राज्यातील शाळा १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत रहाणार बंद शासनाचा महत्वाचा निर्णय !

 राज्यातील शाळा १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत रहाणार बंद शासनाचा महत्वाचा निर्णय

महाराष्ट्र राज्यातील शाळा दिनांक १५ नोव्हेबंर ते २० नोव्हेर या कालावधीत बंद रहणार आहेत. यामागील महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या २० तारखेला म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहेत. निवडणूक कामासाठी सर्व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून सर्व कर्मचारी इलेक्शन ड्यूटी वर असणार आहेत. याच कारणासाठी शासनामार्फत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्याच आलेला आहे. तो म्हणजे १५ ते २० नोव्हेंबर पर्यत शाळाना सुट्टी असणार आहे. 

राज्यातील शाळा १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत रहाणार बंद शासनाचा महत्वाचा निर्णय !


दिनांक १५ नोव्हेंबर - गुरूनानक जयंती 

दिनांक १६ नोव्हेंबर - शनिवार (कांही शाळांना शनिवार सुट्टी असते) 

दिनांक १७ नोव्हेंबर - रविवार

दिनांक १८ नोव्हंबर - शासनामार्फत सुट्टी 

दिनांक १९ नोव्हेबर - मतदान ड्यूटी 

दिनांक २० नोव्हेंबर- प्रत्यक्ष मतदान 

अशा प्रकारे शासनामार्थ पत्रक काडून सुट्टी देण्यात आलेली आहे. शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासकीय कार्यलये देखील बंद राहणार आहेत. 

पत्रक- 

विषय - विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 18,19, व 20 नोव्हेंबर 2024 रोजी शाळांना सुटटी जाहीर करणेबाबत.

संदर्भ: 1. मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र जाक्र/2024/प्रक्र-332/एसडी-4 दिनांक 14 नोव्हेंबर 2024

2. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याशी चर्चा दिनांक 14 नोव्हेंबर 2024.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने दिनांक 18,19 व 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी गरजेनुसार आपल्या तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याबाबत शाळा निहाय निर्णय घेण्यात यावा. तरी सर्व शाळांना आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. ज्या शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे कर्तव्य बजावण्याचे आदेश नाहीत परंतु त्या शाळेच्या इमारती मध्ये मतदान केंद्र आहेत अशा शाळांनी देखील आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.

राज्यातील शाळा १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत रहाणार बंद शासनाचा महत्वाचा निर्णय !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या