How to fill matta dayitva form?
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचान्यांनी त्यांची मत्ता व दायित्वाची विवरणे दरवर्षी सादर करावीत अशी तरतूद वरील (१) येथील आदेशान्वये विहित करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी दरवर्षाच्या दिनांक ३१ मार्च रोजीच्या स्थितीस अनुसरून त्यांची मत्ता व दायित्वाची विवरणे matta dayitva form त्या वर्षीच्या ३१ मे पर्यंत विहित प्राधिकरणास सादर करावयाची आहेत. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांच्या अखत्यारितील सर्व निमशासकीय संस्था, पंचायत राज संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती सांविधिक संस्था, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे यांनाही सदर तरतुदी वरील (२) येथील आदेशान्वये लागू करण्यात आल्या आहेत.
२. वरीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्यानंतरही काही अधिकारी / कर्मचा-यांकडून त्यांची मत्ता व दायित्वाची विवरणे matta dayitva form विहित वेळेत प्राप्त होत नसल्याचे आढळून आले आहे. सदर विवरणे विहित कालावधीत सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानण्यात येईल व अशा गैरवर्तणुकीबद्दल शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल अशी तरतूद वरील आदेशान्वये विहित करण्यात आली आहे. तसेच, कर्मचाऱ्याने विहित मत्ता व दायित्वाचे विवरण सादर केल्याशिवाय त्यास पदोन्नती वा
आश्वासित योजनेअंतर्गत पदोन्नती देण्यात येऊ नये. सदर विवरण सादर केले नसल्यास त्यास प्रतिनियुक्ती किंवा विदेश दौ-यास अनुमती देऊ नये अशा सूचनाही • वरील आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. वरील सूचनांकडे सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यात येत आहे. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची खबरदारी सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.
सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून (गट ड मधील कर्मचारी वगळून) त्यांची मत्ता व दायित्वाची विवरणे matta dayitva form विहित कालावधीत प्राप्त होऊन ती अभिलेखावर ठेवली जातील हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सक्षम प्राधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मत्ता व दायित्वाची विवरणे विहित वेळेत प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी दक्षतेने करावी. तसेच, अधिकारी व कर्मचान्यांनी त्यांची मत्ता व दायित्वाची विवरणे matta dayitva form विहित वेळेत संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत याची मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनीही खात्री करून घ्यावी.
वरीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत शिवाय ही मत्ता व दायित्वे कशी असतात व ती कश्याप्रमाणे भरावीत यासाठी आपण खालिल व्हिडिओ पाहू शकता.
0 टिप्पण्या