र प्रश्नपत्रिका
वितरण करण्यासाठी प्रचलित पध्दतीने परिरक्षकाने सहायक परिरक्षकांची (रनर) नियुक्ती
करावी. मुख्य केंद्र ते उपकेंद्र प्रश्नपत्रिका वितरण करण्यासाठी परिरक्षकांनी
मुख्य केंद्रसंचालकांशी विचारविनिमय करून योग्य व्यक्तीची सहायक परिरक्षक (स्नर)
म्हणून नियुक्ती करावी. ही नियुक्ती करताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील
शिक्षकांची अथवा अन्य व्यक्तींची (उदा. जिल्हा परिषद / म.न.पा. शाळांचे
केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक) संमतीने नियुक्ती करावी. सदर व्यक्तींनी मुख्य
परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकांची सिलबंद पाकिटे वेळेत ताब्यात घेवून ती
उपकेंद्रावर पोहचवावी. तसेच संपूर्ण परीक्षा कालवधीत बैठे पथक म्हणून उपकेंद्रावर
कार्यरत रहावे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे संकलन करून त्या मुख्य
केंद्रावर उत्तरपत्रिका फॉर्म नं. १,२३ सह जमा करतील व
तदनंतर मुख्य केंद्रावरील सहायक परिरक्षक (रनर) सर्व उत्तरपत्रिका फॉर्म नं. १ व २
सह संबंधित कागदपत्रे परिरक्षकाकडे जमा करतील
२५. उपकेंद्रावरील सर्व उत्तरपत्रिका अनुषंगिक बाबी
२० मिनीटात सर्व कामकाज पूर्ण करून ३० मिनीटात मुख्य केंद्रावर पोहचतील असे नियोजन
करावे. मुख्य केंद्राने उपकेंद्रावरुन प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिकाचे व इतर
साहित्याचे संकलन करुन तद्नंतर ३० मिनीटात परिरक्षकांकडे पोहचवाव्यात अशा सूचना
केंद्रसचालक/ उपकेंद्रसंचालक यांना देण्यात आलेल्या आहेत त्याची काटेकोर
अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी, अपवादात्मक
परिस्थितीत परिरक्षकाने विभागीय मंडळाकडून सूचना / आदेश घेवून प्रकरणपरत्वे निर्णय
घ्यावा.
२६. परिरक्षकाने इतर सर्व अनुषंगिक बाबींची
कार्यवाही परिरक्षक / केंद्रसंचालक /सहकेंद्रसंचालक इ.
साठीच्या मार्गदर्शक सूचना पुस्तिकेनुसार करण्यात यावी. प्रत्येक परिरक्षक केंद्र,
मुख्य केंद्र व प्रत्येक उपकेंद्राला सदर पुस्तिका विभागीय
मंडळामार्फत पुरविण्यात येतील,
२७. परीक्षेपूर्वी कामाचे नियोजन करण्यासाठी
परिरक्षकाने सभेचे आयोजन करावे. सदर सभकरीता सर्व मुख्य केंद्रसंचालक, सर्व उपकेंद्रसंचालक, मुख्य केंद्रासाठी नियुक्त सहायक
परिरक्षक व सर्व उपकेंद्राचे रनर तसेच परिरक्षक कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांना
सभेसाठी आमंत्रित करून सदर सभेत उपरोक्तप्रमाणे
कामाचे नियोजन व तणावमुक्त वातवरणात काम करण्याकरीता सविस्तर सूचना देण्यात
याव्यात.
अतिशय महत्वाचे
1. केंद्रसंचालकाने स्वतःच्या केंद्राच्या व
अधिनस्त उपकेंद्रांच्या संदर्भातील मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षांचा दैनंदिन गैरमार्ग
प्रकरण,
विद्यार्थ्यांची उपस्थिती / अनुपस्थिती व अनुषंगिक माहिती प्रत्येक
पेपर संपल्यानंतर ऑनलाईन सादर करणे अनिवार्य राहील. सदर माहिती ऑनलाईन सादर
केल्यानंतरच उत्तरपत्रिका फॉर्म नं. १ व २ सह परिरक्षकाकडे जमा करून घेण्यात येईल.
२ उपरोक्त प्रमाण दैनंदिन माहिती ऑनलाईन भरण्यासाठी प्रत्येक केंद्रसंचालकांना लिक चा तपशील विभागीय मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. सदर लिंकवर मुख्य केंद्राने माहिती भरून नोंदणी करावी लागेल. सदर नोंदणी लेखी परीक्षा सुरु होण्याआधी दोन दिवस अगोदर पूर्ण करणे आवश्यक राहील.
१३. मुख्य केंद्राने स्वतःची संबंधित माहिती ऑनलाईन
पध्दतीने भरावी तसेच आपल्या अधिनस्त सर्व उपकेंद्राकडून सदर माहिती वेळेत प्राप्त
करून घेऊन भरावी, मुख्य परीक्षा केंद्र व सर्व अधिनस्त
उपकेंद्राची माहिती भरून झाल्यानंतर केंद्रसंचालकांना दिवस / सन्त्रनिहाय
स्वतःच्या व अधिनस्त उपकेंद्राच्या भरलेल्या माहितीचा तपशील लॉग-इन केल्यानंतर
दिसू शकेल, सदर माहिती पूर्णपणे भरल्याची खात्री करुनच
संबंधित परीक्षा केंद्राच्या उत्तरपत्रिका जमा करून घ्याव्यात
0 टिप्पण्या