शिक्षण सप्ताह उपक्रम दिवस सहावा
परिशिष्ट क्र. ६
शिक्षा सप्ताह, दिवस सहावा वार
शनिवार दि. २७/०७/२०२४
Eco clubs for Mission LIFE Day
शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4Mother
या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता
आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही
उपक्रमांचे शनिवार दि. २७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.
अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत Plant 4 Mother अभियान आयोजित
करण्यासाठी सूचना
विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग:-
विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे
लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे
पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.
नावांचे फलक लावणे :-
विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ
लावावा.
रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे :-
विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे
शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे
संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या
रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल
याची खात्री करावी.
वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-
१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी
वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी
विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय
शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल
ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत.
२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या
मोहिमेबद्दल संभाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या
उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4Mother
आणि ॥एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर
अपलोड करावेत.
0 टिप्पण्या