Learning Outcome Std 5 th अध्ययन निष्पत्ती इयत्ता 5 विषय मराठी , इंग्रजी, गणित

 अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, अध्ययन निष्पत्ती प्रश्नपत्रिका, अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका learning outcomes ncert learning outcomes example, types of learning outcomes,learning outcomes pdf, what are learning outcomes in teaching, learning outcomes definition, importance of learning outcomes, learning outcomes and learning objectives.अध्ययन निष्पत्ति विषय मराठी learning outcomes

विषय मराठी  इयत्ता पाचवी

1) ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यातील ( विनोदी, साहसी, सामाजिक विषयांवरील कथा, कविता इत्यादी) विषय, घटना, चिञं, पाञं, व शीर्षक यांबाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत देतात, तर्क करतात व निष्कर्ष काढतात.

2) आपल्या परिसरातील घडणारे प्रसंग, घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात. त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात.

3) भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करतात.

4) विविध प्रकारच्या साहित्यातील (उदा. वर्तमानपञे, बालसाहित्य, पोस्टर इत्यादींमधील) संवेदनशील मुद्द्यांवर आपले मत / विचार व्यक्त करतात. उदा.कठीण समय येता’ हा पाठ वाचून मुले म्हणतात, ‘आम्ही नेहमीच इतरांना मदत करतो.’

5) भिन्न परिस्थिती आणि उद्देशांसाठी (फलकावरील सूचना, कार्यअहवाल, माहिती इत्यादी मिळविण्यासाठी) वाचतात, लिहतात.

6) आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य (वर्तमानपञे, बालसाहित्य, मोठे फलक इत्यादी) समजून घेऊन वाचन करतात, त्यांविषयी बोलतात.

7) अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशामधून शोधतात.

8) स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरवलेल्या कृतीअंतर्गत लेखनप्रक्रिया उत्तम तह्रेने समजून स्वतःचे लेखन पडताळतात. लेखनाचा उद्देश व वाचक यानुसार आवश्यक बदल करतात. उदा. एखाद्या घटनेबाबतची माहिती सांगण्यासाठी शालेय भित्तिपञिकेत लेखन करतात किंवा मिञास पञ लिहतात.

9) भाषेतील बारकावेनियम इत्यादींचा विचार करून स्वतःची भाषा तयार करतात आणि त्याचा आपल्या लेखनात / ब्रेल लिपीत समावेश करतात.

10) भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक (उदा. विरामचिन्ह, काळ, क्रियापद, लिंग, वचन) ओळखतात व त्याचा वापर करून लेखन करतात.

11) भिन्न उद्देशांसाठी लेखन करताना विरामचिन्हांचा (उदा. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह जाणीवपूर्वक व योग्य वापर करतात.

12) स्तरांनुसार इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादींमध्ये (गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन, नृत्यकला, चिकित्या इत्यादीमध्ये) येणा-या शब्दांचा अर्थ समजून घेऊन लेखनात संदर्भानुसार योग्य वापर करतात.

13) आपल्या परिसरात घडणा-या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांबाबत लिखित स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त करतात.

14) पाठ्यपुस्तक आणि इतर लेखनप्रकारांतील संवेदनशील विषयावर लिखित स्वरुपात/बेल लिपीमध्ये अभिव्यक्त होतात.

15) आपल्या कल्पनेने कथा, कविता, पञ इत्यादी लिहितात. कथा, कविता यांमध्ये स्वतःच्या शब्दाची भर घालून लेखन करतात.

अध्ययन निष्पत्ति विषय गणित learning outcomes

विषय गणित इयत्ता पाचवी

अध्यनार्थी-

1) मोठ्या संख्यांवरील उदाहरणे सोडवतात.

2) परिसरातील 1000 पेक्षा जास्त किमतीच्या संख्या वाचतात व लिहितात.

3) 1000 पेक्षा मोठ्या संख्यांवर , स्थानिक किमती जाणून घेऊन चार मूलभूत अंकगणिती क्रिया करतात.

4) प्रमाणित पध्दत वापरून दिलेल्या संख्येला दुस-या संख्येने भागतात.

5) बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचे अंदाज करतात व विविध प्रकारे त्याचा पडताळा घेतात. उदा. प्रमाण रीती वापरून, एखाद्या संख्येने भाग करून (जसे 9450 ला 25 ने भागताना; आधी 9000 ला, व नंतर 50 ला 25 ने भागतात आलेल्या भागाकाराची बेरीज करतात.)

6) मूळ संख्या व सहमूळ संख्यांचे वर्गीकरण ओळखतात.

7) दिलेल्या अपूर्णांकांचा अर्थ जाणून घेतात.

8) समूहाचा भाग दर्शविणारी संख्या शोधतात.

9) दिलेल्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक शोधतात व तयार करतात.

10) दिलेले ½, ¼ , 1/5 यासारखे अपूर्णांक दशमान पद्धतीत व्यक्त करतात. याउलट दशमान पध्दतीतील अपूर्णांक साध्या अपूर्णांकात व्यक्त करतात. उदाहरणार्थ, लांबी किंवा रक्कमेचा अर्धा भाग. (जसे – 10 रूपयांचा अर्धा म्हणजे 5 रूपये.)

11) व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करतात आणि दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करतात.

12) कोन व आकार यांबद्दलची माहिती मिळवितात.

13) काटकोन, लघुकोन, विशालकोन यांचे वर्गीकरण करून कोन काढतात व त्याचे रेखाटन करतात.

14) नेहमीच्या वापरातील लांबी, वजन, धारकता यांच्या एककांचा संबंध जोडतात आणि मोठी एकके छोट्या एककात व छोटी एकके मोठ्या एककात रूपांतरित करतात.

15) मोठ्या भांड्यांच्या आकारमानाचा अंदाज ज्ञात एककांच्या साह्याने करतात. जसे बादलीचे आकारमान तांब्याच्या आकारमानाच्या 20 पट आहे.

16) नाणी, नोटा, लांबी, वजन, धारकता व कालावधी यांच्या मापनातील उदाहरणे वा समस्या सोडविण्यासाठी चार मूलभूत अंकगणिती क्रियांचा वापर करतात.

17) हेतूपूर्वक तयार केलेल्या घडणी वापरून घण, वृत्तचिती व शंकू तयार करतात.

18) चौरस संख्या व ञिकोणी संख्या यांचे आकृतिबंध ओळखतात.

19) दैनंदिन व्यवहारातील विविध प्रकारची माहिती गोळा करतात. सारणीरूपात व चिञलेखाने दर्शवितात.

20) परिसरातील आयताकृती वस्तूंची परिमिती व क्षेञफळ काढतात. जसे – वर्गातील जमीन, खडूच्या खोक्याचा पृष्ठभाग  इत्यादी.

21) सुयोग्य क्रियांचा वापर करून (बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार ) मोठ्या संख्यांवरील क्रिया करतात.

 अध्ययन निष्पत्ति विषय English learning outcomes

  English   Std  5 Th

1) Answers coherently in written or oral form to questions in English based on day-to-day life experiences, unfamiliar story, poem heard or read.

2) Gives appropriate oral and written responses in various contexts.

3) Recites poem/songs with proper rhythm and pronunciation and shares games, riddles, stories etc with peers and family members.

4) Understand questions, requests, commands in games and sports etc and act accordingly.

5) Reads for pleasure independently in English storybooks, news items, headlines, advertisements etc without difficulty and composes short paragraphs.

6) Frames different questions on various topic and situations.

7) Users synonym and antonym given in the textbook.

8) Reads silently with comprehension writes event in logical order.

9) Writes dictation of words, phrases and sentences for different purposes such as lists paragraphs dialogues etc.

10) Uses various dictionaries, other reference materials for reference. Find meaning of new words form a dictionary. Looks up the spelling of words in a standard dictionary.

11) Write paragraphs in English form verbal, visual clues with appropriate punctuation marks. Writes a continuous and meaningful passage.

12) Writes a short biography / autobiography of a thing, object, or person of their choice.

13) Appreciates either verbally/ in writing the variety of food, dress, customs and festivals as read / heard in his/her day-to-day life, in storybooks.

14) Recites poems/songs with proper rhythm and pronunciation.

15) Reads and understands maps, charts and other graphics.

16) Writes numbers in figures as well as in words.

17) Attempts to write stories poem creatively.

18) Enjoys short skits and plays.

19) Understands the details of a story / passage.

20) Recites / sings some song and poems with action.

21) Participates in skill and playlets with interest.

22) Reads announcements in a clear, audible voice with proper

pronunciation / stress and intonation.

 

23) Writes a description of a given process.

24) Writes various types of informal letters.

अध्ययन निष्पत्ति विषय परिसर अभ्यास

विषय परिसर अभ्यास  इयत्ता पाचवी

अध्ययनार्थी –

1) प्राण्यांमधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे, निद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश, आवाज, व अन्न यांना प्रतिसाद स्पष्ट करतात.

2) आपल्या दैनंदिन जीवनातील तंञज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्यासाठी (पाणी, अन्न इत्यादी) प्रक्रिया स्पष्ट करतात. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्ये स्पष्ट करतात. (बँका, पंचायत, सहकारी संस्था, पोलिस स्टेशन, इत्यादी)

3) प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्त्वाचे वर्णन करतात. (उदा. प्राण्यांवर आधारित चरितार्थ असणारे समाज, बीजसंक्रमण इत्यादी)

4) भूप्रदेश, हवामान, संसाधने (अन्न, पाणी, निवारा,, उदरनिर्वाह) व सांस्कृतीक जीवन (उदा. अतिदूर/ दुर्गम प्रदेशातील, थंड प्रदेश / उष्ण वाळवंटातील लोकांचे जीवन) यांमधील दुवे विशद करतात.

5) भूतकाळातील व वर्तमानातील चालीरीती प्रथा, तंञे यांच्यातील बदलांचा (नाणी, चिञे, स्मारके, वस्तुसंग्रहालये, इत्यादी) तसेच ज्येष्ठांशी संवाद यामधून मागोवा घेतात.

6) वस्तूंचे, साहित्य, त्याचप्रमाणे आकार, चव, रंग, पोत, आवाज, गुणवैशिष्ट्ये असे घटक/गुणधर्म समजण्यासाठी कृतींचे गट तयार करतात.

7) निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पध्दतीने नोंद करतात. (उदा. तक्ते/ आरेखन/ स्तंभलेख/ पाय चार्ट) व कृती वा घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात. (उदा. तरंगणे, बुडणे, मिसळणे, बाष्पीभवन, बीजांकुरण, खराब होणे) व यावरून कारण व परिणाम यांतील परस्परसंबंध स्थापित करतात.

8) चिन्हे, दिशा, विविध वस्तू / एखाद्या भागातील ठळक ठिकाण / भेट दिलेली जागा यांचे नकाशातील स्थान ओळखतात आणि एखाद्या स्थानाच्या संदर्भात दिशा ओळखतात.

9) विविध स्थानिक / टाकाऊ वस्तूंच्या मदतीने भित्तिपञके , आरेखने, प्रतिरुपे, माडण्या स्थानिक खाद्यपदार्थ, चिञे नकाशे (नजीकचा परिसर/भेट दिलेली ठिकाणे)  तयार करतात तसेच कविता, घोषणावाक्ये / प्रवासवर्णने लिहतात.

10) निरीक्षण केलेल्या / अनुभवलेल्या प्रश्नांनावर मतप्रदर्शन करतात. चालीरीती / घटनांचा समाजातील मोठ्या प्रश्नांशी संबंध जोडतात. (उदा. संसाधनाचा वापर / मालकी यातील भेदभाव , स्थलांतर, विस्थापन, बहिष्कृती, बालहक्क)

11) स्वच्छता, आरोग्य, कचरा/आपत्ती/आणीबीणी परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगले, इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात.

12) नकाशातील खुणा व चिन्हे यांच्यासह नकाशावाचन करतात.

13) नकाशावरून भारताच्या प्राकृतिक रचनेचे वर्ण करतात.

14) भारताच्या राजकीय सीमा लक्षात घेऊन भौगोलिक , सामाजिक, सांस्कृतीक वैशिष्ट्ये सांगतात.

15) वाहतूक व संदेशवहनाच्या अतिवापरामुळे सजीव व पर्यावरणातील परिणाम सांगतात.

16) मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतात.

17) आदिमानव ते अधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहित करून घेतात.

 


Post a Comment

0 Comments