Ticker

6/recent/ticker-posts

कृतिसंशोधन व नवोपक्रम kruti-sanshodhan

 कृतिसंशोधन व नवोपक्रम

सर्वप्रथम आपण कोणत्या उपक्रमांना प्रकल्प व कोणत्या उपक्रमांना नवोपक्रम म्हणायचे ते समजून घेऊ. काही उपक्रम असे असतात की ते एखादा हेतू साध्य झाला की संपतात. उदा. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविदयालयातील विशेष गरजा असणाऱ्या मुलांची तपासणी हा उपक्रम घेतला तर तशी तपासणी पूर्ण झाली की तो उपक्रम संपतो म्हणजेच एखादया विशिष्ट हेतूने घेतलेला उपक्रम तो हेतू साध्य झाला की संपतो. हे उपक्रम म्हणजेच 'प्रकल्प' होय.

कृतिसंशोधन व नवोपक्रम kruti-sanshodhan


शिक्षकाने आपला विषय अथवा त्याचा एखादा भाग परिणामकारकरित्या समजावून देण्यासाठी असे प्रकल्प स्वतः अथवा विदयार्थ्यांच्या मदतीने घेणे अपेक्षित असते. प्रकल्प करण्यामुळे आणखी काही गोष्टी साध्य होतात. उदा. विदयार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पामुळे त्यांना त्या विषयाबद्दल सखोल माहिती मिळते. एकत्रित काम केल्यामुळे सांघिक वृत्ती विकसित होते. विषय नीट समजतो. माहिती संकलित करण्याचे व त्याद्वारे निष्कर्ष काढण्याचे ज्ञान मिळते. स्वतः प्रकल्पात भाग घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही समस्येवर तयार उपाय / उत्तरे न मिळता ते उपक्रमातून प्राप्त होतात.

'शिक्षणक्षेत्रात अध्ययन-अध्यापन व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करताना, एवढेच नव्हे तर प्रशासन व व्यवस्थापन करताना शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची धडपड आपण करतच असतो. त्यात मिळालेल्या यशावर समाधान न मानता पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा, नावीन्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशील उपक्रम म्हणजे 'नवोपक्रम' असे थोडक्यात म्हणता येईल. याचाच अर्थ प्रकल्पातील सर्व संकल्पना नवोपक्रमात समाविष्ट असतात, पण यात नवीनतेला अधिक प्राधान्य असते. उदा. उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविदयालयातील मुलींचा क्रीडा स्पर्धामधील सहभाग वाढविणे. उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेता प्रत्येक शिक्षकाने स्वतःच्या, आपल्या विदयार्थ्यांच्या संस्थेच्या विकासासाठी दरवर्षी एखादा तरी उपक्रम हाती घ्यायला हवा.

नवोपक्रम कशासाठी :

१) नवीन वाटा शोधणाऱ्या, आगळा-वेगळा विचार करणाऱ्या शिक्षकांना आपले विचार कृतीतआणण्यास संधी मिळणे. 

२) विदयार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर स्वप्रयत्नाने

उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे. 

३) व्यवस्थापन, प्रशासन अथवा पर्यवेक्षण करताना वेगळ्या वाटेने जाऊन

गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करणे. 

४) उपक्रमशील व उत्कृष्टतेचा ध्यास असणाऱ्या शिक्षकाने सातत्याने

स्व-प्रेरणा मिळवित राहणे.

५) नावीन्याच्या अभावी येणारी मरगळ यांत्रिकता दूर करून उत्साहाने, नव्याने कार्यप्रेरित होणे.

नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये : 

गुणवत्तेसाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक शिक्षकामध्ये नवोपक्रम करण्यासाठी काही गुण असणे आवश्यक असते. 

१) उपक्रमशील शिक्षक हा कल्पक असतो. नवनवीन कल्पनांचा अंगीकार करून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारा व सर्जनशील शिक्षक असतो. 

२) नवनिर्मितीचा ध्यास घेऊन अखंड चिकाटीने प्रयत्न करणारा असतो. अधून मधून येणाऱ्या अपयशाने तो खचून जात नाही.  

३) स्वयंप्रेरणेने विचार व कृती करणारा असतो. उत्कृष्टतेसाठी, गुणवत्तेसाठी तो इतरांच्या मार्गदर्शनावर, प्रेरणेवर अवलंबून नसतो. स्वावलंबी वृत्तीने कार्य करीत राहतो. 

४) सभोवतालच्या परिस्थितीतील प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. चांगल्या अनुकरणीय बाबींकडे त्याचे विशेष लक्ष असते.

५) तो भविष्यकाळाचा वेध घेऊन चिकित्सक विचार करणारा असतो. २० ते २५ वर्षानंतरच्या परिस्थितीतही समर्थपणे जगण्यासाठी आज आपल्या विदयार्थ्यांमध्ये काय रुजायला हवे आहे याचा विचार तो सतत करीत असतो.

६) त्याची आपल्या व्यवसायावर पूर्ण निष्ठा असते. आपल्या कामाचे पावित्र्य, जबाबदाऱ्या व महत्त्व याची त्याला जाणीव असते व ती त्याच्या कामातून प्रतित होते.

७) तो वेळेचा पुरेपूर वापर करून आपली सर्व कामे वेळेत कार्यक्षमतेने आणि परिणामकारकतेने पूर्ण करणारा असतो.

नवोपक्रमाचे निकषः-

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण जे काही परंपरेपेक्षा वेगळे करतो त्याला नवोपक्रम म्हणतात. नवोपक्रमाचे निकष कोणते आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

१) नवीनता :

नवोपक्रम हा पारंपरिक उपक्रमापेक्षा वेगळा असतो. शाळा-शाळांमधून अनेक शिक्षक विविध उपक्रम घेतात. परंतु त्यात तोचतोचपणा असतो. एका ठिकाणी चाललेला उपक्रम दुसऱ्या शाळेत तसाच सुरू केला जातो काही शाळांमध्ये तर ठरावीक उपक्रम परंपरेने चाललेले असतात. त्याचेफायदे-तोटे यांचा विचार न करता व त्यात कोणताही बदल न करता जसेच्या तसे घेतले जातात. नवोपक्रमाची नवीनता पुढील तीन संदर्भात असते. 

2) कालसापेक्ष

नवीनता एखादा उपक्रम पूर्वी कधीही झालेला नसेल तर त्याची नवीनता अधिकतम असते. परंतु एखादया शिक्षकाने पूर्वीच्या उपक्रमात नवीन काळास बदलत्या संदर्भास अनुसरून बदल करून त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली तरीही तो त्या काळानुसार नवीनच ठरतो.

3)  स्थलसापेक्ष

नवीनता एखादा उपक्रम इतरत्र झाला असेल, परंतु शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात अथवा परिसरात पहिल्यांदाच होत असेल तर त्यात स्थलसापेक्ष नवीनता असते म्हणून शिक्षकांनी इतरत्र झालेल्या उपक्रमाची नवीनता कमी होते असे न समजता आपल्या शाळेत तो घेताना आवश्यक ते बदल करून व योग्य अशी साधने निवडून करावा. 

4)  व्यक्तिसापेक्ष

नवीनता शिक्षकाच्या स्वतःच्या दृष्टीने उपक्रम नवीन असतो. उपक्रमाची उद्दिष्टे, साधने मांडणी, उपयुक्तता या दृष्टीने शिक्षकाचे विचार व कल्पना नवीन असतात.

5) यशस्वीता :

नवोपक्रम सुरु करताना मनाशी धरलेले हेतू किंवा उद्दिष्टे उपक्रमाची अंमलबजावणी झाल्यानंतर साध्य झाली तर तो उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येते. अर्थात कोणताही उपक्रम परिपूर्ण असेलच असे नाही. ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी कोणती उद्दिष्टे साध्य झाली व कोणती झाली नाहीत. ती कोणत्या कारणांमुळे साध्य झाली नाहीत हे शिक्षकाने लक्षात घ्यावे. उपक्रमात पूर्व स्थितीपेक्षा किती प्रमाणात बदल झाला याची नोंद घ्यावयाची असते आणि यासाठीच पूर्वस्थितीची निरीक्षणे व नोंदी महत्त्वाच्या असतात. उपक्रमाची यशस्विता शिक्षक स्वतः ठरवित असतो. ती यशस्विता इतरांच्या व स्वतःच्या लक्षात येण्यासाठी यशस्वितेचे प्रमाण ठरविण्याचे निकष शिक्षकाने उपक्रमा अगोदरच ठरवून ठेवायचे असतात.

6) उपयुक्तता-

एखादा उपक्रम दुसऱ्या परिस्थितीत वेगळ्या ठिकाणी अन्य शिक्षकाने वेगळी साधने वापरून केला व त्याला त्यात यश आले तर त्या उपक्रमाची उपयुक्तता अधिक आहे असा अर्थ होतो.

अशा प्रकारे आपण नवोपक्रम याविषयीची व्याख्या व त्याची विविध पैलू याविषयी माहिती घेतली. नवोपक्रम व त्यावर आधारीत इतर माहिती पुढील भागात घेऊ.


कृती संशोधन

कृती संशोधन डाऊनलोड करण्यासाठी विषया खालील लिंकवर क्लिक करा.


“ ------ येथील इयत्ता ६ वी   च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या   समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची   परिणामकता अभ्यासणे.”

डाऊनलोड


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”

डाऊनलोड

“-------------------  येथील इयत्ता ६ वी   च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या   समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची   परिणामकता अभ्यासणे.”

डाऊनलोड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ----- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”

डाऊनलोड

जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा  शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे.

डाऊनलोड

“जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता  ६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची परिणामकारता तपासणे .”

डाऊनलोड

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ---ता. -----जि. ---  येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.



















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या