शाळा व्यवस्थापन समिती बैठकीसाठी नमुना विषयपत्रिका
Sample agenda for school management committee meeting
शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापक / प्रमुख शिक्षक
हा महत्वाचा घटक असतो. शाळेमध्ये असलेल्या विविध समित्याच्या सभांचे नियोजन
मुख्याध्यापकाला करावे लागते. वेळोवेळी अशा सभांचे आयोजन करून विविध विषयावर चर्चा
व ठराव समंत करून घ्यावे लागतात. शालेय व्यावस्थापनात निर्णय घेत असताना शाळा
व्यवस्थापन समितीच्या सभा घेणे आवश्यक असते. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा घेत
अशताना अशा सभेचे नियोजन कसे असावे, कोणत्या महिन्यातील सभेत कोणते विषय घ्यावेत,
शालेय कामकाजाचे नियोजन करत असताना कोणत्या महिन्यात कोणता विषय घ्यावा. शाळा
व्यवस्थापन समिती बैठकीसाठी नमुना विषयपत्रिका कशी असावी याविषयी थोडक्यात माहिती
आज आपण पाहणार आहोत. आशा करतो शाळा व्यवस्थापन समिती सभा आयोजन करताना आपणास नक्की
मदत होईल.
बैठक क्रमांक १ (माहे मे-जून)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. सर्वेक्षण व पटनोंदणीबाबत आढावा, नवागतांच्या स्वागताची तयारी, पटनोंदणी मोहिमेच्या
यशस्वितेसाठी उपक्रमांचे नियोजन करणे.
३. शालेय वार्षिक नियोजनास मान्यता/वार्षिक
शैक्षणिक आराखड्यास मान्यता देणे. सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत शैक्षणिक
गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करणे.
4. पुस्तक पेढी, मोफत गणवेश,
मोफत लेखन साहित्य, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई
5. फुले दत्तक पालक योजना यांसाठी लाभार्थीची निवड
करणे. शैक्षणिक उठाव योजना उद्दिष्ट ठरविणे, नियोजन करणे.
६. शालेय प्रतवारीमधील प्रचलित स्थान उंचावण्यासाठी
नियोजन करणे.
७. अल्पकालीन व दीर्घकालीन गरजांचा आराखडा निश्चित
करणे.
८. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाहीचे
स्वरूप ठरविणे.
9. शाळा सिध्दी मधील (शालेय प्रतवारीतील) प्रचलीत
स्थान उंचवण्यासाठी नियोजन करणे.
१०. शाळा सादील रकमेतून घ्यावयाच्या वस्तूंच्या
यादीला मान्यता देणे.
११. सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत शाळेस मिळालेल्या
रकमेच्या खर्चाचे नियोजन करणे.
१२. दोन महिन्यांतील कामकाजाचा आढावा घेणे.
१३. शालेय पोषण आहार-तांदूळ प्राप्त करणे व शिजवून
देणे याविषयक नियोजन करणे.
१४. ऐनवेळचे विषय
बैठक क्रमांक २ माहे (जुलै-ऑगस्ट)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. वर्गवार पटनोंदणी व उपस्थितीचा आढावा घेणे. १००
टक्के उपस्थितीचे लक्ष्य निश्चित करणे.
३. वर्गनिहाय सतत गैरहजर मुलांचा आढावा व त्यांच्या
उपस्थितीसाठी उपाययोजना करणे.
4. प्रथम क्षमता चाचणीचे नियोजन करणे.
५. निरुपयोगी व वापरून निकामी झालेल्या साहित्याची
निर्लेखनासाठी पाहणी करून असे साहित्य निश्चित करणे.
६. इयत्ता १ ली ते इ. ४ थी मधील मुलांच्या आरोग्य
तपासणीचे नियोजन करणे.
७. मागील दोन महिन्यातील कामकाजाचा आढावा घेणे.
८. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा आढावा
घेणे.
९. सादील खर्च व शाळासुधार योजना जमाखर्चाचा आढावा
व मंजुरी देणे.
१०. सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत शाळेस मिळालेल्या
रकमेच्या जमाखर्चाचा आढावा घेणे.
११. शालेय पोषण आहार तांदूळ शिजवून देणे, आढावा घेणे.
१२. ऐनवेळचे विषय
बैठक क्रमांक ३ (सप्टेंबर - ऑक्टोबर)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. .दुसऱ्या क्षमता चाचणीचे नियोजन करणे.
३. सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत
असलेल्या उपक्रमांचा आढावा घेणे.
४. शाळा पातळीवरील विविध स्पर्धांचे व बक्षिसांचे
नियोजन / पूर्वतयारी करणे.
5. छोट्या / मोठ्या सहलीचे
नियोजन/पूर्वतयारी/मान्यता घेणे.
6. मागील दोन महिन्यांतील कामकाज आढावा घेणे.
७. शिक्षक उपस्थिती व नियमिततेबाबत आढावा घेणे.
८.शालेय पोषण आहार- तांदूळ शिजवून देणे, आढावा घेणे.
९. ऐन वेळचे विषय
बैठक क्रमांक ४ (नोव्हेंबर-डिसेंबर)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा/नियोजन/चर्चा
३. शैक्षणिक उठाव योजना आढावा व पुढील नियोजन/चर्चा
4. शालेय पोषण आहार- तांदूळ शिजवून देणे, आढावा घेणे.
5. अप्रगत
मुलांच्या तयारीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या उपक्रमांचा आढावा घेणे.
६. मागील दोन महिन्यांतील कामकाजाचा आढावा घेणे.
7. शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे नियोजन
8. विविध स्पर्धांच्या सरावांबाबत नियोजन/चर्चा
करणे.
९. स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबातील मुलांच्या
शिक्षणाची सोय करणे.
१०. ऐनवेळीचे विषय
बैठक क्रमांक ५ (जानेवारी-फेब्रुवारी)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. गाव/वाडी/वस्ती/वॉर्डमध्ये नव्याने राहण्यास
आलेल्या कुटुंबाचा समावेश सर्वेक्षण रजिस्टरमध्ये करणे व स्थलांतर होऊन बाहेरगाव
गेलेल्या कुटुंबाद्दल रजिस्टरमध्ये नोंद करणे.
३. शैक्षणिक उठाव योजना व सावित्रीबाई फुले दत्तक
पालक योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन/चर्चा
४. उपस्थिती भत्ता लाभार्थीची उपस्थिती व शैक्षणिक
प्रगती याबाबत आढावा घेणे.
5.शाळा व्यवस्थापन समिती कार्यक्षेत्रात बालवाडी / अंगणवाडी / नवीन
शाळा/वस्तीशाळा/
'महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र इत्यादी
निकषांनुसार सुरू करणे गरजेचे असल्यास तसा ठराव करून गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे
मागणी सादर करणे.
६. मागील दोन महिन्यांतील कामकाजाबाबत आढावा घेणे.
7. विविध स्पर्धांच्या कार्यवाहीचा आढावा घेणे.
8. शालेय पोषण आहार- तांदूळ शिजवून देणे; आढावा घेणे.
9. ऐनवेळचे विषय
बैठक क्रमांक ६ (माहे मार्च-एप्रिल)
विषय क्रमांक
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण नियोजन/कार्यवाही
आणि दाखलातीचे उद्दिष्ट निश्चित करणे.
३. सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत जमा रकमांच्या
विनियोगाचा आढावा घेणे.
४. शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेणे.
5. शाळेतील उपलब्ध टू इन वन सेट, दूरदर्शन संच, गणित व विज्ञान पेटी, स्लाईड प्रोजेक्टर इत्यादींसारख्या साधनांचा वापर व सद्व्यःस्थिती याबाबत
आढावा घेणे.
६.नवीन शैक्षणिक वर्षाच्या शालेय नियोजनासंबंधी
सूचना
७. मागील दोन महिन्यांतील कामकाजाचा आढावा घेणे.
८. ऐनवेळचे विषय
अशाप्रकारे आपण आपल्या शाळेतील शालेय व्यवस्थापनातील महत्वाचा घटक असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सभा नियोजन करू शकता. या विषयाव्यतिरिक्त आपण काही विशेष कारणासाठी शाळा व्यवस्थापन समिती school management committee च्या सभेचे आयोजन करू शकता. आपणास गरज आसेल अशा वेळी सभा नियोजन करून आवश्यक त्या घटकांची किंवा विषयांची मंजूरी सभेत घेऊ शकता.
आपणास हे ही आवडेल-
Headmaster and school work मुख्याध्यापक व शालेय कामकाज
इंग्रजीच्या अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका
0 टिप्पण्या