Samvidhan Divas Constitution day Constitution week 2021 माझे संविधान, माझा अभिमान 2021

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride 

विषय:- सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दि. २३ ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीमध्ये "माझे संविधान, माझा अभिमान उपक्रम राबवणेबाबत.

संदर्भ :- शासनाचे परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र. १६४/एसडी-४ दि. २२ नोव्हेंबर, २०२१.

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride


संविधान दिन हा 'संविधान दिवस' म्हणूनही ओळखला जातो, आपल्या देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी, भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले, जे 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले.

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता शासनाने दि. २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान"उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने संदर्भीय शासन परिपत्रकाद्वारे घेतला आहे. उक्त शासन परिपत्रक यासोबत संलग्नित करण्यात आले आहे. सदरच्या शासन परिपत्रकाद्वारे "माझे संविधान, माझा अभिमान" Samvidhan Divas उपक्रमांतर्गत शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा.

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride

शासन निर्णय –

राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये "माझे संविधान, माझा अभिमान " उपक्रम राबविणे बाबत....

दिनांक: २२ नोव्हेंबर, २०२१

संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३३६/एस.डी-४ दि.२४ नोव्हेंबर, २०१६. २. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.११/एस.डी-४ दि. २१ जानेवारी, २०२०.

प्रस्तावना

संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वांतत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती, संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मुलतत्वांविषयी जाणीवजागृती होणे अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये, पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.

"माझे संविधान, माझा अभिमान"

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride


#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride


#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride

उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride या HASHTAG (# ) चा वापर करून आपल्या व्हिडीओ फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद आहेत, त्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माध्यमातुन सहभागी व्हावे. सदर कार्यक्रमांतर्गत समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आलेल्या पोस्टच्या नोंदी करण्यासाठी ऑनलाईन लिंक आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठीच्या सविस्तर सुचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात येतील.

 

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

#Constitutionday 2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride चा वापर करून आपण देखील या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

Constitution Day Essay Contest

Constitution Quiz
Constitution Pledge 

Participation in National Essay Competitions

#ItsMyDuty- Share your stories on Fundamental duties


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या