The role of principals in the teaching of English इंग्रजीच्या अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका
इंग्रजीच्या अध्यापनात
मुख्याध्यापकांची भूमिका
"जसे मुख्याध्यापक तशी शाळा' असे मुख्याध्यापकांच्या भूमिकेचे वर्णन करण्यात येते. अध्यापक, प्रशासक व व्यवस्थापक अशा प्रकारे मुख्याध्यापकांना विविध भूमिकेतून शाळेचे कामकाज करावे लागते. दर्जेदार अध्यापन करण्याबाबत सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन करणारे अध्यापन कुशल मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस मदत करतात. शाळेतील कामकाजावर नियंत्रण ठेवून सहकारी शिक्षकांच्या अध्यापनातील त्रुटी ते कुशलतेने दूर करीत असतात. शालेय शिस्त राखणे आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी विविध उपक्रमांची कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातून व वर्तनातून शाळेचा दर्जा प्रतिबिंबीत होत असतो. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्याविषयी मुख्याध्यापकांना तपशीलवार माहिती असणे आवश्यक असते. तो समाजाभिमुख असणे आवश्यक असते. समाजऋणाची जाण ठेवून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी झटणारे ज्ञानपरायण मुख्याध्यापक शाळेचा दर्जा वाढविण्यात यशस्वी होतात.
मुख्याध्यापकाची
भूमिका शाळेच्या विकासात फार महत्त्वाची असते. खास करून मराठी माध्यमांच्या खास
करून इंग्रजी माध्यम सोडून इतर माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी विषय अध्यापन व
अध्ययनात बऱ्याच समस्यांना समोर जावे लागते. मुलांना इंग्रजी विषया शिकण्यात
बऱ्याच अडचणी येत असतात. अशावेळी इंग्रजी विषय शाळेत कसा शिकवता येईल.
शिक्षकांसाठी कोणते प्रशिक्षण मार्गदर्शन, संदर्भ साहित्य उपक्रम राबवता येतील
यावर विचार करावा लागतो. कारण शाळेची गुणवत्ता साध्य करावयाची असेल तर मुलांना
अवघड वाटणार विषय कसा सोपा करता येईल यासाठी मुख्याध्यापकांनाच नियोजन करावे
लागते. चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या मदतीने मुख्याध्यापक आपल्या
शाळेत इंग्रजी विषयासाठी प्रयत्न करू शकतो. त्याची भूमिका कशी असावी याविषयी
माहिती मिळवू या.
सन २००० पासून शासनाने अभ्यासक्रमात इंग्रजी हा
विषय इयत्ता पहिलीपासून अनिवार्य केला आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजी भाषेची
मूलभूत कौशल्ये विदयार्थ्यांना आत्मसात व्हावीत हे या विषयाचे प्रमुख उद्दिष्ट
आहे. त्यासाठी वर्गात विविध कृती घडवून आणणे आवश्यक आहे. या विषयाच्या अध्यापनात
विद्यार्थी केंद्रित पद्धती, आनंददायी शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, वर्गातील विविध आंतरक्रिया या
सर्वांना फार महत्त्व आहे. या विषयाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी शिक्षकांबरोबरच
पालक, विदयार्थी यांचे सहकार्य आणि मुख्याध्यापकांची भूमिका
महत्त्वाची आहे.
सदर भूमिका प्रभावीरीत्या पार पाडण्यास मदत व्हावी यासाठी मुख्याध्यापकांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
१) इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम व इयत्तानिहाय
पाठ्यक्रम यावर मुख्याध्यापकांचे प्रभुत्व असावे.
२) इंग्रजी प्रशिक्षित शिक्षकांनाच अध्यापनासाठी
इंग्रजी विषय दयावा. शिक्षकांशी इंग्रजी विषय अध्यापनातील समस्यांवर चर्चा करून
त्यांना मार्गदर्शन करावे.
४) गटसंमेलनामध्ये विविध शाळांतील इंग्रजी
अध्यापनाची स्थिती जाणून घ्यावी. त्यावर संबंधित शिक्षकांशी चर्चा करावी आणि अधिक
दर्जेदार शिक्षणासाठी अध्ययन अध्यापन विषयक विविध उपक्रमांचे नियोजन करावे.
४. इंग्रजी अध्यापनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
शिक्षकास विविध प्रकारची शैक्षणिक साधने मुख्याध्यापकांनी उपलब्ध करून द्यावीत.
उदा. दृक-श्रवण साधने, सी.डी., विविध
प्रकारचे तक्ते, ध्वनिफिती, टेपरेकॉर्डर,
बॅटरी सेल इ.
६. फ्लॅश कार्डस, तरंग-चित्रे,
वाक्यपट्ट्या, फ्लॅनेल बोर्ड इत्यादी इंग्रजी
साहित्य शिक्षकांकडून करून घ्यावे.
७. भाषिक कौशल्य विकसनासाठी अध्यापनाच्या पारंपारिक
पद्धतीपेक्षा वैयक्तिक मार्गदर्शन, गटकार्य आणि सराव
याबाबत मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करावे.
८) इंग्रजी पाठ्यपुस्तकाचे स्वरूप हे शिक्षकास
मार्गदर्शन करणारी हस्तपुस्तिका आणि विदयार्थ्यांच्या सरावाची कार्यपुस्तिका असे
आहे. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाचा तपशीलवार अभ्यास करून सांगितलेल्या कृती
पुस्तकातील सूचनेप्रमाणे करणे आवश्यक आहे. सदर बाबीची कार्यवाही शिक्षकांच्याकडून
होत असल्याची मुख्याध्यापकांनी खात्री करावी.
९) शिक्षकाचे विषयज्ञान अधिक समृद्ध करण्यासाठी
शैक्षणिक साधनांबरोबरच अभ्यासक्रम, ऑक्सफर्ड शब्दकोष,
चित्र शब्दकोष, शिक्षक हस्तपुस्तिका, इंग्रजी वृत्तपत्रे इत्यादी अध्ययन अध्यापनास उपयुक्त साधने
मुख्याध्यापकांनी शिक्षकांना उपलब्ध करून दयावीत.
१०) शिक्षकाच्या इंग्रजी अध्यापनाचे अधून मधून
निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करावे.
अशा प्रकारे इंग्रजीच्या अध्यापनात
मुख्याध्यापकांची भूमिका आहे. यात जर मुख्याध्यापक यशस्वी झाले तर नक्कीच
विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यास परिणामी शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. अवघड
वाटणारा इंग्रजी विषय सोपा वाटेल. या वेगवेगळ्या कृती उपक्रमातून इंग्रजीच्या
अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका बजावावी लागते.
आपणास हे ही आवडेल.
0 टिप्पण्या